• 27 Mar, 2023 06:59

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऊन्हाळा म्हटले की आला आंबा सिझन, पण तुम्हाला माहिती का जगातील सर्वात महागडा आंबा 

Expensive Mango in the World

Image Source : http://www.india.com/

Expensive Mango: ऊन्हाळा सुरू झाला की, प्रत्येकाला चाहूल लागते ती आंब्याची. हे फळ किती ही महाग असले, तरी लोक उन्हाळयात आंबा खाणे सोडत नाही. पण तुम्हाला माहिती का जगातील सर्वात महागडा असा कोणता आंबा आहे? त्याची किंमत काय आहे? याविषयी सविस्तर जाणून घेवुयात.

The most Expensive Mango in the World: ऊन्हाळा आला की आंबे आलेच म्हणा. लोक मोठया उत्साहाने आंबा (Mango) फळ खरेदी करतात. भले त्याला किती ही पैसा खर्च करावा लागो. पण ऊन्हाळयात आंबा खाणे ही पांढऱ्या दगडावरची काळी रेष असते. पण आंबा प्रेमीसाठी जगात सर्वात महागडा आंबा कोणता आहे, त्याची किंमत काय आहे? याविषयी माहिती घेऊन आलो आहोत.  

जगातील सर्वात महागडया आंब्याचे नाव

जगातील सर्वात महागडया आंब्याचे नाव ‘मियाझाकी’ (Miyazaki) असे आहे. हा आंबा शक्यतो जपान देशातील मियाझाकी येथील क्युशु शहरात पिकविला जातो. तसेच भारतात हा आंबा बिहार राज्यातील पूर्णिया तर मध्य प्रदेश राज्यातील जबलपूरमध्ये क्वचितच आढळतो. 

काय किंमत आहे?

जपानमध्ये सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या मियाझाकी या आंब्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 2 लाख 70 हजार रूपये प्रति किलो आहे. या आंब्याचे वजन साधारण 350 ग्रॅम इतके आहे. या आंब्यामध्ये साखरेचे प्रमाण हे 15 टक्क्यांपेक्षा जास्त असते. या आंब्याला सुर्याची अंडी असेदेखील म्हटले जाते.

कधी लागवड केली जाते?

 जपानमधील मियाझाकी येथील स्थानिक उत्पादने व व्यापार केंद्राच्या मतानुसार, एप्रिल ते आॅगस्ट या कालावधीत या महागडया आंब्याची लागवड केली जाते. मागील वर्षी हा आंबा बाजारात तब्बल 2 लाख 75 हजार रूपये प्रति किलो विकण्यात आला होता. हा आंबा शक्यतो लाल, हिरव्या व जांभळ्या रंगाचे असतात. त्याचा आकार हा डायनासोरच्या अंडयांसारखा असल्याचे दिसते. हा दिसायला खूप सुंदर व आकर्षक असतो. 

आरोग्यासाठी फायदेशीर

मियाझाकी हा लाखो रूपयांचा आंबा शरीरासाठी ही तितकाच फायदेशीर आहे. या आंब्यामध्ये बीटा-कॅरोटीन व फाॅलिक अॅसिड असल्यामुळे, हे डोळयांसाठी अत्यंत सर्वोत्तम असल्याचे रेड प्रमोशन सेंटरव्दारे सांगण्यात आलेआहे. डोळयांना स्पष्ट दिसत नसेल तर चांगले दिसण्यासाठी हा आंबा उत्तम आहे.  

मध्य प्रदेशमध्ये दिले या आंब्याला संरक्षण  

मध्य प्रदेशमधील एका शेतकऱ्याने मियाझाकी या आंब्याचे पीक घेतले होते. शेतातून या महागडया आंब्याची चोरी होऊ नये म्हणून या शेतकऱ्याने एक शक्कल लढविली. त्याने या आंब्याच्या पीक संरक्षणासाठी चक्क सिक्युरेटी व कुत्र्यांची व्यवस्था केली होती. विशेष म्हणजे हे आंबे दोन झाडांना मिळून असे सात आंबे लागले होते. पण या आंब्याची सिक्युरिटी ही टाइट ठेवली होती.