सर्वसामान्य लोक सरकारला प्रत्यक्ष कर (Direct Tax) देतात. याच टॅक्सचा वापर करून सरकार लोकोपयोगी कामांसाठी हा पैसा खर्च करते. भारतीय अर्थ मंत्रालय आर्थिक वर्षाच्या शेवटी डायरेक्ट टॅक्स कलेक्शन संदर्भातील माहिती जाहीर करते. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 10 मार्च पर्यंत डायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नेमकी ही वाढ कितीने झाली आहे, जाणून घेऊयात.
टॅक्स कलेक्शनमध्ये 22.58 टक्क्यांची वाढ
पर्सनल टॅक्स आणि कॉर्पोरेट टॅक्सचा समावेश असलेल्या डायरेक्ट टॅक्समध्ये पर्सनल टॅक्समुळे संकलनामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यंदा सरकारच्या ग्रॉस डायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये 22.58 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली असून सरकारला यातून 16.68 लाख करोड रुपये टॅक्स मिळाला आहे. हा संकलित करण्यात आलेला कर एकूण अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 96.67 टक्के इतके असेल, असा अंदाज बांधण्यात आला होता, मात्र सुधारित बजेटच्या अंदाजानुसार ही रक्कम 83.19 टक्के आहे असा अंदाज CBDT ने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
टॅक्स रिफंड करुनही सरकारला मिळाला इतका टॅक्स
महत्त्वाचं म्हणजे सरकार टॅक्सपेअर्सना मिळालेल्या टॅक्समधून रिफंड करते. हा टॅक्स रिफंड करूनही सरकारला यातून 13.73 लाख करोड रुपयांचा नेट डायरेक्ट टॅक्स मिळाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा टॅक्स 16.68 टक्क्यांनी वाढला आहे.
यावर्षी कॉर्पोरेट टॅक्समध्ये 18.08 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. याशिवाय पर्सनल टॅक्समध्ये Security Transaction Tax यामध्ये पकडून हा टॅक्स 27.57 टक्क्यांवर पोहचला आहे. टॅक्सपेअर्सच्या रिफंडला ऍडजस्ट करण्यासाठी कॉर्पोरेट टॅक्समध्ये 13.62 टक्के आणि पर्सनल टॅक्समध्ये 20.73 टक्के वाढ झाल्याची पाहायला मिळाले आहे.
अर्थ मंत्रालयाने किती रिफंड जारी केला?
अर्थ मंत्रालयाने 1 एप्रिल 2022 ते 10 मार्च 2023 या कालावधीत एकूण 2.95 लाख करोड रुपयांचा रिफंड जारी केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही रक्कम 59.44 टक्क्यांनी वाढली आहे.