भारतातील टॉप 5 फेलोशिप कोणत्या? माहित करून घ्या
पंतप्रधान रिसर्च फेलोशिप योजना
या फेलोशिप अंतर्गत 1000 B.Tech विद्यार्थ्यांना IIT आणि IISc मध्ये PhD करण्याची संधी दिली जाते. याअंतर्गत त्यांना दरमहा 75000 रुपये दिले जाते.
शताब्दी-पोस्ट डॉक्टरल रिसर्च फेलोशिप योजना
या फेलोशिपसाथी अर्ज करण्याच्या तारखेला उमेदवारांचे वय 32 वर्षांपेक्षा कमी असावे. उमेदवाराला दरमहा 50,000 रुपये मिळतात.
नॅशनल पोस्ट डॉक्टरल फेलोशिप
या फेलोशिपमध्ये वार्षिक 2 लाख रुपयांचे संशोधन अनुदान, तसेच मासिक 55,000 रुपये स्टायपेंड दिले जाते.
UGC-NET जुनियर रिसर्च फेलोशिप
या फेलोशिमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर फायद्यांसह दरमहा 14,000 रुपये आणि 25,000 रुपये भत्ता मिळतो.
इन्स्टिट्यूट पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप
या फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षांनी अर्ज करण्याची मुदत आहे. विद्यार्थ्यांना दरमहा 55,000 रुपये दिले जातात.