आधारकार्डातली माहिती ऑनलाईन बदलू शकता. त्यासाठी 14 जूनपर्यंतची मुदत आहे.

myAadhaar portal ही सुविधा मोफत आहे.

तर आधार केंद्रांवर त्यासाठी 50 रुपये शुल्क भरावं लागेल

पत्ता बदलला असेल, फोन क्रमांक बदलला असेल किंवा कुठलाही बदल आधारकार्डात हवा असेल तर तुम्हाला ऑनलाईन कागदपत्र अपलोड करता येतील.

आधारकार्ड अपडेट करण्यासाठीचे टप्पे बघूया…

1- https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाईटवर आधारक्रमांक वापरून लॉग-इन करा. 2- नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP क्रमांक येईल.

3- OTP पडताळणी झाल्यावर ‘डॉक्युमेंट अपडेट’ वर क्लिक करा. तुमची सध्याची माहिती समोर दिसेल.

4- ही माहिती तपासून किंवा त्यात बदल केल्यानंतर शेजारी असलेल्या हायपरलिंकवर क्लिक करायचं

5- आणि शेवटी तुम्हाला जे कागदपत्र त्यासाठी सादर करायचं असेल ते अपलोड करायचं.

Click Here