तुम्हाला मिळणाऱ्या बोनसचा योग्य वापर कसा करू शकता?

क्रेडिट स्कोअर वाढविण्यास मदत

बोनसच्या पैशांचा वापर तुम्ही गरज भासल्यास क्रेडीट कार्डचे बिल भरण्यास करु शकता. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला राहील.

आपत्कालीन निधी म्हणून वापर

प्रत्येक महिन्यात आपला अतिरिक्त होणारा खर्च टाळून, तुम्ही पैशांची बचत करु शकता. दर महिन्यात बचत केलेला पैसा आणि बोनस मिळून तुमच्याकडे चांगली रक्कम जमा होते. ती तुम्ही अडचणीच्या वेळी वापरू शकता.

परताव्याचा लाभ घेऊ शकता

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती ग्रॅच्युइटी आणि भविष्य निर्वाह निधी इत्यादींचा लाभ मिळतो. या सर्व प्रकारे बचत करुन जमा झालेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवल्यास चांगला परतावा मिळू शकतो.

आरोग्यविमा आणि कौशल्य क्षमता वाढविण्यास

बचत केलेल्या बोनसच्या पैशांचा उपयोग तुम्ही स्वत:चा आरोग्य विमा काढण्यास करू शकता. तसेच काही कारणास्तव अचानक नोकरी सोडण्याची वेळ आल्यास या पैशांचा उपयोग करून शकता.