त्याने तब्बल 997.6 दशलक्ष अमेरिकन डॉलर जिंकले.

हा जॅकपॉट जिंकल्यानंतर एडविन लोकांना फारसा दिसला नव्हता.

पण, आता अचानक त्याने कॅलिफोर्नियात एका टेकडीवर 2.5 कोटी रुपयांचं आलिशान घर विकत घेतल्याची बातमी आली आहे.

‘डर्ट’ या नियतकालिकाने या घराचा व्हीडिओही इन्स्टाग्रामवर टाकलाय. 3 मजली या घरात 7 बेडरुम, 6 बाथरुम आणि 2 पावडर रुम आहेत.

लॉटरी जिंकल्यावर एडविन कार शॉपिंगलाही गेला असला पाहिजे. कारण, त्याच्या नवीन घरात 6 कार पार्क करण्याची सोय आहे!

एडविनचं हे नवं घर ‘हॉलिवूड हिल्स’ या भागात आहे. आणि त्याचे शेजारी असणार आहेत जिमी किमेल आणि एरिएना ग्रँड

एडविन यांच्या नवीन घरात आऊट-डोअर किचन, जिम, मूव्ही थिएटर, रुफ-टॉप डेक आणि एक खाजगी बाल्कनी अशा सुविधा आहेत.

एडविन यांनी जिंकलेल्या जॅकपॉटचा काही हिस्सा हा कॅलिफोर्निया पब्लिक स्कूल या सरकारी शाळेला मिळणार आहे.

ही रक्कम 156 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी आहे

Click Here