• 26 Mar, 2023 15:01

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sania Mirza: सानिया मिर्झाने अखेर केला टेनिसला अलविदा, 20 वर्षांच्या करियरमध्ये बक्षिसांनी कमविले कोटयावधी रूपये

Sania Mirza Prize Money

Image Source : http://www.economictimes.indiatimes.com/

Sania Mirza Net Worth: भारताची टेनिस्टार सानिया मिर्झा हिने रविवारी आपल्या टेनिसचा अंतिम सामना खेळला. ज्या स्टेडियममधून तिने आपल्या करियरची सुरूवात केली होती, काल (5 मार्चला 2023) त्याच लालबहादुर टेनिस स्टेडियममध्ये शेवटचा सामना खेळत, टेनिस करियला अलविदा केले. आता ती वुमन्स प्रिमियम लीग (WPL) साठी सज्ज झाली आहे.

Sania Mirza Prize Money: सानिया मिर्झाने टेनिसच्या 20 वर्षीच्या कारकीर्दीमधील डब्ल्यूटीए सिंगल या पहिल्या सामन्यातून टेनिस करियरला सुरूवात केली होती. काल 5 मार्चला 2023 ला ज्या स्टेडियमधून सुरूवात केली होती, त्याच स्टेडियममधून तिने आपल्या टेनिस कारकीर्दीला आनंद अश्रूंनी अलविदा केले. तिच्या या 20 वर्षाच्या करियरमध्ये तिने फक्त बक्षिसांच्या स्वरूपातून कोटयावधी रूपयांची कमाई केली आहे.  

किती पुरस्कार जिंकले व कमाई?

सानिया मिर्झाने आपल्या सुपर-डुपर टेनिस करियरमध्ये 6 ग्रॅंड स्लॅम व 43 दुहेरी विजेतेपद आपल्या नावावर केले. महिला टेनिस असोसिएशनच्या वेबसाइट रिपोर्टनुसार, या टेनिसस्टारने 2008 मध्ये 8 करोडपेक्षाअधिक रक्कम बक्षिसांच्या स्वरूपात प्राप्त केली होती. तसेच 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत सानिया मिर्झाची एकूण बक्षिसांची रक्कम ही 60 करोड रुपयांपेक्षा जास्त होती. तसेच या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये या टेनिस स्टारने बक्षिसांच्या रकमेतून 16 लाख रूपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे.  

आतापर्यंत मिळालेले पुरस्कार

 सानिया मिर्झाला तिच्या 20 वर्षाच्या टेनिस कारकीर्दीत अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार ही अव्वल पुरस्कार प्राप्त झाली आहेत. तसेच सानियाने आतापर्यंत 6 मोठी चॅम्पियनशिप पदेदेखील आपल्या नावावर केली आहेत. याचबरोबर आॅस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन, युएस ओपन ही दुहेरी विजेतेपददेखील जिंकली आहेत. एवढेच नाही तर मिश्र दुहेरीमध्ये 3 ग्रॅंड स्लॅम आस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन व यूएस ओपन ही मोठी विजेतेपददेखील पटकावले आहेत.  

सानिया मिर्झा नेटवर्थ

 2022 पर्यंत सानिया मिर्झाची एकूण संपत्ती ही 200 कोटी आहे. या संपत्तीमध्ये बक्षिसांची रक्कम व जाहिरातींमधून मिळणाऱ्या कमाईचादेखील समावेश करण्यात आला आहे. तसेच या टेनिसस्टारने WTA टूरच्या माध्यमातून 6,963,060 डाॅलरची रक्कम प्राप्त केली होती. याचबरोबर ती तेलंगणा राज्याची ब्रॅंड अॅम्बेसेडरदेखीलआहे. सोबतच ती आदिदास, स्प्राइट अशा अनेक नामांकित ब्रॅंडस् ची ब्रॅंड अॅम्बेसेडरआहे. ती या जाहिरातींसाठी 25 करोड रूपये मानधन घेते.   

आलिशान घर व कार कलेक्शन

सानिया मिर्झाचे हैदराबादमध्ये एक आलिशान घर आहे. या घराची किंमत साधारणपणे 13 करोड रूपये आहे. याशिवाय तिचे दुबईमध्येदेखील सुंदर घर आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये BMW X3, Porsche Carrera GT, मर्सिडीज बेंझ,आडी व रेंजर रोव्हर यांचा समावेश आहे.