रिलायन्स ग्रुप (Reliance Group) हा एकापाठोएक करत सर्वच क्षेत्रात जोरदारपणे आगमन करीत आहेत. काही महिन्यांपूर्वीच चाॅकलेट ब्रॅंड घेऊन येणार असल्याची घोषणा अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली होती, आता यापाठोपाठच सौंदर्य प्रसाधनांच्या क्षेत्रातदेखील एन्ट्री घेणार आहे. त्यांची ही एन्ट्री एका ब्युटी अॅपने होणार आहे, सोबतच हा ग्रुप स्टोअरदेखील सुरू करणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
ब्युटी अॅपचे नाव काय?
रिलायन्स ग्रुपच्या या नवीन ब्युटी अॅपचे नाव ‘टिरा’ (Tira) असे आहे. हे अॅप पुढील काही दिवसातच लाॅन्च करण्यात येणार आहे. त्यापूर्वी टेस्टिंग करण्यासाठी हे अॅप रिलायन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. ही टेस्टींग पूर्ण होताच, हे अॅप जगातील ग्राहकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. तसेच रिलायन्स ग्रुप हे ब्युटी अॅप लाॅन्च झाल्यानंतर ब्युटी प्राॅडक्टसाठी आपले पहिले स्टोअरदेखील उघडणार आहे. त्यांचे हे पहिले स्टोअर मुंबई या शहरात उघण्यात येणार आहे.
स्टोअर कधी होणार सुरू?
रिलायन्स कंपनीचे ब्युटी स्टोअर हे साधारणपणे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडयात किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवडयात मुंबई या ठिकाणी सुरू होणार असल्याची माहिती रिलायन्स रिटेल लिमिटेडचे एमडी सुब्रमण्यम व्ही. यांनी नुकतीच दिली आहे. ते म्हणाले ब्युटी प्रसाधनाच्या विक्रीसाठी आमच्या साइडचे नाव tirabeauty.com असे असून, अॅपचे नाव टिरा असे आहे. हे अॅप पुढील काही दिवसात लाॅन्च करणार असल्याची घोषणादेखील त्यांनी यावेळी केली.
विक्रीसाठी कोणते प्राॅडक्टस असणार?
सुब्रमण्यम म्हणाले, आमच्या अॅपवर व स्टोअरवर ग्रोसरी, फॅशन, लाइफस्टाइल, शुज, मेडिसिन, डामेस्टिक गुड्स व इलेक्ट्राॅनिक्स अशा अनेक प्राॅडक्सचा समावेश असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना सौदर्यं प्रसादनाच्या खरेदीसाठी रिलायन्स ग्रुपचे टिरा अॅप व स्टोअर हा एक चांगला पर्याय आहे.
सध्या मंत्रा, अॅमेझाॅन व नायकासारख्या कंपन्या या क्षेत्रात काम करीत आहेत. पण त्या जगातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहचण्यात कमी पडत आहे. त्यामुळे आम्ही आमच्या अॅप व स्टोअरच्या माध्यमातून ही कमी भरून काढणार आहोत. संपूर्ण जगातील ग्राहकांना सौदर्यं प्रसादनाच्याबाबतीत सर्वोत्तम सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.