भारतात सर्वात मोठी दूरसंचार कंपनी म्हणून ओळख असणाऱ्या रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या 5 G सेवेचा विस्तार वाढविला आहे. या कंपनीने नुकतेच आणखी 27 शहरांमध्ये 5 G सेवा सुरू केली असल्याची माहिती दिली आहे.
कोणत्या शहरात 5 G सेवा सुरू केली?
रिलायन्सच्यावतीने निवेदनात सांगण्यात आले आहे की, ‘जिओ 5’ (Jio True 5G) ही सेवा आणखी 27 शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, तेलंगाना, उत्तराखंड, कर्नाटक, छत्तीसगड, पंजाब व पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यातील 27 शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
वेलकम आॅफर दिली जाणार
रिलायन्स कंपनीने जाहीर केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, जिओ 5G सेवे अंतर्गत 27 शहरांमधील युझर्सला वेलकम आॅफर ही देण्यात येणार आहे. कोणतेही अधिक दर न आकारता 1 Gbps च्या वेगाने अनलिमिटेड डेटा हा मिळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कारण मुकेश अंबानी यांनी काही महिन्यांपूर्वीच घोषणा केली होती की, 2023 च्या अखेरपर्यंत Jio 5G ही सेवा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचेल. त्यासाठी हा प्रयत्न असणार आहे. हे पाहता, त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे. आतापर्यंत भारतात एकूण 331 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्यात आली आहे.
5 G इंटरनेटचे फायदे
5 G इंटरनेटचा वेग हा तुफान आहे. यामुळे डाटा अपलोड व डाउनलोड करणे या प्रकारच्या कामाला आता जास्त वेळ लागणार नाही. म्हणजे ज्या कामाला तुम्हाला आता अधिक मिनिट लागत होते, तेच काम आता काही सेकंदात पूर्ण होतील. व्हिडीओ म्हणा, या गेम यामध्ये 5 G इंटनेटमुळे डिस्टर्बन येणार नाही.
काही वेळा एकाच इंटरनेट कनेक्शनवर अनेक युझर्स कनेक्ट झाले तर इंटरनेटचा वेग कमी व्हायचा, पण आता वेगवान इंटरनेटमुळे असे काहीही होणार नाही. सोबतच हाय स्पीड इंटरनेटमुळे व्हिडीओ काॅलिंग, फास्ट डाउलोडिंग स्पीड क्लियर आॅडियो मिळेल. या सर्व कारणांमुळे तुमची वेळेची मोठी बचत होण्यास मदत होणार आहे.
त्यामुळे या वेगवान इंटरनेट स्पीडचा फायदा युझर्सला मोठया प्रमाणात होणार आहे. युझर्सनी या गोष्टींचा मनसोक्त आनंद घ्यावा, असे रिलायन्सच्यावतीने सांगण्यात आली आहे. तसेच ही सेवा यावर्षी देशातील प्रत्येक गावात व शहरापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.