• 27 Mar, 2023 05:53

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stock Market: रेहतन टीएमटी कंपनीने केली स्टॉक स्प्लिटची घोषणा, शेअरहोल्डर्सना देणार 11 बोनस शेअर

Rehtan TMT Company Announces Stock Split

Image Source : www.rhetan.com

Stock Market: रेहतान रोलिंग मील प्रायव्हे़ट लिमिटेड ही गुजरातमध्ये 26 जानेवारी 1984 साली स्थापन झाली होती. कंपनीचे बाजार मूल्य 1 हजार 45.50 कोटी आहे. या स्टॉकने गुंतवणुकदारांना आत्तापर्यंत 777.79 टक्क्यांचा परतावा मिळवून दिला आहे. कंपनीने स्टॉक स्प्लीटची घोषणा केली आहे, याबाबतचे सर्व तपशील पुढे वाचा.

Rehtan TMT Company Announces Stock Split: स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध असलेल्या रेहतन टीएमटी लिमिटेड (Rhetan TMT Ltd) या कंपनीने आपल्या बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख बदलली आहे. कंपनीने 11:4 बोनस शेअर्स आणि 1:10 स्टॉक स्प्लिटसाठी 31 जानेवारी 2023 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली होती. आता कंपनीने ते बदलून 10 मार्च 2023 केले आहे. म्हणजे या तारखेपर्यंत पात्र भागधारक बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी पात्र असतील. स्प्लिट अंतर्गत, कंपनी 1 शेअर 10 तुकड्यांमध्ये विभाजित करेल, तर 11 शेअर्सवर 4 बोनस शेअर्सचे वितरण करण्याचा प्रस्ताव आहे.

कंपनीचा त्रैमासिक निकाल (Quarterly results of the company)

आर्थिक वर्ष 2022 मध्ये, रेहतन टीएमटी लिमिटेड (Rhetan TMT Ltd) 67.03 कोटी रुपयांचा निव्वळ महसूल (turn over revenue) मिळवला होता. मागील आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल 52.13 कोटी होता. या संदर्भात, महसूल 28.59 टक्के अधिक आहे. रेहतन टीएमटी लिमिटेडचा खर्च एका वर्षापूर्वी 51.95 कोटींवरून 64.16 कोटींवर पोहोचला आहे. हे 23.51 टक्के वार्षिक वाढ दर्शवते. कंपनीचा निव्वळ नफा 2.35 कोटी होता, जो एका वर्षापूर्वीच्या 0.13 कोटींपेक्षा 1 हजार 645.31 टक्के अधिक आहे.

स्टॉकची कामगिरी (Stock performance)

रेहतन टीएमटी लिमिटेडचे शेअर्स गुरुवारी बीएसईवर (BSE: Bombay Stock Exchange) 486.90 च्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाले, मागील 470 च्या बंदच्या तुलनेत 3.60 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या 6 महिन्यांत स्टॉकची किंमत 66.50 रुपयांवरून सध्याच्या बाजारभावापर्यंत वाढली आहे. हा 639.85 टक्के एवढा मल्टीबॅगर परतावा आहे. कंपनीचे मार्केट कॅप 1 हजार 045.50 कोटी आहे.

रेहतन टीएमटी लिमिटेड 5 सप्टेंबर 2022 रोजी बीएसई वर सूचीबद्ध करण्यात आली होती. त्याची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO: Initial public offering) आकार 56 कोटी रुपये होता. त्याच वेळी, त्याची इश्यू किंमत 70 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होती. सध्याची किंमत पाहता, आयपीओने 777.79 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

स्टॉक स्प्लीट म्हणजे काय? (What is a stock split?)

स्टॉक स्प्लिट म्हणजे शेअर स्प्लिट करणे होय. स्टॉक स्प्लिट अंतर्गत कंपनी आपले शेअर्स विभाजित करते. साधारणपणे, जेव्हा एखाद्या कंपनीचे शेअर्स खूप महाग होतात, तेव्हा लहान गुंतवणूकदार त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत. अशापरिस्थितीत, कंपनी लहान गुंतवणूकदारांना आपल्या शेअर्सकडे आकर्षित करण्यासाठी आणि बाजारात मागणी वाढवण्यासाठी स्टॉक स्प्लिटचा अवलंब करते.

जर एखाद्या कंपनीने त्याचे शेअर्स दोन भागांत विभागले तर, भागधारकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक शेअरसाठी एक अतिरिक्त हिस्सा दिला जातो. हे समभागधारकाच्या आधीपासून असलेल्या समभागांच्या संख्येच्या दुप्पट होते. याचा गुंतवणुकीच्या मूल्यावर परिणाम होत नाही, कारण दोन समभागांचे विभाजन प्रत्येक समभागाचे मूल्य अर्धे करते.

शेअर विभाजनामुळे कंपनीच्या शेअर्सची संख्या वाढते. परंतु याचा कंपनीच्या बाजार भांडवलावर परिणाम होत नाही. स्टॉक स्प्लिटमुळे कंपनीचे शेअर्स अधिक तरल होतात. बर्‍याच वेळा लोक स्टॉक स्प्लिटला बोनस शेअर्स सारखेच मानतात. पण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.