• 31 Mar, 2023 09:44

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IRCTC Free Food Service: रेल्वे देणार प्रवाशांना खाण्या-पिण्याची सुविधा अगदी मोफत, वाचा कधी मिळणार या सुविधेचा लाभ

Railway Fcilities

Image Source : http://www.currentaffairs.adda247.com/

IRCTC Free Food Service: भारतीय रेल्वेच्या वतीने प्रवाशांना खाण्या-पिण्यासोबतच शीतपेय देखील मोफत मिळणार आहे. नक्की ही सुविधा काय आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

IRCTC म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे प्रवाशांसाठी अनेक सुविधा दिल्या जातात. पण यापैकी कित्येक प्रवाशांना रेल्वेच्या अनेक सुविधाबद्दल माहीत नसते.जसे की, रेल्वेने प्रवास करताना खाण्या-पिण्याची सुविधा अगदी मोफत मिळते. पण या सुविधेचा लाभ कधी घेता येतो हे कित्येक प्रवाशांना माहित नसते. तर या सुविधेबाबत सविस्तर जाणून घेऊया.  

‘या’ सुविधेचा लाभ कधी घेता येतो?

भारतीय रेल्वेद्वारे प्रवाशांना खाण्या-पिण्यासोबतच शीतपेयाची सुविधादेखील मोफत मिळते. पण या सुविधेचा लाभ तेव्हाच घेता येईल, ज्यावेळी तुम्ही रेल्वे प्रवासासाठी निघाला आहात, पण काही कारणाने रेल्वेला येण्यास उशीर झाला. त्यावेळीच तुम्हाला IRCTCद्वारे खाण्या-पिण्याची व शीतपेयाची सुविधा अगदी मोफत दिली जाणार आहे. त्यामुळे रेल्वेला येण्यास जरी उशीर झाला  तरी आता तुमच्या खाण्या-पिण्याचे हाल होणार नाही. 

कोण पुरवणार खानपान सेवा? 

तुम्ही रेल्वे प्रवास करणार असाल आणि तुमच्या रेल्वेला जर उशीर झाला, तर खाण्या-पिण्याची बिलकुल चिंता करू नका. कारण रेल्वेच्यावतीने तुमची ही खाण्या-पिण्याची जबाबदारी म्हणजेच थोडक्यात तुमचा हा पाहुणचार कॅटरिंग विभाग करणार आहे. यांच्यावतीने या परिस्थितीत अडकलेल्या रेल्वे प्रवाशांना नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. 

Find out about the free food and drink facilities offered by the railways to passengers, but when to take advantage of this facility 1-1
http://www.businessleague.in/

वेळेत किती अंतर पाहिजे? 

तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल आणि तुमच्या रेल्वेला जर येण्यास उशीर झाला तर तुम्हाला खाण्या-पिण्याची सुविधा मोफत मिळणार. पण तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी साधारण रेल्वे येण्यास किती वेळेचे अंतर पाहिजे? तर समजा, तुमची रेल्वे येण्याच्या वेळेपेक्षा दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक उशीरा आली तरच तुम्हाला रेल्वेच्या मोफत खाण्या-पिण्यासोबतच शीतपेयाचा आस्वाद घेता येणार आहे.  

कोणत्या पदार्थांचा असणार समावेश? 

खाणे-पिणे मोफत या सुविधेमध्ये तुम्हाला रेल्वेच्या नाश्त्यामध्ये चहा, काॅफी व बिस्किट मिळते. तर सायंकाळच्या नाश्त्यामध्ये प्रवाशांना चहा, काॅफी व चार ब्रेड स्लाइस असणार आहे. यामध्ये ब्राउन व व्हाइट हा पर्यायदेखील उपलब्ध आहे. तसेच बटर चिपलेटदेखील दिले जाते. या व्यतिरिक्त प्रवाशांना दुपारच्या जेवणात भाजी, डाळ,चपातीसोबतच आदि पदार्थांचा आस्वाद घेता येईल. त्यामुळे आता जरी ट्रेनला दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक उशीर झाला तर प्रवाशांचे जेवणाचे हाल होणार नाही हे मात्र नक्की.