उन्हाळी सहल करायची आहे पण बजेट बसत नाही अशा परिस्थितीत तुमचा विचार अडकला असेल तर तुमच्यासाठी हा लेख फायदेशीर आहे. कारण कमी बजेटमध्ये उन्हाळी सहलीचा प्लॅन कसा करायचां याविषयी काही टिप्स सांगणार आहोत. जेणेकरून तुमची उन्हाळी सहल ही कमी बजेटमध्ये तर होईनच पण त्यासोबतच तुमची पैशांचीदेखील मोठी बचत होईल. शिवाय सहल ही यशस्वीरीत्या उत्तम पार पडेल. (Budget-Friendly Summer Vacation Ideas)
उन्हाळी सहलीचे नियोजन कसे करायचे? (How to Plan Summer Vacation Budget)
सर्वप्रथम आपण उन्हाळी सहलीवर किती खर्च करण्याच्या तयारीत आहोत, याचा एक आकडा काढायचा. जेणेकरून त्या बजेटनुसार तुम्हाला उन्हाळी सहलीचे नियोजन करता येईल. कारण बजेटनुसार सहल करणे हे कधी ही फायदेशीर ठरते. कमी खर्चात ही उत्तम सहल करता येते. सहलीमध्ये राहण्याचा, फिरण्याचा व जेवणाचा खर्च असतो. या तिन्ही गोष्टींवर अधिक खर्च न करता बचत कशी करता येईल हे खालीलप्रमाणे पाहुयात.
कमी खर्च व अधिक बचतमध्ये प्रवास करा (Travel with Low Fares and High Savings)
सर्वप्रथम उन्हाळी सहलीला कुठे जाण्याचा प्लॅन केला आहे, त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे. परदेशात जाणार असाल, तर विमान तिकिट आले. विमानाच्या तिकिटाचा खर्च हा अधिक असतो. त्यामुळे हा खर्च वाचविण्यासाठी विमान तिकिटाचे बुकिंग हे तीन ते चार महिन्यांपूर्वी करावे. जेणेकरून तिकिटाची किंमत कमी असते. त्यामुळे विमानाच्या तिकिटावर अधिक खर्च न करता या मार्गाने अधिक बचत होईल.
तसेच विकेंडऐवजी वीकडेजमध्ये विमान प्रवासाला प्राधान्य दयावे. कारण विकेंड म्हणजे आठवडयाच्या शेवटी तिकिटाचे दर जास्त असतात. वीकडेज म्हणजे आठवडयाच्या मध्ये कधी ही विमान प्रवासाचा प्लॅन करावा. जेणेकरून तिकिटाचे दर हे कमी असतात. त्यामुळे बचतीचा हा एक उत्तम मार्ग आहे.
राज्यात किंवा राज्याबाहेर उन्हाळी सहलीचा प्लॅन करत असाल, तर रेल्वेने प्रवास करणे हे कधी ही फायदेशीर ठरते. कारण रेल्वेचे तिकिट हे सामान्यांना परवडेल अशाच किंमतीत असतात.
दुसरे महत्वाचे म्हणजे कधी ही सलग सुट्टी व सणवार असेल तर हमखास तिकिटांचे दर वाढते. तसेच बुकिंग ही हाउसफुल दाखविते. त्यामुळे रेल्वेचे तिकिट हे कधी ही आधीच बुक करून ठेवावे. जेणेकरून बचत तर होईलच पण प्रवास ही सुखकर व आनंददाय होईल.
जर तुम्ही तुमच्या शहराच्या जवळच ऊन्हाळी सहलीचे नियोजन करत असाल, तर शक्यतो कमी खर्च येण्यासाठी स्वत:ची गाडी न वापरता सार्वजनिक वाहतूकीने जाण्याचा प्लॅन करावा. जेणेकरून खर्च ही कमी होईन व बचत ही अधिक होईल.
प्रवासात जेवणाचा खर्च कमी येण्यासाठी टीप्स
शक्यतो समर व्हेकेशनमध्ये खाण्या-पिण्यावर अधिक पैसा खर्च होतो. पण लक्षात ठेवा आता बऱ्याच हाॅटेल्स, हाॅस्टेल्स व इतर ठिकाणी नाश्ता हा अगदी मोफत असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही राहण्यासाठी बुकिंग करता, त्यावेळीच चौकशी करायची की, नाश्त्याची मोफत सोय आहे का? त्यामुळे नाश्त्याचा खर्च वजा होतो व तुमची येथे एकप्रकारे मोठी बचत होईल.
प्रवासात काही हाॅटेल्स, बंगलो व अपार्टमेंन्टमध्ये स्वत: स्वयंपाक करण्याची सोयदेखील असते, त्यामुळे या ठिकाणीदेखील तुमची अधिक बचत होईल. तसेच स्ट्रीट फूड हे चवदार व कमी खर्चात उपलब्ध असते. त्यामुळे खाण्या-पिण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
प्रवासात राहण्यावर करा कमी खर्च
सहल कोणतेही असो, पण राहणे हा फार मोठा प्रश्न असतो. त्यात कमी खर्चात राहण्याची उत्तम व सुरक्षित सोय पाहिजे असेल तर त्या त्या शहरात समाजमंदिर, धर्मशाळा व मंदिरांच्या ठिकाणी भक्तनिवासदेखील स्वस्तात उपलब्ध असतात. या ठिकाणी जेवणाची सोय असल्यामुळे खाण्या-पिण्यावरदेखील मोठी बचत होईल. तसेच आजकाल राहण्यासाठी ओयो, मेक माय ट्रिप यांसारख्या अॅपच्या माध्यमातूनदेखील तुम्ही कमी खर्चात राहण्याची चांगली सोय करू शकतात. तसेच या अॅपच्या माध्यमातू सातत्याने काही ना काही आॅफर्स सुरू असतात.