• 31 Mar, 2023 07:51

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Physicswallah - Alakh Pandey : भौतिकशास्त्र विषय युट्यूबवर शिकवून त्यांनी कशी उभी केली 8000 कोटींची कंपनी

Physicswallah - Alakh Pandey

Image Source : http://www.instagram.com/

Physicswallah - Alakh Pandey: भारतातले एक यशस्वी स्टार्टअप उद्योजक अलख पांडे यांनी सोशल मीडियावर आपल्या लग्न समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. आणि या फोटोंबरोबर एक भावनिक पोस्टही आपल्या फॉलोअर्सना लिहिली आहे. आतापर्यंतच्या आयुष्यात तुमची साथ होतीच. आता नवीन आयुष्य सुरू करतानाही साथ असू दे असं ते म्हणतायत. या पोस्टच्या निमित्ताने अलख पांडे यांचा फिजिक्सवाला मधला प्रवास समजून घेऊया…

असं म्हणतात, एखादा उद्योग चालण्यासाठी तुमची कल्पना किती अभिनव आहे याला महत्त्व असतं. याचं एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अलख पांडे यांचा युट्यूब चॅनल फिजिक्सवाला - अलख पांडे. कोरोनाच्या काळात सगळ्यांनाच ऑनलाईन शिक्षणाचं महत्त्वं कळलं. रातोरात अख्खीच्या अख्खी शाळा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हलली.

पण, त्यापूर्वीच फिजिक्सवाला अलख पांडे हे युट्यूब चॅनल सुरूही झालं होतं. आणि दिवसातून काही तास आपली सेवा देत होतं. पहिलेपणाचा फायदा अलख पांडे यांना असा झाला की, मागच्या तीन वर्षांत त्यांचा उद्योग काही हजार करोडमध्ये पोहोचला आहे.

त्यांच्या युट्यूब चॅनलचं नावही सगळ्यांना आपलं आणि सोपं वाटेल असं, फिजिक्सवाला पांडे. तसं म्हटलं तर सलमान खानच्या एखाद्या सिनेमात हे नाव सहज खपेल. आज युट्यूबवर अलख पांडे यांची व्याख्यानं ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांना तरी हे नाव आणि अलख पांडे सर खूप जवळचे वाटत आहेत. त्यांनी हे नाव आणि आपला युट्यूब चॅनल कसा मोठा केला हे पाहूया…

Physics Wallah पांडे या चॅनेलची आयडिया कशी डोक्यात आली?

एक मुलाखतीमध्ये अलख पांडे यांनी सांगितले की, एका संस्थेत मी मुलांना शिक्षण देण्यासाठी जात होतो, त्यावेळी त्या संस्थेच्या संस्थापकांनी मला युटयुब चॅनल  सुरू करण्याचा सल्ला दिला.  मला त्यांचा हा सल्ला मनापासून खूप आवडला. त्यांच्या या सल्ल्याने मी 2015 मध्ये Physics Wallah हे युटयुब चॅनल सुरू केले.

सुरूवातीला पाहिजे तसे यश मिळाले नाही. तरी शांत न बसता पांडे यांनी फिजिक्स वर Jee आणि नेट परीक्षांवरचे काही व्हिडीओ युटयुब चॅनेलवर अपलोड करणं सुरूच ठेवलं. 2017 मध्ये त्यांच्या प्रवासात मित्र प्रतीक माहेश्वरी सामील झाले. आता तांत्रिक बाजू उजवी झाली. पण, इंटरनेटचा वेग आणि दर्जा तितकासा चांगला नव्हता. त्यामुळे युट्यूब चॅनलला अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.

चॅनेलला कधी वेग मिळाला?

Physics Wallah या चॅनेलला खरा वेग तर कोरोना काळात मिळाला. कारण त्यावेळी सुरू झालेल्या ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधेमुळे या चॅनेलला खूप फायदा झाला. कोरोना काळात हे चॅनेल एकदम सुपरहीट झाले. म्हणता म्हणता सध्या या युटयुब चॅनलचे सब्सक्राइबर 97 लाखापेक्षा ही अधिक आहेत.

नियमित फिजिक्स शिकवण्याबरोबरच पांडे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रमही शिकवतात. अशा कोर्सेसना खूप मागणी आहे.

फिजिक्स किंवा भौतिकशास्त्र हा अवघड विषय आहे. तो पांडे यांना अवगत होता. पण, ज्ञानाचा कौशल्यपूर्ण उपयोग करून पांडे यांनी कमी पैशात उद्योगाचा मोठा डोलारा उभा केला आहे.

Alakh Pandey
http://www.forbesindia.com/

प्रसिध्दी पाहता, करोडोच्या आल्या ऑफर पण नाकारल्या

Physics Wallah चॅनेलची प्रसिध्दी पाहता, Unacademic यांनी पांडे यांना 75 करोडची ऑफर दिली पण त्यांनी ती नाकारली. कारण त्यांच्या अनुभवामुळे त्यांना शिक्षण घेण्यास ज्या अडचणी आल्या होत्या, ते इतर विद्यार्थ्यांना येऊ नये. म्हणून त्यांनी या करोडोंच्या ऑफरचा स्वीकार करण्यास नकार दिला. ज्यावेळी Unacademic व Byju’s ऑनलाइन प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रूपये फी घेते होते, त्यावेळी पांडे हे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी अडचण येऊ नये, म्हणून फक्त 999 रूपये इतकीच फी आकारत होते.

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशनची केली सुरूवात

पांडे यांच्या ऑनलाइन अप्लिकेशनला विद्यार्थ्यांचा तगदा प्रतिसाद मिळाला. देशातील काना-कोपऱ्यातून विद्यार्थ्यी यासोबत जोडले गेले. Android Play Store वर 50 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे.

तसेच त्यांनी सोशल मिडीयावर वाढता प्रतिसाद पाहता, नवीन कोचिंग जिक्सवालाचीदेखील सुरूवात केली. एक महिन्याच्या आतच यामध्ये 10 हजार विद्यार्थ्यांनी अ‍ॅडमिशन घेतली.

वयाच्या 30 मध्ये 8000 कोटींचा टर्नओव्हर

आज फिजिक्सवाला पांडे ही भारतातील एक खूप मोठी यूनिकार्न कंपनी आहे. आजच्या काळात या कंपनीची व्हॅल्यूशन 8000 करोड रूपये इतकी आहे. या संस्थेच्या अंतर्गत जवळपास 6 मिलियन विद्यार्थ्यी शिक्षण घेत आहे, तर 1500 पेक्षा अधिक प्रशिक्षक ऑनलाइन शिक्षण देत आहेत.

Physics Wallah Pandey to get married
http://www.instagram.com/

यशस्वी उदयोगकर्ता शिवानी दुबेसोबत अडकला लग्नबंधनात

22 फ्रेबुवारी 2023 रोजी अलख पांडे हा पत्रकार शिवानी दुबे लग्नबंधनात अडकला आहे. लग्नाचा हा आनंद सोशलमिडियावर शेयर करता त्यांनी पोस्ट लिहिली की, जीवनातील खास दिवसांपैकी एक दिवस म्हणजे 22 फ्रेबुवारी 2023. शिवानी दुबे ही माझी पत्नी बनली आहे. तुम्हा लोकांना आमंत्रित केले नाही. कारण आमंत्रित करणे शक्य नव्हते. पण मुलांना व पत्नी खूप सारे प्रेम.

अलख पांडे व त्यांच्या कुटुंबाविषयी

अलख पांडे यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1991 रोजी उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सतीश पांडे तर आईचे नाव रजत पांडे आहे. तर त्यांच्या बहिणीचे नाव अदिती पांडे असे आहे. हे एक मध्यमवर्गीय कुटुंब आहे. त्यांच्या आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. तसेच त्यांच्या आई-वडिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वत:चे घरदेखील विकले असल्याचे सांगितले जाते. मात्र या सर्व परिस्थितींवर मात करत अलख पांडे संघर्ष करत राहिले, त्यांनी कधीच हार मानली नाही आणि आज आपल्या यशाच्या बळावर त्यांनी हा नवीन इतिहास रचला आहे.

3 हजार ते 8 हजार करोड रूपये कमाई

अलख पांडे यांना लहानपणापासून वाचनाची व लिहिण्याची खूप आवड होती. त्यांनी प्राथमिक शिक्षण प्रयागराज येथेच घेतले. जेथे त्यांना हायस्कूल आणि इंटरमिजिएट परीक्षेत 90% पेक्षा जास्त टक्के मिळाले. हायस्कूल परीक्षेत त्यांना 91% प्राप्त झाले तर इंटरमिजिएट परीक्षेत 93.5% मिळाले. मात्र पुढील शिक्षणासाठी पैशांची गरज पाहता, त्यांनी वेळीच जबाबदारी ओळखून लहान मुलांना शिकवायला सुरुवात केली. त्यांना सुरुवातीला या माध्यमातून 3 हजार रूपये मिळत असत. पण आज त्यांनी याच 3 हजार रूपयांचे 8 हजार करोड रूपये करत. तरूणांसमोर एक आदर्श उभा केला आहे.