• 27 Mar, 2023 06:33

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Phone Pe वरून परदेशात करता येणार पेमेंट, लवकरच सुरू होणार ही सुविधा

Payments can be made abroad from Phone Pe

Phone Pe व्दारे आंतरराष्ट्रीय पेमेंट करण्याची सुविधा लवकरच सुरू होणार आहे. यामुळे आता आंतरराष्ट्रीय व्यवहार करताना आता अडचणी येणार नाही. परदेशात कोणताही आर्थिक व्यवहार करणे अधिक सोपे व सोईस्कर जाणार आहे.

Payments Can be Made Abroad from Phone Pe: आता  Phone Pe ने पैशांचा व्यवहार हा आॅनलाइन पध्दतीने करणे अधिक सोपे झाले आहे. पण तुम्हाला माहिती का, Phone Pe वरून आता थेट तुम्ही आपल्या परदेशात असणाऱ्या मुलाला, भावाला, बहिणीला, पत्नीला, मित्राला व इतर कोणत्या ही नातेवाइकाला सहज पैसे पाठवू शकता. म्हणजेच फोन पे वरून आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्याची ही सुविधा लवकरच सुरू होणार आहे.

ही सुविधा कोणत्या देशात आहे?

UPI च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यवहार (International Transaction) करण्याची सुविधा ही नेपाळ (Nepal), सिंगापूर (Singapore), भूतान (Bhutan) व य़ूएई (UAE) या देशात सुरू आहे. ही सुविधा फोन पे अॅपमध्ये सुरू करण्यासाठी UPI इंटरनॅशनल अॅक्टिव्हेट करणे गरजेचे आहे. आता भारतात पण ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

इंटरनॅशनल पेमेंटची ही सुविधा ठरणार फायदेशीर

 मागील सहा महिन्यात आम्ही संपूर्ण भारतात युपीआय पेमेंट रिवाॅल्यूशनचा अनुभव घेतला आहे. UPI च्या माध्यमातून ही सुविधा सुरू करणे हे आमच्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचे पहिले पाऊल आहे. तसेच परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीय लोकांची पेमेंट करण्याची पध्दत ही पूर्णपणे बदलणार असून ही सुविधा आमच्या कंपनीसाठी मोठी फायदेशीर ठरणार असल्याचे कंपनीचे सह-संस्थापक व मुख्य टेक्नोलाॅजी आॅफीसर राहुल चारी यांनी स्पष्ट केले.

एका महिन्यात 8 बिलियन पेक्षा जास्त ट्रान्झेक्शन 

येत्या काही महिन्यांत काही इतर फिनटेक अ‍ॅप्स देखील क्रॉस बॉर्डर UPI ला सपोर्ट करणार आहेत. UPI च्या माध्यमातून मागील महिन्यात 8 बिलियन पेक्षा जास्त ट्रान्झेक्शन झाले आहेत. UPI इंटरनॅशनल हे आताच्या NPCI च्या रोडमॅपवर आहे. विदेशी बाजारपेठेत UPI पेमेंट स्वीकारण्यासाठी व्यापाऱ्यांना ऑनबोर्डिंग करणे महत्वाचे आहे. पण हे काम ही भारताच्या NPCI साठी एका टेस्ट प्रमाणे असणार आहे. कारण व्यापाऱ्यांशिवाय UPI यूझर्स पेमेंट करू शकत नाही.

UPI मार्केटमध्ये PhonePe चा 49% हिस्सा 

डोमेस्टिक UPI मार्केटमध्ये, PhonePe, Google Pay, Paytm व CRD Pay या चार अ‍ॅप्सचा एकूण UPI मार्केट शेअर हा 96.4% आहे. भारतात UPI व्यवहारांमध्ये 49% वाटा हा PhonePe चे आहे. यानंतर गुगल पे 34% शेअर, पेटीएम 1.8% शेअर असे अनेक बॅंकिंग अॅप्सचा समावेश आहे.