• 31 Mar, 2023 09:42

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Festival Advance Scheme: होळीच्या निमित्ताने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार 10 हजार रूपये

Festival Advance Scheme

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. होळी सणाच्या निमित्ताने शासनाच्यावतीने 10 हजार रूपये देण्यात येणार आहे. शासनाने स्पेशल फेस्टिवल अॅडव्हान्स योजने अंतर्गत ही रक्कम देण्याची घोषणा केली आहे. याविषयी सविस्तर जाणून घेवुयात.

आता, केंद्रिय कर्मचाऱ्यांचा होळीचा आनंद हा व्दिगुणीत होणार आहे. फेस्टिवल अॅडव्हान्स योजने अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांनी 10 हजार रूपये देण्यात येणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. मागील वर्षीदेखील या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना ही रक्कम देण्यात आली होती.

काय आहे ही योजना? (What is this Scheme)

होळी सणानिमित्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना फेस्टिवल अॅडव्हान्स योजने अंतर्गत (Festival Advance Scheme) 10,000 रूपये देण्यात येणार आहे. हे कर्मचारी होळी सण साजरा करण्यासाठी अॅडव्हान्समध्ये 10,000 रूपये घेऊ शकतात, यावर शासनाच्यावतीने कोणत्याही प्रकारचे व्याजदर आकारले जाणार नाही. तसेच कर्मचारी ही रक्कम 31 मार्चपर्यंत कधी ही खर्च करू शकतात.

 व्याजदर लागू  नाही (Interest Rate Not Applicable)

फेस्टिवल अडव्हान्स योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना दिलेल्या रक्कमवर कोणत्याही प्रकारचे व्याजदर आकारले जाणार नाही. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे, मात्र कर्मचाऱ्यांना फक्त ही रक्कम 31 मार्चपर्यंत खर्च करावी लागणार आहे. विशेष म्हणजे या अॅडव्हान्स रक्कमचा परतावा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना फक्त 1000 रूपये हप्ता बसणार आहे. त्यामुळे केवळ 10 हप्त्यातच ही रक्कम चुकविता येणार आहे.

डिजिटल पध्दतीने होणार खर्च (Expenditure to be Done Digitally)

केंद्रीय कर्मचाऱ्यांना फेस्टिव्हल अॅडव्हान्स योजने अंतर्गत सुमारे 4000-5000 कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. सांगितले जाते की, अॅडव्हान्स योजनेचे बँक शुल्कही सरकार देते. कर्मचारी ही अॅडव्हान्स रक्कम फक्त डिजिटल पद्धतीने खर्च करू शकतात. यापूर्वी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एलटीसी कॅश व्हाउचर योजनेसारख्या सुविधाही दिल्या आहेत.

LTC मध्ये काय फायदा आहे? (What is the Advantage in LTC)

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी प्रवास भत्ता योजनेत कॅश व्हाउचर योजना (एलटीसी कॅश व्हाउचर योजना) जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत, प्रवासी भत्त्याच्या बदल्यात कर्मचाऱ्यांना रोखीत रक्कम न घेता ही ती वस्तू व सेवा खरेदीसाठी वापरता येणार आहे.

मार्चमध्ये मिळणार महागाई भत्याचा लाभ

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारात वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना महागाईची चिंता करण्याची आवश्यकता नाही. साधारण महागाई भत्यात 4 टक्क्यांनी वाढ होणार आहे. किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवर दरमहा एकूण 720 रुपयांनी वाढ केली जाणार आहे. त्याच वेळी, 250000 रुपये पगार असलेल्यांची 12000 रुपयांनी वाढ होईल.