• 31 Mar, 2023 09:43

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Neetu Kapoor New Car: अभिनेत्री नीतू कपूर यांनी खरेदी केली लक्झरी कार, किंमत ऐकून व्हाल थक्क!

Neetu Kapoor Buys New Car

Image Source : http://www.businesstoday.in/

Neetu Kapoor New Car: बाॅलिवूड अभिनेत्री नीतू कपूर यांनी Mercedes Maybach GLS 600 ही लक्झरी कार खरेदी केली आहे. यांच्या या नवीन आलिशान कारची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या कारचे फिचर्सदेखील जबरदस्त आहेत.

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लाइफ स्टाइलची नेहमीच चर्चा होताना दिसते. त्यात त्यांनी काही महागडया वस्तू घेतल्या तर सोशल मिडियावर शुभेच्छांचा वर्षाव पडतो. नेमकी हाच शुभेच्छांचा वर्षाव सध्या बाॅलिवूड सुपरस्टार नीतू कपूर यांच्यासाठी सोशल मिडिया अकाउंटवर पडताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे त्यांनी खरेदी केलेली लक्झरी कार. त्यांच्या या लक्झरी कारची किंमत व फिचर्स जाणून घेवुयात. 

कोणती कार खरेदी केली आणि काय आहे किंमत? (New Car Name & Price)

बाॅलिवूड सुपरस्टार अभिनेत्री नीतू कपूर यांनी नुकतीच Mercedes Maybach GLS 600 ही लक्झरी कार खरेदी केली आहे. त्यांच्या या नवीन कारची किंमत तब्बल 2.92 करोड रूपये आहे. सोशलमिडियावर नेटकरी त्यांना मोठया प्रमाणात शुभेच्छा देताना दिसत आहे. 

लक्झरी कारचे फिचर्स (Features of a Luxury Car)

Mercedes Maybach GLS 600 ही लक्झरी कार एकदम प्रशस्त अशी आहे. यामध्ये देण्यात आलेल्या सुविधा या शानदार आहेत. जसे की, या कारचे सीटस् हे पावर लेदरचे असून आरामदायी असे आहे. तसेच फोल्डिंग टेबल व एक छोटा रेफ्रिजरेटरदेखील आहे.

त्याचबरोबर वेन्टिलेटेस मसाज सीटस् चा देखील समावेश आहे. शिवाय या गाडीचे इंटिरियरदेखील आकर्षक आहेत. 360 डिग्री कॅमेरा, मेमरी फंक्शन, पॅनोरॅमिक सनरूफ अशा अनेक स्टार सुविधादेखील आहेत. विशेष म्हणजे या कारमध्ये व्हाॅइस कमांड देणारी अशी जबरदस्त सिस्टम आहे. या गाडीचे सीट्स मागे-पुढेदेखील होतात. 

या कारमध्ये 4.0-लिटर व्टिन-टर्बो V8 इंजिन 550bhp आणि 730Nm टॉर्क निर्माण करण्याची शक्ती आहे. ही गाडी अत्यंत वेगवान असून याचा सर्वोच्च स्पीड हा 250 किमी प्रति तास आहे. 

अनेक रंगामध्ये ही लक्झरी कार विक्रीसाठी उपलब्ध आहे. जसे की, कॅव्हनसाइट (Cavansite Blue),एमराल्ड ग्रीन (Emerald Green), ब्रिलियंट ब्लू (Brilliant Blue), पोलर व्हाइट (Polar White), इरिडियम सिल्व्हर (Iridium Silver), आणि मोजाव्हे सिल्वर (Mojave Silver). मात्र बाॅलिवूडच्या या सुंदर अभिनेत्री नीतू कपूर यांनी एक मोनोटोन शेड रंगाची आलिशान कार स्वत:साठी निवडली आहे. 

सेलिब्रिटींमध्ये या गाडीची क्रेझ

बाॅलिवूडमध्ये Mercedes Maybach GLS 600 या लक्झरी कारची खूपच क्रेझ दिसत आहे. कारण दीपिका पदुकोन, कृती सेनन, आयुषमान खुराना, रणवीर सिंग, राम चरण या दिग्गज कलाकारांकडेदेखील ही रॉयल गाडी आहे. आता ही आलिशान गाडी नीतू कपूर यांनी वयाच्या 64 वयात खरेदी करून आपल्या चाहत्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे.