• 27 Mar, 2023 07:31

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Nawab Asifuddaula Holi: नवाब आसफुदौला होळीवर खर्च करत होते 50 करोड रूपये

Expensive Holi of Nawab Asifuddaula

नवाव आसफुदौला हे 1775 ते 1797 पर्यंत लखनऊचे नवाब होते. 22 वर्ष त्यांनी या ठिकाणी शासन केले होते. त्यावेळी ते होळी हा सण मोठया उत्साहात साजरा करत होते. जवळपास ते होळीचा उत्साह साजरा करण्यासाठी तब्बल 50 करोड रूपये इतका खर्च करत होते.

Expensive Holi of Nawab Asifuddaula: होळी हा सण 7 मार्च  2023 ला संपूर्ण भारतात धूमधडाक्यात साजरी करण्यात येणार आहे. पण तुम्हाला माहिती का पूर्वीदेखील हा सण तितक्याच उत्साहात साजरा करत होते. विशेष म्हणजे हा सण हिंदू-मुस्लिम दोन्ही एकत्रित येऊन हा सण मोठया उत्साहात साजरा करत होते. त्यावेळी लखनऊचे नवाब हे होळी कशी साजरी करायचे? हे एेकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. कारण त्यावेळी अवधचे चौथे नवाब आसफुदौला हे होळी या सणावर तब्बल 5 लाख रूपये खर्च करत होते.

 नवाब आसफुदौला कोण होते?

नवाब आसफुदौला हे लखनऊ येथील अवध शहराचे चौथे नवाब होते. त्यांनी 1775 ते 1797 या काळात नवाबच्या रूबाबात शासन केले होते. नवाब आसफुदौला हे अवधचे तिसरे नवाब शुजाउदौला व बहू बेगम यांचे सर्वात मोठे चिरंजीव होते. ते आपल्या आई-वडिलांचे एकुलता एक मुलगा होते. ते लहानपणापासूनच भव्य व शानदार अशा नवाब वातावरणात वाढल्यामुळे त्यांना नेहमीच “बडे बाप की बिघडी हुई औलाद” असे म्हटले जायचे.

होळीला 50 लाख रूपये खर्च

नवाब आसफुदौला हे 1775 ते 1797 या वर्षांपर्यंत अवधचे नवाब होते. त्यांनी येथे तब्बल 22 वर्ष शासन केले होते. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या या 22 वर्षाच्या कालावधीत ते प्रत्येक वर्षीच्या होळीला 5 लाख रूपये खर्च करत असत. या पाच लाखाचा हिशोब पाहता, त्यांनी 22 वर्षात होळी या सणावर तब्बल  5 करोड रूपये इतका खर्च केला. म्हणजे नवाब हे होळी किती खर्चिक पध्दतीने साजरी करयाचे, हे यावरून दिसते.

नवाब होळी कशी साजरी करायचे?

आता नवाब होळी कशी साजरी करायचे याबद्दल देशातील अनेक इतिहासकारांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे. त्यांनी पुस्तकाच्या माध्यमातून सांगितले की, अवधचे नवाब आसफुदौला हे 1775 साली लखनऊ या ठिकाणी आले. त्यांनी होळी हा सण मोठया धुमधडाक्यात साजरा करण्याची सुरूवात केली. त्यावेळी नवाब हे फाल्गुन महिन्यात 5 लाख रूपये खर्च करायचे. विशेष म्हणजे, होळीचा सण साजरा करताना बेगम हे होळीवरील अप्रतिम गाणी आपल्या सुंदर आवाजात गात असत. तसेच बेगम व नवाब होळीच्या उत्साहात विविध सुंदर व आकर्षक कपडे घालायचे आणि अनेक रंगबेरंगी रंगानी ते होळीचा सण उत्साहात साजरा करायचे. या नवाबांच्या काळात संपूर्ण शहर होळीचा जल्लोष साजरा करत असत.

सआदत अली खान यांची होळी

नवाब असफुद्दौलानंतर अवधचे सहावे नवाब सआदत अली खानही होळी हा सण मोठया उत्साहात खेळायचे. इमामबाराच्या आवारात नवाब होळी साजरी करायचे. इतकेच नाही तर रुमी गेट, ज्याला लखनउची सिग्नेचर बिल्डिंग म्हटले जाते, येथे नवाब सामान्य लोकांसह रंगांचा उत्सव धुमधडाक्यात साजरा करत असत.

संपत्तीसाठी आईला केले नजरकैद

नवाब आसफुदौला हा लहानपणापासूनच श्रीमंताच्या घरात वाढल्याने त्याला कोणत्याही गोष्टींची कमी नव्हती. त्याने वडिलांच्या निधनानंतर आईकडे 6 लाखांची मागणी केली. आईने त्याला ते सहा लाख रूपयेदेखील दिले. यानंतर आणखी 4 लाख रूपये मागितले, मग ते ही कमी पडल्यावर त्याने थेट फैजाबाद गाठले आणि आपल्या संपत्तीचा काही भाग बेगमकडे गहाण ठेवून चार लाख रुपये उसने घेतले. हा प्रकार इथेच थांबले नाही. यानंतर, त्याने बहू बेगमची संपत्ती हडप करण्यासाठी, तिला नजरकैदेत ठेवले आणि तिच्यावर अत्याचार केला. बळजबरीने बहू बेगम यांनी त्याला 31 लाख रुपये, 70 हत्ती, 860 बैलगाड्या आणि अनेक मौल्यवान दागिने त्याला दिले.