• 27 Mar, 2023 07:00

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Oscar for The Song Natu-Natu: 'नाटू-नाटू' गाण्याला ऑस्कर, असा आहे कोरिओग्राफर प्रेम रक्षितचा रंजक प्रवास

Oscar for the song 'Natu-Natu'

Oscar for The Song Natu-Natu: एस. एस. राजमौली दिग्दर्शित RRR चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. कोरियोग्राफर प्रेम रक्षित यांनी बसविलेल्या या डान्सचे जगभरातून कौतुक होताना दिसत आहे. आज या गाण्याने जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे.

RRR Movie: प्रेम रक्षित यांना दिग्दर्शक एस.एस.राजमौली यांनी कोरियोग्राफसाठी ऑफर केल्यानंतर, त्यांच्या मनातील आत्महत्या करण्याचा विचार बदलला. पण आज त्यांच्या नाटू-नाटू गाण्याने त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला आहे. त्यांच्या याच कोरियोग्राफीने त्यांचे नशीब पालटले आहे. त्यांनी एकेकाळी टेलर व्यवसायदेखील केला होता. आज त्यांच्या संघर्षाची कहानी जाणून घेऊयात. 

का करणार होते आत्महत्या?

 Naatu-Naatu या गाण्याचे कोरियोग्राफर प्रेम रक्षित (Prem Rakshit) यांनी 'डेक्कन क्रॉनिकल' यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये हा आत्महत्येचा किस्सा सांगितला आहे. रक्षित म्हणाले, एकेकाळी मी टेलरचा व्यवसाय करत होतो. तर वडील चित्रपटात डान्स असिस्टंट म्हणून काम करत होते. पण या तुटपुंज्या पैशांवर कुटुंब सांभाळणे खूप अवघड झाले होते. त्यामुळे माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीदेखील खूप बिकट झाली होती. त्यावेळी मला माझ्या परिवाराची खूप चिंता वाटत होती. म्हणूनच माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला. कारण त्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून मी आत्महत्या केली तर माझ्या कुटुंबाला डान्स युनियन फेडरेशन यांच्याकडून 50 हजार रूपये देण्यात येईल. या विचाराने मी आत्महत्या करण्याचा विचार केला होता.  

नाटू-नाटूची मिळाली ऑफर

प्रेम रक्षित म्हणाले, मी आत्महत्या करण्यासाठी चेन्नईच्या मरिना बीचला सायकलने निघालो होतो. ही सायकल मी उधारीने घेतली होती. पण सायकल मालक कुटुंबाकडे उधारीचे पैसे मागण्यासाठी जाईन या विचाराने मी आत्महत्येचा विचार बदलला व त्वरित घरी पोहोचलो. पण त्याचवेळी वडीलांनी सांगितले की, तुला एका चित्रपटातील गाण्यावर डान्स बसविण्याची ऑफर आली आहे. त्याचवेळी राजमौली यांची ओळख झाली व मला पुढे हे गाण्याची ऑफर मिळाली. 

नाटू-नाटू गाण्याची शुटिंग थेट युक्रेनमध्ये 

रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये ज्यावेळी युद्ध चालले होते, त्यावेळी ऑस्कर पुरस्कार प्राप्त नाटू-नाटू या गाण्याची शुटिंग युक्रेनच्या राष्ट्रपती भवनमध्ये सुरू होती. तसेच त्यावेळी भारत कोरोना महामारीचा सामना करीत होता. पण तरीही युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर जेलेंस्की यांनी परवानगी दिली. कारण ते स्वत: एक उत्तम कलाकारदेखील आहेत. या राष्ट्रभवनात हे सुपर-डुपर हीट गाण्याची रिहर्सल करण्यासाठी रामचरण (Ram Charan) व जुनियर एनटीआर (Jr. NTR) यांना एक महिना लागला होता. तर या गाण्याची शुटिंग दोन आठवडयात पार पडली.  

नाटू नाटू गाण्याची हुक स्टेपसाठी 110 पर्याय 

नाटू-नाटू या गाण्यावर संपूर्ण जगभरात मनसोक्त डान्स केला. त्यांच्या या गाण्याच्या हूक स्टेपवर तर संपूर्ण सोशल मिडीया रंगला होता. पण तुम्हाला माहिती का या हुक स्टेपसाठी प्रेम रक्षित यांनी तब्बल 110 पर्याय दिले होते. एवढया प्रयत्नानंतर आज ही हूक स्टेप आपल्यासमोर आली आहे. या गाण्यामध्ये 50 बॅकग्राउंड डान्सर व जवळपास 400 ज्यूनियर आर्टिस्ट होते. हे गाणे ऑगस्ट 2021 मध्ये शुट करण्यात आले होते. 

या गाण्याने अनेक रेकॉर्डस् मोडले

ऑस्कर विजेते नाटू-नाटू हे गाणे 10 नोव्हेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाले होते. हे गाणे युटयुबवर प्रदर्शित होताच या गाण्याच्या तमिळ वर्जनला 24 तासात तब्बल 17 मिलियन व्हूज मिळाले होते. तर बाकी 5 भाषेत प्रदर्शित झालेल्या गाण्याला 35 मिलियन व्ह्यूज होते. विशेष म्हणजे तेलगू भाषेतील हे गाणे 1 मिलियन लाइक्सचा टप्पा पूर्ण करणारे पहिले गाणे होते. सध्या हिंदी व्हर्जनमधील गाण्याला यूटयुबवर 265 मिलियन व्ह्यूज तर 2.5 मिलियन लाईक्स आहेत. विशेष म्हणजे या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कारदेखील मिळाला आहे. हा पुरस्कार मिळणारा आशिया खंडातील हे पहिले गाणे होते.तसेच सांगण्यात येते की, या गाण्याचे शुट करण्यासाठी तब्बल 1.84 मिलियन अमेरिकन डॉलर्स इतका खर्च करण्यात आला आहे. 

20 गाण्यांमधून झाले नाटू-नाटू गाण्याचे सिलेक्शन 

आरआरआर या चित्रपटासाठी चंद्रबोस यांनी 20 गाणी लिहिली होती. या 20 गाण्यांमधून नाटू-नाटू या गाण्याचे सिलेक्शन करण्यात आले होते. या गाण्याचा जवळपास 90 टक्के भाग हा फक्त एका दिवसात तयार करण्यात आला होता, तर 10 टक्के भाग फक्त शिल्लक राहिला होता. मात्र तरीही या गाण्याचा हा शिल्लक भाग पूर्ण करण्यासाठी संपूर्ण 19 महिने इतका अवधी लागला होता.  

RRR या सुपरहीट चित्रपटाची कमाई 

एस.एस.राजमौली (S. S. Rajamouli) दिग्दर्शित आरआरआर चित्रपटाची देश व विदेश पाहता, एकूण कमाई 12000 कोटींची होती. वर्ल्ड वाइड सर्वाधिक कमाई करणारा हा भारतातील तिसरा चित्रपट आहे. तसेच हा चित्रपट 550 कोटी रुपयात बनविण्यात आला होता. तसेच या RRR चित्रपटात दिग्दर्शक राजमौली यांनी एका गावाचा फक्त सेट बनविण्यासाठी तब्बल 18 कोटी रुपये खर्च केले होते. या चित्रपटाच्या संपूर्ण शुटिंगसाठी 300 दिवस इतका कालावधी लागला होता. आज मात्र या चित्रपटाने जागतिक स्तरावरील सर्वात्कृष्ट असा ऑस्कर पुरस्कार जिंकून प्रत्येक भारतीयांची मान उंचावली हे नक्की.