फ्रीजच्या जमान्यात ही आता माठ खरेदीचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे यंदा उन्हाळयात माठाला अधिक मागणी असल्याचे सांगितले जाते. सर्वसामान्यांना परवडणारा व गरीबांचा फ्रीज असणाऱ्या या माठाची बाजारात काय किंमती आहेत, हे पाहुयात.
माठाची वाढली मागणी
माठ हा मातीचा बनवलेला असल्यामुळे यातील पाणी नैसर्गिकरीत्या थंड होते. हे पाणी शरीरासाठी चांगले असते. तर कृत्रिम फ्रीजच्या थंडगार पाण्याने मानवी शरीरावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे लोकांची पाऊले ही फ्रीजकडे न वळता माठ खरेदीच्या दिशेने वळू लागली आहेत.
माठाच्या किंमतीत वाढ
यंदा उन्हाळयात लोकांना फ्रीज खरेदी न करता मातीने तयार करण्यात आलेले माठ मोठया प्रमाणात खरेदी करत असल्यामुळे या माठाच्या किंमतीत वाढ झाली आहे. ही वाढ सर्वासाधारण 20 ते 25 टक्क्यांनी झाली असल्याचे सांगितले जात आहे.
माठाच्या किंमतीत का झाली वाढ?
गरीबांचा फ्रीज असणारा हा माठ बनविताना कोळसा, भुसा, माती अशा विविध गोष्टींची गरज असते. मात्र या सर्व गोष्टींच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे माठाच्या किंमतीमध्येदेखील वाढ झाली आहे. तरी या वाढीचा ग्राहक खरेदीवर काही परिणाम झाला नाही. ग्राहक मोठया प्रमाणात माठ खरेदी करताना दिसत आहेत.
बाजारातील माठाच्या किंमती
ऊन्हाळा सुरू होताच बाजारात लाल, काळया रंगाचे माठ पाहायला मिळत आहेत. तसेच नळ असलेल्या माठांची किंमत सर्वाधिक आहे. माठांच्या आकारावर त्याच्या किंमती अवलंबून असतात. पण सर्वसाधारणपणे या माठाच्या किंमती या 120 रूपयांपासून सुरू होते. तर ते 400 ते 500 रूपयांपर्यंत मिळते. मोठया रांजणच्या किंमती या 400 ते 600 रूपये आहे. यंदा पांढरे व सुंदर डिझाइन केलेले माठदेखील बाजारात उपलब्ध आहे. तसेच नळ असलेल्या माठाच्या किंमती थोडया अधिक असतात.

माठातील पाणी पिण्याची आरोग्यदायी फायदे
माठातील पाणी ही नैसर्गिकरीत्या थंड होत असल्यामुळे त्याचा आरोग्यावर काहीही परिणाम होत नाही. तसेच ऊन्हाळयात फ्रीज अधिक वेळ सुरू असतो, त्यामुळे लाइट बिलातदेखील मोठी वाढ होते. माठ हा स्वस्त व पर्यावरणपूरक आहे.
माठ तयार करण्यासाठी जी माती वापरतात त्यामध्ये थोडया प्रमाणात मिनरल्स व इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जाचा समावेश असतो. त्यामुळे माठात पाणी ठेवले की मातीचे हे गुणधर्म पाण्यात मिसळतात. त्यामुळे हे पाणी शरीरासाठी चांगले असते.
शरीरातील कार्य हे कधी ही अॅसिडिक असण्यापेक्षा अल्कलाईन असेल तर ते आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. आणि माती हे नैसर्गिरीत्या अल्कलाईन असते. त्यामुळे ते मातीच्या माठातून शरीरास प्राप्त होते.
मातीच्या माठामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्स नाहीत. याउलट माठातील पाणी कधी ही शरीरास आरोग्यदायी असते. व त्यातील पाणी कधी ही दुषित होत नाही.
मातीच्या माठातील पाण्यामुळे मेटॅबाॅलिझम (चयापचय) अधिक सुधारते.
माठातील पाण्यामुळे घशावर काहीही परिणाम होत नाही. हे पाणी उलट घशासाठी उत्तम असते.
लाल की काळा माठ खरेदी करावा ?
लाल व काळा या दोन्ही रंगापैकी काळा माठ खरेदी करावा. कारण नैसर्गिकरीत्या काळया रंगाच्या माठात अधिक पाणी थंड होते. माती ही काळया खडकापासून तयार होते. त्यामुळे ही माती सर्रास मिळते. माठ तयार करण्यासाठी माती ही नैसर्गिकरीत्या सर्वोत्तम असते. ग्राहकदेखील अधिक प्रमाणात काळा रंगाचे माठ खरेदी करतात. काळा माठच्या तुलनेत लाल व पांढऱ्या रंगाच्या माठात पाणी थंड होत नाही.
लाल रंगाचे ही माठ बाजारात उपलब्ध असतात. लाल मातीपासून हे माठ तयार करतात. विठा बनविण्यासाठी जी माती वापरतात, तीच माती माठ तयार करण्यासाठी वापरली जाते. हे माठ अधिक आकर्षक असतात. पण काळया रंगाच्या माठाच्या तुलनेत लाल रंगाच्या माठात पाणी अधिक थंड होत नाही.