• 26 Mar, 2023 13:53

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MC Stan Concert: एमसी स्टॅनच्या पहिल्या कॉन्सर्टची तारीख बदलली, जाणून घ्या कधी, कुठे व तिकिटाची किंमत

MC Stan Concert Ticket Cost

Image Source : http://www.maharashtratimes.com/

बिग बॉस 16 विजेता एमसी स्टॅनच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. एमसीच्या भारत टूरला सुरूवात झाली असून, त्याचा पहिलाच कॉन्सर्टचा श्री गणेशा हा तो राहत असलेल्या पुणे शहरातून 3 मार्चला होणार होता. पण अचानक पुण्यातील कसबा व पिंपरी-चिंचवडच्या पोट निवडणुकीमुळे हा कॉन्सर्ट पुढे ढकलण्यात आला आहे.

MC Stan Concert Ticket Prize: रॅपर एमसी स्टॅनने बिग बाॅस विजयाची ट्राॅफी जिंकल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एवढेच नाही, तर इंन्स्टाग्राम लाइव्ह व्हिडीओमध्येदेखील विराट कोहलीला त्याने मागे टाकले आहे. लोकप्रियतेचे सर्व रेकाॅर्डस तोडत तो पुढे जात आहे. अशा या प्रेक्षकांचा लाडका रॅपर एमसी स्टॅन हा लवकरच पहिला कॉन्सर्ट घेऊन येत आहे. त्याच्या या पहिला कॉन्सर्टच्या तिकिटाची किंमत ऐकून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल.

कॉन्सर्ट कुठे व कधी आहे? (Where and when is the Concert)

बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅनच्या भारत टूरला सुरूवात झाली आहे. त्याचा हा पहिलाच कॉन्सर्ट पुणे शहरातील अॅमनोरा माॅल येथे रंगणार आहे. हा कॉन्सर्ट 3 मार्चला आयोजित केला होता. पण पुण्यातील कसबा व चिंचवडच्या पोट निवडणुकीमुळे हा  कॉन्सर्ट पुढे ढकलण्यात आला आहे. आता एमसी स्टॅनचा पहिला कॉन्सर्ट 3 मार्च एेवजी 19 मार्चला होणार आहे. 

त्यामुळे मोठया प्रतिक्षेनंतर अखेर एमसीच्या चाहत्यांना त्याचे रॅप ऐकण्याची संधी मिळणार आहे. तसेच त्याच्या कॉन्सर्टची प्रतिक्षा अधिक बाॅलिवूड सेलेब्रिटी व बिग बाॅसचे सदस्य शिव ठाकरे, निर्मित कौर आहलुवालिया, अब्दु रोजाक म्हणजेच त्याची मंडली देखील करत होती. त्यामुळे या कॉन्सर्टला कोण उपस्थित राहणार याचीदेखील उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

कॉन्सर्टच्या तिकिटांची किंमत काय आहे? (Price of Concert Tickets)

एमसी स्टॅनचा पहिला कॉन्सर्टचा आवाज पुणे शहरात घुमणार आहे. त्यांच्या या कॉन्सर्टच्या तिकिटांची किंमत ही वेगवेगळी आहे. 999 पासून या कॉन्सर्टच्या तिकिटाचे दर सुरू झाले असून ते तब्बल 4000 रूपयांपर्यंत आहे. 

तर फॅन झोन विभागातील तिकिटांची किंमत ही 2499 रूपये आहे. सर्वात अधिक असलेल्या चार हजार रूपयांच्या तिकिटांमध्ये प्रेक्षकांना एमसी स्टॅनला ऐकण्यासोबतच जवळून पाहण्याची देखील संधी मिळणार आहे.

कसे बुक कराल तिकिट? (How to Book Tickets)

एमसी स्टॅनच्या पहिल्या कॉन्सर्टची तिकिट प्रेक्षकांना बुक माय शो (Book My Show) या अॅपवरून बुक करता येणार आहे. हा कॉन्सर्ट तब्बल दोन तास अॅमनोरा माॅल येथे रंगणार आहे. आतापर्यंत या कॉन्सर्टची तिकिट विक्री काही प्रमाणात विकली ही गेली आहेत. त्यामुळे 3 मार्चची संध्याकाळ ही प्रेक्षकांसाठी नक्कीच आनंददायी असणार आहे.

एमसी स्टॅनचे ओरिजिनल नाव (MC Stan's Original Name) 

एमसी स्टॅनचे ओरिजिनल नाव हे अल्ताफ शेख आहे. तो पुणे शहरातील ताडीवाला रोड या भागातून लहानाचा मोठा झाला आहे. वयाच्या 12 व्या वर्षापासून त्याने कव्वाली गाण्यास सुरू केली होती. 

तसेच तो प्रसिध्द रॅपर रफ्तारसोबतदेखील स्टेज शो करायचा. एमसीने अनेक गाणे गायले आहे पण त्याला ‘वाटा’ या गाण्याने अधिक लोकप्रियता मिळवून दिली आहे. त्याच्या या गाण्याला युटयूबवर 21 लाखांपेक्षा अधिक व्हूज मिळाले होते.

एमसी स्टॅनच्या कमाईचा आकडा (MC Stan Networth)

रॅपर एमसी स्टॅनची लोकप्रियता ही प्रचंड आहे. बिग बाॅस 16 चा विजेता बनल्यानंतर त्याच्या फाॅलोवर्सची संख्या ही मोठया प्रमाणात वाढली आहे. पण त्याचे फॅन्स म्हणतात की, एमसी स्टॅन हा बिग बाॅसमुळे सुपरहीट नाही झाला तर बिग बाॅस हा शो त्याच्यामुळे सुपर-डुपर हीट झाला आहे. त्यामुळे त्याच्या या प्रसिध्दीचा अंदाज आपण लावू शकतो. 

तो बिग बाॅस 16 च्या प्रीमियरवर 60-70 लाखाचा हिंदी लिहिलेला नेकलेस व 80 हजाराचे शुज घालून आला होता. त्याच्या या शुजची चर्चा सोशलमिडीयावर अधिक झाली होती. एमसी स्टॅनचा नेटवर्थ हा 50 लाखाच्या आसपास आहे. तो गाणे, युटयूब व कॉन्सर्टने लाखों रूपयांची कमाई करतो. या रॅपरची वयाच्या 23 व्या वर्षीच करोडो रूपयांची संपत्ती आहे.