• 26 Mar, 2023 14:11

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Top 5 Richest Celebrity in Bollywood: जाणून घ्या, बॉलिवुडचे सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी कोण आहेत?

Bollywood Celebrity Net Worth

बॉलिवुड सेलिब्रिटीची लक्झरी लाइफ स्टाइलचे सर्वांनाच अप्रुप असते. त्यांच्या कपडयांपासून ते गाडयांपर्यंत प्रत्येक गोष्टींचे कलेक्शन हे खूपच महागडे असते. त्यांच्या एक एक वस्तू या लाखात किंवा कोटींच्या घरामध्ये असते. या सर्वं गोष्टी समोर ठेवून बॉलिवुडमध्ये सर्वात श्रीमंत कोण आहेत, हे रिपोर्टच्या माहितीनुसार जाणून घेवुयात.

Richest Celebrity in Bollywood: बॉलिवुड सेलिब्रिटींच्या लक्झरी लाइफ स्टाइलविषयी जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक असतो. त्यांची ही लक्झरी लाइफ खूपच महागडी असते. त्यांच्याजवळ असलेल्या प्रत्येक गोष्टींची सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात चर्चा होत असते. कारण त्या वस्तूंच्या किंमतीदेखील अवाक् करणाऱ्या असतात. चला, तर मग पाहूयात या बाॅलिवुड फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वाधिक श्रीमंत सेलेब्रिटींची यादी.

शाहरूख खान (Shah Rukh Khan)

shahrukh khan (2)
http://www.abplive.com/

बॉलिवुडचा पठाण, किंग खान शाहरूख खान याच्या नावावर एकूण संपत्ती तब्बल 6289 करोड रूपयांची आहे. नुकत्याच त्याच्या पठाण या चित्रपटाने जागतिक स्तरावरील बाॅक्स ऑफिसवर 1000 करोड रूपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने जवळजवळ कमाईबाबतचे सर्वंच रेकाॅर्ड तोडत बाॅक्स ऑफिसवर जादू केली आहे.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)

amitabh bacchan (2)
http://www.mid-day.com/

बिग बी यांची एकूण नेटवर्थ 3396 करोड रूपये इतके आहे. अमिताभ हे वर्षाला जवळजवळ 60 करोड रूपये इतकी कमाई करतात. तसेच महिन्याला त्यांच्या कमाईचा आकडा हा 5 करोड रूपयांच्या घरात असतो. बिग बी सध्या कौन बनेगा करोडपती या रियालिटी शो च्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यांच्या या शो चा मोठा चाहतावर्ग आहे.

सलमान खान (Salman Khan)

salman khan (2)
http://www.hindustantimes.com/

दबंग खान म्हणून ओळख असणाऱ्या सलमान खानचा फॅन फाॅलोविंग जबरदस्त आहे. सलमान भाईच्या संपत्तीबाबत बोलायचे झाले तर, तो एकूण 2900 करोड रूपयांचा मालक आहे. कलर्स वाहिनीवरील नुकताच बिग बाॅस 16 चा सिझन संपला. या रियालिटी शो ची फी त्याने 1000 करोड रूपये घेतल्याची चर्चा आहे.

अक्षय कुमार (Akshay Kumar)

akshay kumar (2)
सध्या अक्षय कुमारचा सेल्फी हा बिग बजेट चित्रपट फ्लाॅप झाल्याची खूप चर्चा रंगत आहे. कारण या खिलाडी कुमारचे एकापाठोपाठ एक तब्बल 16 चित्रपट फ्लाॅप झाले आहे. पण तरी त्याच्या संपत्तीचा आकडा हा करोडोंच्या घरात आहे. आता अक्षय कुमारच्या नावावर 2000 करोड रूपये इतकी संपत्ती आहे. तो वर्षाला 210 करोड रूपये कमवितो.

ऋतिक रोशन (Hrithik Roshan)

rutik roshan (2)
http://www.bollywoodhungama.com/

ऋतिक रोशनचे नेटवर्थ हे 3000 करोड रूपये इतके आहे. हा अभिनेता एका चित्रपटासाठी तब्बल 35 ते 70 करोड रूपये इतके मानधन घेतो. एवढेच नाही, तर ऋतिकच्या आलिशान बंगल्याची किंमत ही साधारण 100 करोड रूपये आहे. तसेच त्याच्याकडे एक से एक लक्झरी कार्स व बाइक्सचे कलेक्शन आहे.