• 31 Mar, 2023 08:39

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जाणून घ्या, महिलांना सेव्हिंग खात्यावर कॅशबॅकसह आणखी कोणत्या सुविधा प्राप्त होतात?

women benefit from a savings account

Image Source : http://www.ibtimesindia.com/

तुम्हाला माहिती का, भारतातील कित्येक बॅंका महिलांना स्पेशल सेव्हिंग अकाउंट उघडण्याची परवानगी देत आहेत. एवढेच नाही, तर यासोबतच या सेव्हिंग खात्यावर त्यांना अनेक सुविधांचादेखील पुरवठा करीत आहेत. या कोणत्या सुविधा आहेत, हे जाणून घेवुयात.

Women Benefit from a Savings Account: देशात अशा अनेक बॅंका आहेत, ज्या महिलांसाठी सातत्याने नवनवीन योजना आणत असतात. जसे की, आता बॅंका या महिलांना स्पेशल सेव्हिंग अकाउंट उघडण्याची परवानगी देत आहे. तसेच या खात्या अंतर्गत महिलांना अनेक सुविधादेखील उपलब्ध करून देत आहेत.

आरबीएल बॅंक (RBL Bank)

महिला या आरबीएल बॅंकेच्या माध्यमातून वुमन फर्स्ट सेव्हिंग या बचत खात्यात पैसे जमा करू शकतात. या बॅंकेत महिलांना 1 लाख रूपयांच्या डिपाॅझिटवर 4.5 टक्के, 1 लाख ते 10 लाख रूपयांच्या डिपाॅझिटवर 5.50 टक्के तर 10 लाख ते 25 लाख रूपयांच्या डिपाॅझिटवर 6 टक्के व्याजदर उपलब्ध करून देते.

आयसीआयसीआय (ICICI Bank)

ICICI या बॅंकेच्या अंतर्गतदेखील महिलांना अनेक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. जसे की, Advantage Woman Savings Account यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या सेव्हिंग खात्या अंतर्गत महिलांना 50 लाख रूपयांपेक्षा कमी डिपाॅझिट केले की, त्यांना यावर 3 टक्के व्याजदर प्राप्त होईल. तसेच महिलांनी 50 लाख रूपयांपेक्षा जास्त डिपाॅझिट केले की 3.50 टक्के व्याज दर मिळेल. तसेच या खात्याच्या माध्यमातून महिलांना डेबिट कार्डवर शाॅपिंगसाठी 750 रूपयांपर्यतचा कॅशबॅक प्राप्त होईल. सोबतच लाॅकर रेंटवरदेखील आकर्षक डिस्काउंट मिळेल

आयडीबीआय बॅंक (IDBI Bank)

IDBI च्या माध्यमातून खास महिलांसाठी Super Shakti Women’s Account सुरू करण्यात आले आहे. या खात्यामध्ये महिलांना सेव्हिंग करून साधारण 3.35 टक्क्यांनी व्याजदर मिळते. तसेच लाॅकर रेटवरदेखील 15 टक्के डिस्काउंट प्राप्त होतो. त्यामुळे महिलांसाठी ही सुविधा फायदेशीर असल्याचे दिसते.

एचडीएफसी बॅंक (HDFC Bank)

एचडीएफसी बॅंकमध्ये महिलांना सेव्हिंग खात्यात गुंतवणूक केल्यास आधिकाधिक 3.50 टक्के व्याज दर मिळते. तसेच या खात्याच्या माध्यमातून टू व्हिकलवर 3.5 टक्क्यांपर्यंत आकर्षक असा डिक्साउंट मिळतो. तसेच प्रोसेसिंग फीसमध्ये 50 टक्के डिस्काउंटदेखील दिला जातो.

अॅक्सीस बॅंक (Axis Bank)

अॅक्सीस बॅंकेमध्येदेखील महिलांना खास सुविधा देण्यात आल्या आहेत. जसे की, या बॅंकेच्या अंतर्गत महिलांना बचत खात्याव्दारे 3.50 डिस्काउंट देण्यात येतो. तसेच महिलांना शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी आकारली जात नाही. त्यामुळे हे खाते महिलांसाठी एक प्रकारे चांगली संधी आहे.