• 31 Mar, 2023 08:18

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

चेक पेमेंट करण्यापूर्वी हा नवीन नियम जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान

This new rule before check payment

चेकच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणुक होऊ नये म्हणून पंजाब नॅशनल बॅंकेने याबाबत आता एक नवीन नियम लागू केला आहे. हा नविन नियम काय आहे, याविषयी सविस्तरपणे जाणून घेवुयात.

New Rules of Punjab National Bank: पंजाब नॅशनल बॅंकेने (Punjab National Bank) चेक पेमेंट संदर्भात एक नवीन नियम लागू केला आहे. या नियमा अंतर्गत ग्राहकांची फसवणूक टाळता येणार आहे. जेणेकरून ग्राहकांचा पैसा हा अधिक सुरक्षित राहिल. या बॅंकेचा नवीन नियम काय सांगतो याबाबत माहिती करून घेवुयात.  

चेक पेमेंट संदर्भात नवीन नियम

पंजाब नॅशनल बॅंकेने ग्राहकांना चेक पेमेंटसाठी पाॅझिटिव्ह पे सिस्टम(PPS) हे अनिवार्य केले आहे. हा नियम फक्त 5 लाख रूपयांपेक्षा जास्त चेक पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी असणार आहे. बॅंकेचा हा नियम 5 एप्रिलापासून लागू होणार आहे.  

पाॅझिटिव्ह पे सिस्टम (PPS) म्हणजे काय?

पाॅझिटिव्ह पे सिस्टम ही यंत्रणा नॅशनल पेमेंट्स काॅर्पोरेशन आॅफ इंडिया (National Payments Corporation of India) व्दारे तयार करण्यात आली आहे. ज्याव्दारे  ग्राहकांना बचत खाते असलेल्या बॅंकेला त्यांच्याव्दारे जारी करण्यात येणाऱ्या चेकबाबतची संपूर्ण माहिती दयावी लागते. चेक क्लिअरन्स सादर करण्या अगोदर ही माहिती शेयर करणे महत्वपूर्ण असते. चेकची माहिती ही अनेक प्रकार सादर करता येते.  

PNB चेकसाठी PPS चा लाभ

PNB चेकसाठी PPS चा लाभ मिळविण्यासाठी ब्राॅंच आॅफीस,आॅनलाइन बॅंकिंग, मोबाइल बॅंकिंग, एसएमएस बॅंकिंगच्या माध्यमातून चेक संदर्भातील संपूर्ण माहिती देऊन पाॅझिटिव्ह पे सिस्टमचा वापर करता येणार आहे. याबाबत, पंजाब बॅंक इंडियाने म्हटले आहे की, चेक सादर करण्याच्या एक दिवस अगोदर सर्व माहिती देण्यात यावी.  

PPS अंतर्गत व्हेरिफिकेशनसाठी शेअर करा चेकची माहिती

पंजाब नॅशनल बॅंकच्या नेट बँकिंगमध्ये लॉग इन करावे. 

व्हॅल्यूअ‍ॅडेड सर्व्हिसेज व्दारा 'पॉझिटिव्हपे सिस्टम' या टॅबवर क्लिक करावे.

ड्रॉप-डाउनमेनूमधून खाते क्रमांकची निवड करावी. 

यानंतर ग्राहकाला सहा अंकी चेक क्रमांक, चेक अल्फा (3 कॅरेक्टर), चेकची तारीख, चेकची रक्कम आणि-लाभार्थीचे नाव सादर करावे लागणार आहे.

ट्रांझेक्शनसाठी पासवर्ड एंटर करावे व सबमिट या टॅबवर क्लिक करावे. 

चेकचे डिटेल्स SMS ने पाठवा 

खाते क्रमांक: संपूर्ण खाते क्रमांक

चेक क्रमांक: 6 अंकांचा चेक क्रमांक 

चेक अल्फा: चेकवर जे 3 अक्षरे छापलेले असतात

चेक किंमत :       

चेकची तारीख: DDMMYYYY

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास, ग्राहकाला एक मेसेज येईल, 'अकाउंट नंबर XXXXXXXXXXXXXXXमधील चेक क्रमांक XXXXXXच्या PPS डेटासाठी तुमच्या रिक्वेस्टचा स्वीकार करण्यात आला आहे.'