By Benzeer Jamdar25 Feb, 2023 15:293 mins read 101 views
दादासाहेब पुरस्कार 2023 धुमधडाक्यात नुकताच संपन्न झाला आहे. हा पुरस्कार भारतीय फिल्म व दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंज्ञ व कलाकारांना सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येतो. या पुरस्काराला फिल्म इंडस्ट्रीमधील आलिया भट्ट, रेखा, रणबीर कपूर, बिग बॉस विजेता एमसी स्टॅंड, शिव ठाकरे आदि कलाकार उपस्थित होते. या पुरस्काराच्या निमित्ताने आज आपण मनोरंजन क्षेत्रातील मोठे पुरस्कार आणि बक्षिसांची रक्कम जाणून घेऊ.
Big Awards and Prize Money: दादासाहेब पुरस्कार 2023 या कार्यक्रमाचे आयोजन 20 फेब्रुवारीला मुंबई येथे करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळयात सर्वोकृष्ट अभिनेत्री पुरस्कार ‘गंगूबाई काठियावाडी’साठी (Gangubai Kathiawadi) आलिया भट्ट (Alia Bhatt) ला, तर अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याला ‘ब्रम्हास्त्र’ (Brahmastra) चित्रपटासाठी मिळाला आहे. आज या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या निमित्ताने देशातले मोठे पुरस्कार आणि बक्षिसांची रक्कम पाहूयात.
दादासाहेब पुरस्कार 2023 हा सोहळा नुकताच मुंबईत रंगला होता. या सोहळयाला बाॅलिवुड क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. हा पुरस्कार भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकाराच्या माहिती व नभोवाणी खात्याच्या माध्यमातून देण्यात येतो. या पुरस्काराची सुरूवात 1969 मध्ये करण्यात आली होती.
दादासाहेब फाळके यांनी भारतात पहिल्यांदा चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यांच्या या चित्रपटाचे नाव राजा हरिश्चचंद्र असे होते. म्हणूनच त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक अस म्हणतात.
आज धुंडिराज गोवंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके यांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराची रक्कम अनेक वेळा बदलण्यात आली आहे. पण 2006 पासून दादासाहेब फाळके पुरस्काराची किंमत शाल, सुवर्णकमळ व 10 लाख रूपये आहे.
ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards)
http://www.rchsprowler.com/
ग्रॅमी पुरस्कार दरवर्षी संगीतमध्ये (म्युजिक) सर्वोत्तम योगदान देणाऱ्या कलाकाराला देण्यात येतो. हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असून मागील महिन्यातच हा सोहळा रंगला होता. त्यावेळी भारतातील एस एस राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटाला हा पुरस्कार देण्यात आला होता. या चित्रपटाने जगभरातून 1000 करोडोंपेक्षा ही अधिक कमाई केली होती.
जगातील आघाडीचा पुरस्कार म्हणून ग्रॅमी पुरस्काराची ओळख आहे. हा पुरस्कार अमेरिकेतील नॅशनल अकॅदमी आॅफ रेकाॅर्डिंग आर्ट्स अॅन्ड सायन्स या संस्थेतर्फे देण्यात येतो. या पुरस्काराची किंमत 30,000 डॉलर इतकी आहे. जागतिक स्तरावरील संगीत क्षेत्रातील हा पुरस्कार भारतात पहिल्यांदा पंडित रवि शंकर यांना मिळाला होता.
ऑस्कर पुरस्कार (The Oscars)
http://www.smithsonianmag.com/
ऑस्कर पुरस्कार हा जागतिक स्तरावर मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. या ट्राॅफीला एक प्रतिष्ठित असा वेगळाच मान आहे. फिल्म इंडस्ट्रीमधील प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते की, त्याला आयुष्यात एकदा तरी ऑस्कर पुरस्कार मिळाला पाहिजे. त्यासाठी तो कठोर मेहनत ही घेत असतो. मात्र हा पुरस्कार महागडा नसून प्रतिष्ठित आहे.
रिपोर्टनुसार, या पुरस्काराची किंमत 1 डाॅलर म्हणजे 65 रूपये असल्याचे सांगितले जाते. मात्र हा पुरस्कार तयार करण्यासाठी साधारण 36,000 रूपये इतका खर्च येतो. पण या पुरस्काराची विक्री किंमत फक्त 1 डाॅलर म्हणजे 65 रूपये इतकी आहे.
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, दरवर्षी हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी हाॅलिवुड इंडस्ड्री 6 करोड ते 33 करोड रूपये इतका खर्च करते. या ऑस्कर ट्रॉफीला ‘गोल्डन लेडी’ असेदेखील म्हटले जाते. जागतिक स्तरावर प्रतिष्ठित मानला जाणार ऑस्कर पुरस्कार भारतात पहिल्यांदा ‘भानू अथय्या’ यांना मिळाला होता. 70 व्या दशकात भानू अथय्या यांनी डिझाईन केलेले कपडे खूपच प्रसिद्ध होते. अभिनेत्री साधना यांची ड्रेसिंग स्टाइल ही याच कलाकाराची असायची.
गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe Awards)
http://www.britannica.com/
80 वा गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023 नुकताच संपन्न झाला आहे. वर्षाच्या सुरूवातीलाच या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे यंदाचा गोल्डन ग्लोब पुरस्कार भारतातील दाक्षिणात्य आरआरआर या चित्रपटाला मिळाला. एसएस राजामौली दिग्दर्शित RRR चित्रपटातील ‘नाटू-नाटू’ या गाण्याला बेस्ट ओरिजिनिल साॅन्गसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार देण्यात आला.
गोल्डन गोल्ब पुरस्काराची प्रतिमा 24 कॅऱेट सोन्याने सजविण्यात आली आहे. तसेच ग्लोब स्टॅच्यूचे वजन 5.5 वजन इतके आहे. हा पुरस्कार खूप प्रतिष्ठित मानला जातो.
या पुरस्काराची सुरूवात साधारण 1944 मध्ये करण्यात आली होती. भारतात हा पुरस्कार जिंकण्याचा पहिला मान ‘ए आर रहमान’ यांना मिळाला होता. त्यांनी हा इतिहास 2009 मध्ये रचला होता.
भारत रत्न पुरस्कार (Bharat Ratna Award)
भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार म्हणून ‘भारत रत्न’ पुरस्कार ओळखला जातो. हा पुरस्कार फक्त भारतातील नागरिकांसाठी दिला जातो. ज्या व्यक्तीने खेळ, विज्ञान, साहित्य, सामाजिक सेवा व कला क्षेत्रात जागतिक स्तरावर देशाचे नाव मोठे केले आहे, अशा व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार भारतात खूपच प्रतिष्ठित मानला जातो.
1954 मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला होता. या पहिल्या पुरस्काराचे मानकरी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालाचारी और डॉक्टर चन्द्रशेखर वेंकटरमण हे होते.
देशातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार पटकावणाऱ्या यादीमध्ये नेल्सन मंडेला, मदर टेरेसा, लाल बहादुर शास्त्री, इंदिरा गांधी, सचिन तेंदुलकर, सत्यजीत रे व इतर दिग्गजांच्या नावांचादेखील समावेश आहे. विशेष म्हणजे हा सर्वोच्च पुरस्कार असला, तरी हा प्रतिष्ठित पुरस्कार देताना, कोणत्याही प्रकारची धनराशी देण्यात येत नाही.
कान्स फिल्म फेस्टीव्हल (Cannes Film Festival)
http://www.variety.com/
कान्स फिल्म फेस्टीव्हलची चर्चा दरवर्षी संपूर्ण जगभरात होते. या फेस्टीव्हलमध्ये लाल कारपेटवर उतरण्याचे स्वप्न प्रत्येक कलाकाराचे असते. या कान्स महोत्सवात सर्वोत्तम फिल्म व कलाकारांना सन्मानित केले जाते.
हा कान्स फिल्म फेस्टीव्हल पुरस्कार 20 सप्टेंबर 1946 मध्ये सुरू करण्यात आला होता. हा पुरस्कार सोहळा दरवर्षी फ्रान्स देशातल कान्स या शहरात आयोजित केला जातो.
दरवर्षी या सोहळयाला जगभरातील दिग्गज कलाकार उपस्थित असतात. त्यामुळे या शहराला ‘ग्लॅमर सिटी’ देखील म्हटले जाते. भारताची या फेस्टीव्हलमध्ये एन्ट्री 1946 मध्ये ‘नीचा मगर’ या चित्रपटाने झाली होती. या चित्रपटाला ‘ग्रॅंड प्रीक्स’ पुरस्कार मिळाला होता.
हवीहवीशी वाटणारी वर्क फ्रॉम होम (Work from home) ही संकल्पना हळूहळू मागे पडत चालली आहे. आम्हाल वर्क फ्रॉम होमच हवं, असा आग्रह करणारे आणि अक्षरश: भांडणारे आता ऑफीस वर्कच्या प्रेमात पडले आहेत. वर्क फ्रॉम होमची संकल्पना खऱ्या अर्थानं सुरू झाली ती कोरोना महामारीनंतर (Corona pandamic). मात्र आता कर्मचाऱ्यांना ऑफीस खुणावू लागलं आहे. पाहूया, काय सांगतोय अहवाल!
Top 5 Books on Personal Finance: तुम्हालाही दैनंदिन आयुष्यात पैशाचे योग्य नियोजन, गुंतवणूक आणि पैशाचे योग्य व्यवस्थापन करायचे असेल, तर काही पुस्तके नक्की वाचली पाहिजेत. यातून तुम्ही अर्थसाक्षर तर व्हालच सोबत श्रीमंतीचा मंत्रही तुम्हाला मिळेल.
Government Schemes : सरकारकडून अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत, ज्यांची बहुतांश लोकांना माहिती नाही. समानतेचा अधिकार देण्यासाठी आणि देशातील भेदभाव दूर करण्यासाठी सरकार अशीच योजना राबवत आहे, जी लोकांना सामाजिक सुरक्षा देण्याबरोबरच आर्थिक मदतही करते. 'आंतरजातीय विवाह योजना' योजना एक आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणारी योजना आहे, जी विवाहित लोकांना लाखो रुपयांपर्यंत रक्कम देते.