• 26 Mar, 2023 15:06

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Anganwadi Workers Salary Increased: जाणून घ्या, अखेर अंगणवाडी सेविकांच्या पगारात किती झाली वाढ?

Anganwadi Workers Salary Increased

Image Source : http://www.newsclick.in.com/

20 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले. राज्य सरकारने फायनली त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. नेमकी या अंगणवाडी सेविकांच्या काय मागण्या होत्या व राज्य सरकारने काय आश्वासने दिली हे पाहूयात.

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनासमोर राज्य सरकारदेखील नरमले. त्यांनी या महिलांच्या विविध मागण्या पूर्ण करत आंदोलन मागे घेण्यास सांगितले. साडे चार वर्ष रखडलेल्या त्यांच्या पगार वाढीला हिरवा कंदील दाखविण्यात आल्याने, अंगणवाडी सेविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अंगणवाडी सेविकांच्या मागण्या काय होत्या? (What were the Demands of Anganwadi Workers)

रायगड किल्ला व मुंबई येथील आझाद मैदानासोबतच राज्यात विविध भागात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू होते. महागाईनुसार सेविक व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करावी, स्मार्ट मोबाईल, नवीन मोबाईलमध्ये मराठी भाषेतून ट्रॅक्टर अॅप उपलब्ध करून द्यावे, मोबाईलच्या रिचार्ज दरात वाढ करावी, फेडरेशनचा आहार न देता तो बचत गटाव्दारे देण्यात यावा, कोरोना काळातील 21 हजार रूपये प्रोत्साहन भत्ता द्यावा, सेविका व मदतनीस यांच्या रिक्त झालेल्या जागा त्वरित भराव्यात अशा विविध मागणींसाठी मागील काही दिवसांपासून हे ठिय्या आंदोलन सुरू होते. तसेच मागील साडे चार वर्षे त्यांच्या मानधनात सरकारनं कोणतेही वाढ केली नाही.

सरकारने काय दिले आश्वासन (What did the Government Promise)

अंगणवाडी सेविकांसोबत राज्य सरकारव्दारे सकारात्मक चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना 1500 रूपये वाढविण्याचे आश्वासन दिले. तसेच अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनादेखील सुरू करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर यांना मोबाईल देखील देणार असल्याची माहिती दिली.

anagan wadi
http://www.thehansindia.com/

आंदोलनाचा बालकांवर काय झाला परिणाम? (What was the Effect on the Children)

अंगणवाडी सेविकांनी 20 फेब्रुवारीपासून बंड पुकारल्यामुळे अंगणवाडया या बंद होत्या. त्यामुळे सहा वर्षापर्यंतची बालके ही पोषण आहारापासून दूर होती. तसेच गर्भवती मातांची तपासणी, कुपोषण निर्मुलन व बालकांचे लसीकरण या गोष्टींवरदेखील संपाचा मोठा परिणाम झाल्या असल्याचे दिसून येते.

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी मानधन (Lower Salary in Maharashtra Compared to Other States)

एकात्मिक बालविकास प्रकल्पांव्दारे देशात 27 लाख सेविका व मदतनीस या अंगणवाडीमध्ये काम करतात. एवढया प्रमाणात या अंगणवाडीमधील कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात येते. मात्र या कर्मचाऱ्यांना किमान वेतन, पीएफ, पेन्शन व विमा अशा कोणत्याही प्रकारची सामाजिक सुरक्षा मिळत नाही. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे, पण त्यांच्या मानधनात कोणत्याही प्रकारची वाढ होत नव्हती. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कमी मानधन आहे.

anaganvadi shala (1)
/www.livehindustan.com

अंगणवाडीसाठी 20 हजार जागा भरणार (20 Thousand Seats will be Filled for Anganwadi)

आंदोलनाचे स्वरूप पाहता, 2023 नुसार, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी यांची पदे भरण्याचा आदेश सरकारच्यावतीने देण्यात आला आहे. 31 मे पूर्वी हे सर्व कामकाज झाले पाहिजे, अशी ताकीददेखील देण्यात आली आहे. या अंगणवाडीसाठी जवळजवळ 2017 पासून रिक्त पदे होते. पण आता यासाठी 20 हजार रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

अंगणवाडीच्या निघालेल्या रिक्त पदांसाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच पदवी, पदयुत्तर पदवी व उच्च शिक्षण यासाठी ग्राहय धरले जाणार आहे. या पदासाठी किमान 35 वय असणे आवश्यक आहे. तुम्ही जर या सर्व अटी व नियमांसाठी पात्र असाल तर तुम्हीदेखील अंगणवाडी सेविका व इतर पदासाठी अर्ज करू शकता.

महाराष्ट्रात मिनी अंगणवाडी सेविका पदासाठी 13 हजार 11, अंगणवाडी मदतनीससाठी 2 लाख 7 हजार, अंगणवाडी सेविकासाठी 97 हजार 475 अशी एकूण 20 हजार 601 पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे 31 मे पूर्वी भरण्याचा आदेश बालविकास आयुक्त रूबल अग्रवाल यांच्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्यासाठी नोकरीची ही एक उत्तम संधी आहे.

एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्राव्दारे पुरस्कार प्राप्त योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध जिल्हयांत अंगणवाडयाचे कामकाज चालते.