• 26 Mar, 2023 14:44

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्डबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या

omplete information about Kisan Credit Card

Image Source : http://www.thenewsmill.com/

भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे केंद्रसरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांनी प्रगतीशील शेती करावी या हेतूने अनेक योजना राबवित असतात. यापैकी एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना या योजनेला केसीसी योजना म्हणून देखील ओळखले जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा केला जातो.

KCC Yojana: केसीसी योजनेमध्ये शेतकऱ्यांना शेतीच्या विविध कामासाठी किंवा नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाले तर  शासनाच्यावतीने कर्जाचा पुरवठा केला जातो. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना या किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत स्वस्त कर्ज दिले जाते. शासनाच्या योजनेंपैकी किसान क्रेडिट कार्ड  ही एक महत्वपूर्ण योजना सविस्तरपणे जाणून घेवुयात.

किसान क्रेडिट कार्ड योजना म्हणजे काय?

 किसान क्रेडिट कार्ड योजना म्हणजे देशातील शेतकऱ्यांना शेतीसंबंधित कामासाठी आर्थिक मदत करणे होय. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, कीटकनाशक, फवारणी अशा अनेक कामासाठी कर्ज दिले जाते. केसीसी कार्डच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना कमी व्याजदरात 3 लाखापर्यंतच्या कर्जाचा पुरवठा करते. ज्यावर फक्त 4 टक्के व्याजदर आकारला जातो. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पहिल्या पाच वर्षात कर्जाची परतफेड वेळेत केली तर त्याला 2 टक्के सवलतदेखील दिली जाते.

किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी पात्रता

वय 18 पेक्षा कमी व 70 पेक्षा जास्त नसावे.
स्वत:ची मालकीची जमीन असावी. 
शेतकऱ्यांचे 5 हजार किंवा यापेक्षा अधिक किंमतीचे उत्पादन असावे. 
शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थी असावा.

केसीसीसाठी महत्वपूर्ण कागदपत्रे 

आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स हे नाव व पत्त्यासाठी 
जमिनीची कागदपत्रे (आठ अ किंवा सातबारा उतारा)
इतर बॅंकेतून कर्ज घेतले नाही म्हणून शपथपत्र 
अर्जदाराचा पासपोर्ट साइजचा फोटो 
बॅंकेच्या पासबुकची झेराॅक्स
मोबाईल नंबर (जो आधार कार्डशी लिंक केलेला असेल)

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा 

आॅनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

 शेतकऱ्यांनी सर्वप्रथम सरकार सेवा केंद्रामध्ये जावे.
सोबत वरील सर्व कागदपत्रे आवश्यक.
त्या ठिकाणी आॅनलाइन अर्ज भरला जातो. 
किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी ज्या बॅंकेकडून कर्ज घ्यायचे आहे, त्या बॅंकेच्या वेबसाइटला भेट द्या. 
त्या वेबसाइटवर पर्यायी सूचीच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड या पर्यायाची निवड करावी. 
अर्ज या पर्यायावर क्लिक करावे. 
मग अर्जात दिल्याप्रमाणे सर्व माहिती योग्य व अचूक भरावी आणि शेवटी दिलेल्या सबमिट या बटणावर क्लिक करावे. 
हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला संदर्भ क्रमांक मेल किंवा मॅसेज करण्यात येतो. 
अर्ज भरल्यानंतर तुम्हाला देण्यात आलेली पावती ही कागदपत्रांच्या सोबत बॅंकेत जमा करावी. 
जर तुम्ही या किसान क्रेडिट कार्ड या योजनेसाठी पात्र ठराल, तर तुम्हाला 15 दिवसांच्या आत क्रेडिट कार्ड दिले जाते.

आॅफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 

यामध्ये शेतकऱ्यांना सर्वप्रथम किसान क्रेडिट योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. येथून केसीसी फाॅर्मवर क्लिक केल्यानंतर फाॅर्म डाउनलोड होईल. 
तुम्हाला या फाॅर्मची झेराॅक्स काढून त्यामध्ये सर्व वैयक्तिक माहिती भरायची आहे. तसेच यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून, तुम्हाला ज्या बॅंकेतून कर्ज घ्यायचे आहे, त्या बॅंकेत जमा करावे. 
तुम्ही जर किसान क्रेडिट कार्ड या योजनेसाठी पात्र ठरला असाल, तर तुम्हाला काही दिवसातच किसान क्रेडिट कार्ड प्राप्त होईल.

किसान क्रेडिट कार्ड राबविणाऱ्या बॅंका

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवर कर्जाचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही अलाहाबाद बॅंक, आंध्र बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, ओरिएंटल बॅंक ऑफ काॅमर्स, पंजाब नॅशनल बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, कार्पोरेशन बॅंक, कॅनरा बॅंक, सिंधिकेट बॅंक, विजया बॅंक या सर्व बॅंकेत अर्ज करू शकता.

बॅंक व शेतकरी यांच्यामधील दुवा सोसायटी 

ज्या शेतकऱ्याला किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्या शेतकऱ्याने सर्वप्रथम सोसायटीचा सभासद होणे आवश्यक आहे. 

शेतकरी सोसायटीचा सभासद झाला तर सर्व कागदपत्रे ही सोसायटीत जमा होतात व सोसायटीच्या माध्यमातून तुम्ही केलेले कर्ज हे बॅंकेत मंजुरीसाठी पाठविले जाते. 

शेतकऱ्याचे कर्ज हे बॅंकेत मंजूर झाले की, शेतकऱ्याला एक किसान कार्डचे पुस्तक देण्यात येते.

 या पुस्तकात क्षेत्र, क्षेत्रानुसार मंजुर झालेली रक्कम, कर्ज परतफेड करण्यची तारीख तसेच हे वाटप खरीप पिकासाठी घेतले आहे की रब्बी पिकासाठी याची सविस्तरपणे नोंद केलेली असते. त्याचबरोबर या किसान कार्डच्या पुस्तकावर ज्या बॅंकेच्या आधिकाऱ्याने कर्ज मंजूर केले आहे त्या व्यक्तीची सही असणे आवश्यक आहे.

 यासर्व गोष्टी पूर्ण झाल्यानंतर सभासद ते पुस्तक बॅंकेत जमा करतो व त्यानंतर तुमच्या कर्जाची रक्कम ही सेव्हिंग खात्यात जमा केली जाते.

सहकारी बॅंकेत किसान क्रेडिट कार्डचे वाटप दोन टप्प्यात होते.

 
सहकारी बॅंकेत किसान क्रेडिट कार्डचे वाटप हे दोन टप्प्यात करण्यात येते. जसे की रब्बी व खरीप हंगामासाठी. खरीप पिकांचे कर्ज हे 1 एप्रिल ते  30 सप्टेंबर तर रब्बी पिकांचे कर्ज हे 1 ऑक्टोबर ते 31 मार्च या कालावधीत दिले जाते.

जिल्हा सहकारी बॅंकेतदेखील शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप दोन प्रकारात केले जाते. एक सबल सभासद व दुसरे दुर्बल सभासद म्हणून कर्ज वाटप केले जाते. सबल सभासद म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र हे पाच एकरपेक्षा जास्त आहे व दुर्बल सभासद म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र हा पाच एकरच्या आत आहे.

 सबल व दुर्बल सभासदांचा व्याजदर हा संस्थेस 4 टक्के तर सभासदात 6 टक्के इतका असतो.

 ज्या सभासदाने मुदतीनंतर कर्जाची रक्कम भरली तर त्याचे व्याज संस्थेसाठी 9 टक्के व सभासदास 12 टक्के इतकी असते. व्याज दंड हा व्याजासह भरावा लागतो. जर 3 लाखावर कर्ज घेतले असेल तर दंडव्याजाचा दर हा संस्थेसाठी 8 टक्के आणि सभासदास  11 टक्के भरावा लागतो.

तुम्ही जर खरिप पिकासाठी कर्ज घेतले असेल तर ते तुम्हाला 31 मार्चच्या आत भरणे आवश्यक आहे. रब्बी पिकासाठी कर्ज घेतले असेल तर ते तुम्हाला 30 नोव्हेंबरपर्यंत भरणे गरजेचे असते.  

शेतकरी ज्यावेळी व्याजाची रक्कम भरतो. त्याची ही रक्कम नंतर त्याच्या सेव्हिंग खात्यात थोडया दिवसाने पुन्हा जमा होते. यामध्ये व्याज 2 टक्के, केंद्र सरकार 2 टक्के, राज्य सरकार व बॅंक 2 टक्के भरत असते.