• 27 Mar, 2023 05:51

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

13 Types of Credit Cards: क्रेडिट कार्डचे तब्बल 13 प्रकार व त्याचे फायदे जाणून घ्या

13 Types of Credit Cards

आज-काल क्रेडिट कार्ड घेणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. ग्राहक एकदम सहजरीत्या क्रेडीट कार्ड हाताळताना पाहायला मिळतात. पण शक्यतो, ग्राहकांनो क्रेडिट कार्ड हा एकच प्रकार नसून यामध्येदेखील विविध प्रकार आहेत. तुम्ही तुम्हाला पाहिजे असलेल्या कॅटेगिरीतील क्रेडीट कार्डची निवड केली, तर तुम्हाला विविध सूट, कॅशबॅक व विविध आॅफर्सचा आनंद घेता येईल.

Credit Cards Types: क्रेडिट कार्ड हा एकच प्रकार नसून यामध्ये विविध प्रकार आहेत.त्यामुळे तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनातील प्रवासापासून ते अगदी खरेदी करण्यापर्यंतच्या रोजच्या व्यवहारात अशा विविध क्रेडिट कार्डचा उपयोग करून शकतात. चला, तर मग जाणूनघेवुयात, क्रेडिट कार्डचे प्रकार व फायदे जाणून घेवुयात. 

सिल्व्हर क्रेडिट कार्ड (Silver Credit Card) 

कमी पगार असणाऱ्या लोकांसाठी सिल्व्हर क्रेडिट कार्ड हे फायदेशीर ठरते. पण यासाठी 4 ते 7 वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमणे ग्राहकांचा CIBIL Score हा अत्यंत चांगला असणे महत्वपूर्ण आहे. या कार्डचे चार्जेसदेखील परवाडणारे असते. या क्रेडिट कार्डव्दारे रक्कम दुसऱ्या खात्यावर ट्रान्स्फर करण्यासाठी सुरूवातीच्या काळात म्हणजेच साधारण सहा ते नऊ महिन्यांसाठी कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जात नाही.  

गोल्ड क्रेडिट कार्ड (Gold Credit Card)

ज्या व्यक्तीचे जास्त उत्पन्न जास्त आहे, अशा व्यक्तीला या गोल्ड क्रेडिट कार्डचा वापर करता येतो. फक्त यासाठी त्या व्यक्तीचा Credit Cards Type: क्रेडिट स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. हे कार्ड तुम्हाला कोणत्याही बॅंकेतून मिळते. या कार्डव्दारे चांगल्या आॅफर्स मिळतात तसेच खात्यातून जास्तीत जास्त रक्कम काढता येते, जास्त क्रेडिट ही प्राप्त होते. तसेच या कार्डच्या माध्यमातून जोडीदार वकुटुंबातील सदस्यांसाठी अॅड-आॅन कार्डची सुविधादेखील प्राप्त होते.  

प्लॅटिनम क्रेडिट कार्ड (Platinum Credit Card)

प्लॅटिनम क्रेडिट कार्ड हे सर्वाधिक लोकप्रिय आहे. या कार्डचा वापर सर्वाधिक ग्राहक करीत असतात. या कार्डवर विविध ब्रॅंडसचे गिफ्ट व्हाउचर, कॅशबॅक,रिवाॅर्ड पाॅइंट्स, वेलकम पॅकेज अशा विविध आॅफरचा आनंद घेता येतो. तुम्हाला तुमच्या बॅंकेनुसार त्या त्या आॅफरचा लाभ घेता येणार. त्यामुळे या क्रेडिट कार्डला ग्राहकांची अधिक मागणी असते.

बिझनेस क्रेडिट कार्ड (Business Credit Card)

बिझनेस क्रेडिट कार्ड हा पर्याय शक्यतो व्यवसाय करणाऱ्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे या कार्डला कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड असेदेखील म्हणतात. कॉर्पोरेट्स, व्यावसायिक प्रतिष्ठान व विविध वित्तीय संस्थांना हे बिझनेस क्रेडिट कार्ड आॅफर केले जाते. हे बिझनेस क्रेडिट कार्ड असल्यामुळे यामध्ये कंपन्या किंवा संस्था हे कार्ड आपल्या कर्मचाऱ्यांना ही देऊ शकतात. कर्मचारी हे कार्ड फक्त आॅफीसच्या कामासाठी वापरू शकतात.  

बेसिक क्रेडिट कार्ड (Basic Credit Card)

पहिल्यांदा क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांसाठी बेसिक क्रेडिट कार्ड असते. जर तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही बेसिक क्रेडिट कार्ड घेऊ शकता. हे कार्ड तुमच्या मासिक पगारावर अवलंबून असते. तसेच या कार्डचा वापर कमी कालावधीसाठी करता येतो. हे कार्ड हाताळताना अधिक खर्च होणार नाही या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून तुमचा क्रेडिट स्कोर खराब होऊ नये.  

ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड (Travel Credit Card)

पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या प्रवाशांसाठी ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड हे अधिक फायदेशीर ठरते. यावर प्रवास खर्चावर अधिक आॅफऱ मिळण्याची शक्यता असते. या कार्डचा वापर भारतासोबतच परदेशातदेखील मोठया प्रमाणात केला जातो. यामध्ये एअरलाइन बुकिंग, हाॅटेल बुकिंगसाठी तुम्ही ट्रॅव्हल क्रेडिट कार्डचा उपयोग करू शकता. यावेळी तुम्हाला रिवाॅर्ड पाॅइंटदेखील प्राप्त होतात. 

फ्यूएल क्रेडिट कार्ड (Fuel Credit Card) 

दैनंदिन जीवनात रोज प्रवास करणाऱ्यांसाठी फ्यूएल क्रेडिट कार्ड हे अत्यंत महत्वाचे आहे. आपला रोजचा वाहतूक खर्च कमी करून यामध्ये पेट्रोलवरील खर्चात मोठी बचत होते. यामध्ये विविध बॅंकेच्या विविध आॅफरदेखील असतात. त्यामुळे आॅफरचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा वाहतूक खर्च कमी करू शकता.  

कॅशबॅक क्रेडिट कार्ड (Cashback Credit Card) 

तुम्ही ज्या ठिकाणावरून खऱेदी करता,त्यावेळी कॅशबॅक क्रेडिट कार्डचा वापर करून त्या त्या खरेदीवर तुम्हाला कॅशबॅक देण्यात येतो. जसे की, किरकोळ खऱेदी, मुव्ही तिकिट बुकिंग, जेवणाचे बिल, किराणा खऱेदी अशा अनेक गोष्टींवर तुम्हाला कॅशबॅक मिळण्याची शक्यता असते.  

महिलांसाठी क्रेडिट कार्ड (Credit Cards For Women)

फक्त महिलांसाठी हे क्रेडिट कार्ड तयार करण्यात आले आहेत. या कार्डचा महिलांना अधिक उपयोग व्हावा, यासाठी मोजक्याच बॅंकांनी हे कार्ड बनविले आहेत. या कार्डव्दारे महिलांना शाॅपिंग रिवाॅर्डस व कॅशबॅक आॅफर आधिकाधिक प्राप्त होतात. महिलांना शाॅपिंगची जास्त आवड असते, त्यामुळे या कार्डचा वापर करून महिला जास्तीत जास्त रिवाॅर्ड पाॅइंट प्राप्त करू शकतात.  

को- बॅंडेड क्रेडिट कार्ड (Co-Branded CreditCard)

विविध बॅंकांशी टाय-अप करून को- बॅंडेड क्रेडिट कार्ड हे ग्राहकांना दिले जाते. ज्या ब्रॅंडसोबत ही बॅंक टाय-अप झालेली असेल, तर त्या बॅंडच्या खरेदी केलेल्या वस्तूंवर अधिक सवलत मिळते. त्यामुळे हे कार्डदेखील ग्राहकांना अधिक फायदेशीर आहे.

शाॅपिंग क्रेडिट कार्ड (Shopping Credit Card)

शाॅपिंग क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही विविध शाॅपिंग अॅपवरून आॅनलाइन खरेदी करू शकता. तसेच विविध दुकानातून खरेदी केलेल्या गोष्टींवरदेखील या कार्डचा फायदा होईल. यामध्ये तुम्ही विविध कॅशबॅक, सवलतचे व्हाउचर व आदि आॅफरचा मनसोक्त लाभ घेऊ शकता.  

प्रीपेड क्रेडिट कार्ड (Prepaid Credit Card)

 प्रीपेड कार्डमध्ये आपल्याला कर्ज मिळत नाही, तर यामध्ये या कार्डचा वापर करण्यासाठी तुम्हाला आदी रक्कम भरावी लागते यानंतर मग तुम्ही आनंदाने खरेदी करू शकता. या कार्डवरदेखील तुम्ही विविध आॅफऱचा आनंद घेऊ शकता.  

प्रीमियम क्रेडिट कार्ड (Premium Credit Card)

प्रीमियम क्रेडिट कार्ड हे मोजक्याच लोकांसाठी असते. या कार्डचा उपयोग गोल्फ कल्ब, हाॅटेल, विमा आदिसाठी करता येतो.या कार्डचा योग्य वापर केल्यास तर तुम्हाला मोफत प्रवास व हाॅटेलमध्ये राहण्यासाठी कूपनदेखील दिले जातात. अशा काही आॅफरचा आनंदा तुम्हाला घेता येतो.