John Abraham: बाॅलिवूडचे दोन स्टार जॉन अब्राहम व अक्षय कुमार 'आवारा पागल दिवाना 2' या चित्रपटातून पुन्हा एकत्र दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा या दोन कलाकारांची अॅक्शन काॅमेडी पाहायला मिळणार आहे. पठाण चित्रपटातील अॅक्शननंतर आता अॅक्शन काॅमेडीसाठी जाॅन सज्ज झाला आहे. अशा या अॅक्शन हिरो असलेल्या जॉन अब्राहमची कमाई जाणून घेवुयात.
John Abraham Luxury Life: बाॅलिवूडमध्ये अॅक्शन हिरो म्हणून ओळख असलेला अभिनेता जाॅन अब्राहमचा ‘आवारा पागल दिवाना 2’ (Awara Pagal Deewana 2) हा अॅक्शन काॅमेडी चित्रपट लवकरच पाहायला मिळणार आहे. अहमद खान दिग्दर्शित या चित्रपटात तो पुन्हा एकदा अक्षय कुमारसोबत झळकणार आहे. यापूर्वी या दोघांचा आवारा पागल दिवाना हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता जॉन अब्राहम या अॅक्शन काॅमेडीच्या तयारीला लागला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॉन अब्राहमच्या नावावर सुमारे 251 कोटी रुपयांची संपत्ती आहे. याशिवाय मुंबईमध्ये जॉनचे स्वतःचे पेंट हाउस आहे. नुकताच जॉन अब्राहम हा पठाण चित्रपटात अॅक्शन भूमिकेत पाहायला मिळाला होता. त्याच्या या भूमिकेलादेखील प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले.
शाहरूख खान (Sharukh Khan)व जाॅन अब्राहमची जोडीने संपूर्ण जगाला वेड लावून ठेवले होते. बाॅक्स आॅफीसवर बाॅलिवूडच्या या स्टारने हजारो करोडोंचा गल्ला जमविला होता. सांगितले जाते की,पठाण (Pathan) चित्रपटातूनदेखील त्याने चांगली कमाई केली आहे. विशेष म्हणजे जॉनच्या कमाईचा एक मोठा हिस्सा चॅरिटीमध्ये दिला जातो. तसेच, जॉन हा बाॅलिवूडमध्ये सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.
चित्रपट व्यतिरिक्त कमविण्याचे माध्यम(Earning Platform)
http://www.nobroker.in.com/
जॉन अब्राहम एक चित्रपटासाठी साधारण 6 ते 7 करोड रूपये इतके मानधन घेतो. या व्यतिरिक्त तो अनेक ब्रॅंडसची जाहिरातदेखील करतो, या जाहिरातीच्या माध्यमातूनदेखील तो तगडी कमाई करतो. जाॅन एक ब्रॅंडच्या जाहिरातीसाठी साधारण 1 कोटी रूपये फी घेतो. तसेच हा अभिनेता एक बिझनेमॅनदेखील आहे. त्याचे देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात 'फॅट अब्राहम बर्गर' (The Fate of Abraham) नावाचे रेस्टॉरंट आहे.
खेळाची आवड असल्यामुळे त्याने Apni Mumbai Angels हा Nass चा फुटबॉल संघदेखील खरेदी केला आहे. जाॅन एका वोडका ब्रँडचा मालक ही आहे. याशिवाय त्यांचा 'जॉन अब्राहम सिडक्शन' (John Abraham Seduction) नावाचा परफ्यूम ब्रँडदेखील आहे. हे सर्व पाहता जॉन अब्राहम दर महिन्याला सुमारे 1 कोटी 20 लाख रुपयांची कमाई करतो. त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे 15 कोटी रुपयांपेक्षा ही जास्त आहे.
आलिशान घर (Luxury Home)
अभिनेता जॉन अब्राहम हा सध्या मुंबईतील वांद्रे या भागात राहतो. त्याचा या ठिकाणी आलिशान डुप्लेक्स असा सुंदर व आलिशान फ्लॅट आहे. हा फ्लॅट 5100 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. जॉन त्याच्या संपूर्ण कुटुंबासह या फ्लॅटमध्ये राहतो.
कार व बाईक कलेक्शन (Car and Bike Collection)
http://www.bollywoodlife.com/
जॉन अब्राहमला अनेकदा मुंबईच्या रस्त्यावर बाईक चालवताना पाहिले आहे. या अभिनेत्याला महागड्या बाइकची खूप आवड आहे. तसेच त्यांच्याकडे कारचेदेखील महागडे कलेक्शन आहे. बाॅलिवुडच्या या स्टार अभिनेत्याच्या कार कलेक्शनमध्ये Lamborghini Gallardo, Audi Q3, Audi Q7 यांचा समावेश आहे. तर लग्झरी बाईक कलेक्शनमध्ये Yamaha R1, Yamaha VMAX आणि Suzuki Hayabusa आहेत. या सर्व बाइक व कारच्या किंमती या लाखात व कोटींच्या घरात आहेत.
बॉलिवूड करियर (Bollywood Career)
http://www.english.jagran.com/
बाॅलिवुडचा स्टार जॉन अब्राहम याने 2003 साली जिस्म या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री बिपाशा बासू झळकली होती. या चित्रपटातील गाणे त्यावेळी खूप गाजले होते. यानंतर त्याने बाॅलिवुडला एक से एक बढकर चित्रपट दिले आहेत. यामध्ये धूम, वॉटर, गरम मसाला, दोस्ताना, जिंदा, हाऊसफुल, रेस 2, न्यूयॉर्क, वेलकम बॅक, ढिशूम, परमानु, सत्यमेव जयते व बाटला हाऊस यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय जॉनने 2012 मध्ये विकी डोनर आणि त्यानंतर मद्रास कॅफे या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मितीमध्ये पाऊल टाकले. त्याचे हे दोन्ही चित्रपटांनीदेखील त्यावेळी चांगली कमाई केली होती.
Unacademy layoffs: भारतातील E-Learning प्लॅटफॉर्म कंपनी 'Unacademy' ने 380 कर्मचाऱ्यांची नोकरकपात केली आहे. नोकरकपात केलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीने काही सुविधा दिल्या आहेत. ही कर्मचारी कपात करण्याचे कारण काय? आणि कोणत्या सुविधा कंपनीने कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत, हे आजच्या लेखातून जाणून घेऊयात.
Maruti Suzuki Sale: मारुती सुझुकी कंपनी सन 1986-87 पासून, परदेशी बाजारपेठेत मारुती कार निर्यात करण्यास सुरुवात केली. आता या कंपनीने 2.5 दशलक्ष कार विक्रीचा टप्पा पार केलेला आहे.
Tax Saving Options: चालू आर्थिक वर्ष संपणार असून 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत,जर तुम्हाला तुमचे कष्टाचे पैसे वाचवायचे असतील, तर तुमच्याकडे कर बचतीसाठी केवळ एक दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे, उशीर न करता, काही महत्त्वाची गुंतवणूक ताबडतोब करा, कारण कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे.