iPhone 14 व iPhone 14 Plus Cost: आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. होळी रंगाच्या सणानिमित्त अॅपलनेदेखील iPhone 14 व iPhone 14 Plus हे नवीन रंगात लाॅन्च केले आहे. त्यामुळे ग्राहकांना आता आपल्या पसंतीच्या रंगामध्ये आयफोन उपलब्ध होणार आहे. पण हे आयफोन कोणत्या रंगात लाॅन्च केले आहे व त्याच्या किंमतीत काय बदल झाला हे पाहूयात.
कोणत्या रंगात झाली एन्ट्री?
iPhone 14 ही सीरीज मागील वर्षी अॅपलव्दारे लाॅन्च करण्यात आली होती. आता iPhone 14 व iPhone 14 Plus हे माॅडेल नवीन रंगात उपलब्ध झाले आहे. आता हे दोन्ही मोबाईल पिवळया रंगात ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहे. यापूर्वी आयफोन पाच रंगात उपलब्ध होते. आता ग्राहकांसाठी पिवळा हा रंग देखील पर्याय म्हणून उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहक आता आपल्या मनपसंद रंगाचे हे आयफोन खरेदी करू शकतात.
या नवीन रंगाच्या आयफोनची किंमत
iPhone 14 व iPhone 14 Plus हे माॅडेल पाच रंगात उपलब्ध होते. आता यामध्ये सहाव्या म्हणजे पिवळया रंगाचा समावेश झाला आहे. म्हणजे आता हे दोन आयफोन ग्राहकांसाठी ब्लू, पर्पल, मिडनाइट, स्टारलाइट, प्रोडक्ट रेड कलर व सहावा पिवळया रंगात उपलब्ध आहे. हे आयफोन तीन स्टोरजमध्ये येतात. जसे की, 128 जीबी, 256 जीबी व 512 जीबी. iPhone 14 ची सुरूवातीची किंमत ही 89,900 रूपये इतकी आहे. तर नवीन रंगाच्या आयफोन माॅडेलची सुरूवात ही 10 मार्चपासून होणार आहे. ग्राहकांना तो 14 मार्चपासून खरेदी करता येणार आहे.
iPhone 14 व iPhone 14 Plus फीचर्स
iPhone 14 मध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटीना XDR डिस्प्ले अत्यंत आकर्षक व सुंदर असा आहे. जो (1170x2532 पिक्सल) रिजॉल्यूशन व 460 पीपीआय सोबत उपलब्ध आहे. तर iPhone 14 Plus मध्ये 6.7 इंचाचा आकर्षक डिस्प्ले आहे. दोन्ही आयफोनचा डिस्प्ले सुंदर अशा 1,200 निट्सच्या पीक ब्राइटनेस आणि ऑलवेज ऑन डिस्प्लेचा सपोर्ट दिला असून, या दोन्ही आयफोनमध्ये ए15 बायोनिक प्रोसेसर देण्यात आला आहे. दोन्ही आयफोन सोबत 12 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामुळे हे आयफोन्स ग्राहकांच्या अधिक पसंतीस उतरताना दिसत आहे.