By Benzeer Jamdar27 Feb, 2023 18:193 mins read 127 views
India's Top 5 Banks for 2023 : आपले पैसे सुरक्षित राहावेत यासाठी आपण बँकेत ठेवतो. पण, त्या बँकेचीही विश्वासार्हता खूप महत्त्वाची असते. कारण, अलीकडेच सिटी बँक सारख्या मोठ्या बँकेला कोलकातामध्ये गाशा गुंडाळावा लागला. आणि यात गुंतवणूकदारांचंच नुकसान होणार आहे. त्यामुळे तुमची बॅक सुरक्षित आहे की नाही हे पाहण्यासाठी देशातल्या सर्वात चांगली कामगिरी बजावणाऱ्या बँका पाहूया…
सिटी बॅंकनं कोलकाता शहरातल्या चौरंगी रस्त्यावर असलेली आपली शाखा अखेर बंद केली. या बिल्डिंगवरचा सिटी बॅंकेचा साइनबोर्ड काढून टाकण्यात आला आहे. सिटी बँकेचं कोलकाता शहरातलं मोठं अस्तित्व त्यामुळे संपलं. आपण ग्राहकांसाठीही हा मोठा संदेश आहे.
आपण ज्या बँकेत विश्वासाने पैसे ठेवतो ती सुरक्षित आहे ना, हा प्रश्न यामुळे तुमच्या मनात नक्की येऊ शकतो. आणि तसा तो आला असेल तर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या साईटवर बँकेच्या आर्थिक स्थितीविषयी माहिती जाणून घेऊ शकता. आणि त्याचवेळी साईटवर आणखी एक माहिती तुम्हाला मिळेल, ज्या बँकांनी चालू वर्षांत चांगली कामगिरी केलेली असेल. सध्या यावर्षातल्या अशा पाच बँकांची यादी आपण पाहूया…
एचडीएफसीचा फुलफॉर्म Housing Development Finance Corporation असा आहे. या बॅंकेची सुरूवात हसमुखभाई पारेख यांनी 1994 मध्ये केली होती.
एचडीएफसी बॅंक ही भारतातील बॅंकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. ही बॅंक भारतातील सर्वात मोठी खाजगी बॅंक असल्याचे सांगितले जाते. ग्राहकांना उत्तम अशा विविध सुविधांसोबत होमलोन, वाहन व व्यवसाय कर्ज तसेच डेबिट व क्रेडिट कार्ड सेवादेखील पुरवते.
2022 नुसार या बॅंकेत कर्मचाऱ्यांची संख्या एका लाखापेक्षा अधिक होते. देशात या बॅंकेची एटीएम संख्या 1360 असून शाखा 5103 आहेत. या बॅंकेच्या डेबिट कार्डचा उपयोग देशातील 23.5 कोटींपेक्षा अधिक ग्राहक करतात. तसेच क्रेडिट कार्डचा उपयोग 85.4 लाख ग्राहक करत आहेत.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI Bank)
http://www.reuters.com/
1 जुलै 1955 रोजी इम्पीरियल बॅंक (Imperial Bank) चे नाव बदलून स्टेट बॅंक ऑफ इंडिया ठेवण्यात आले होते. भारतातील सर्वात मोठी बॅंक म्हणून या बॅंकेची ओळख आहे. टाॅप बॅंकांमध्ये ही बॅंक दुसऱ्या क्रमाकांवर आहे.
एसबीआय बॅंकेमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या ही 2,57,000 पेक्षा ही अधिक आहे. देशात या बॅंकेची एटीएमची संख्या 59,000 पेक्षा जास्त आहेत. तसेच देशात या बॅंकेच्या शाखा 24,000 पेक्षा जास्त आहेत.
SBI चे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण जगातील 36 देशांमध्ये या बॅंकेची 195 कार्यालय आहेत. 200 वर्षापूर्वीचा इतिहास या बॅंकेला लाभला आहे. त्यामुळे सर्वात जुनी व विश्वासू बॅंक म्हणून स्टेट बॅंक ऑफ इंडियाला संबोधले जाते.
आयसीआयसीआय बॅंक (ICICI Bank)
http://www.cnbctv18.com/
ICICI बॅंकेचा फुल फाॅर्म इंडस्ट्रियल क्रेडिट अंड इन्व्हेस्टमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (Industrial Credit & Investment Corporation of India) असे आहे. या बॅंकेची स्थापना 1994 मध्ये करण्यात आली आहे. या बॅंकेचे मुख्यालय बांद्रा, कुर्ला काॅम्लेक्स मुंबई या ठिकाणी आहे. भारतात ही बॅंक सुरूवातीच्या 3 क्रमांकावर आहे.
या बॅंकेतील कर्मचाऱ्यांची संख्या 84922 पेक्षा अधिक आहे. तसेच देशात या बॅंकेच्या एटीएमची संख्या 15101 इतकी आहे. साधारण देशात या बॅंकेच्या 4882 शाखा आहेत.
आयसीआयसीआय बॅंकेच्या शाखा या चीन, दक्षिण आफ्रिका, दुबई, श्रीलंका, कतार, बहारीन, कतार, सिंगापूर, हाॅंगकाॅंग व ओमान या देशात देखील आहेत.
बॅंक ऑफ इंडिया (Bank Of India)
http://www.thestatesman.com/
बॅंक ऑफ इंडिया ही एक भारतीय राष्ट्रीयकृत बॅंक आहे. या बॅंकेची स्थापना 7 सप्टेंबर 1906 रोजी करण्यात आली होती. या बॅंकेचे मुख्यालय मुंबई येथील बांद्रा कुर्ला काॅम्प्लेक्स या भागात आहेत.
या बॅंकेत कर्मचाऱ्यांच्या संख्या 48,000 पेक्षा अधिक आहेत. तसेच भारतात या बॅंकेच्या शाखा साधारण 5100 पेक्षा जास्त आहेत.
बॅंक ऑफ इंडियाच्या शाखा परदेशातदेखील आहेत. यामध्ये न्यूझीलंड, सिंगापूर, फान्स, हाॅंगकाॅंग, जपान, केनिया, युके, युगांडा, बोत्सवाना, व्हिएतनाम, टांझानिया व आदि देशांचा समावेश आहे. विदेशात असणाऱ्या या बॅंकेची शाखा अंदाजे 56 असल्याचे सांगितले जात आहेत.
कोटक महिंद्रा बॅंक (Kotak Mahindra Bank)
http://www.moneycontrol.com/
भारतात कोटक महिंद्रा बॅंकेची स्थापना 1985 साली करण्यात आली होती. भारतातील सर्वात मोठया खाजगी क्षेत्रातील बॅंकांपैकी ही एक बॅंक म्हणून ओळखली जाते. 2003 मध्ये भारतीय रिझर्व्ह बॅंकेने कोटक महिद्रा फायनान्स लिमिटेडला बॅंक म्हणून काम करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती आहे.
कोटक महिंद्रा बॅंकेत कर्मचाऱ्यांची संख्या ही 33,000 पेक्षा अधिक आहे. तसेच देशात या बॅंकेच्या शाखा 1390 इतक्या आहेत. भारतात कोटक महिंद्राच्या एटीएमची संख्या 2100 पेक्षा जास्त आहेत. ही बॅंक ग्राहकांना वैयक्तिक वित्त, जीवन विमा, संपत्ती व्यवस्थापन व वित्तीय सेवांचा पुरवठा करते.
कोटक महिंद्रा बॅंकेचे नेतृत्व 35 वर्षापेक्षा अधिक काळ बॅंकेचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक व सीईओ उदय कोटक यांनी केले आहे.
RBI Policy : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) ने गेल्या वर्षीच्या मे (2022) महिन्यापासुन रेपो दरात (Repo Rate) 2.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. तर एप्रिलमध्ये होणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत पुन्हा एकदा दर 0.25 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे एकुण रेपो रेट 2.75 टक्के एवढा वाढलेला असु शकते.
SBI Bank News: तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये बँक खाते आहे का? असेल तर आठवडाभरापूर्वी तुमच्या बँक खात्यातून कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय 206.50 रूपये कापले गेले असतील. एसबीआयने हे पैसे का कापले याचे कारण जाणून घेऊया
NPA: एकूण 7.34 लाख कोटी रुपयांच्या NPA मधील कर्जांपैकी केवळ 14% कर्ज सार्वजनिक क्षेत्रातील बँका वसूल करण्यात यशस्वी ठरल्या आहेत अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. तसेच 7.34 लाख कोटी अनुत्पादित मालमत्तेपैकी केवळ 1.03 लाख कोटी रुपये वसूल केले गेले आहेत.