ऊन्हाळा म्हटले की साहजिकच लाइट बिल जास्त येणार हे गणित आपण कुठेतरी बांधून ठेवले आहे. मात्र या गोष्टींवर काही उपाय आहेत, जे आपल्या हातात आहेत. ज्यामुळे ऊन्हाळयात तुमचे लाइट बिल कमी येण्यास मदत होईल. म्हणजेच थोडक्यात ऊन्हाळयात लाइट बिल कमी येण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत, ज्यांनी तुमचे लाइट बिल कमी येईल.
फ्रिज (Fridge)
आपण नेहमीच म्हणतो की, फ्रीजमुळे लाइट बिल जास्त येते. पण तुम्ही या फ्रीजचा योग्य पध्दतीने वापर केला तर तुमचे लाइट बिल कमी येण्यास मदत होईल. जसे की, फ्रीज हा नेहमी नाॅर्मल मोडवर ठेवावे. तसेच फ्रीज हा कधी रिकामा ठेवू नये. जेणेकरून विनाकारण लाइट वेस्ट होईल. यामध्ये सातत्याने ताजी फळे, ताज्या भाज्या, दुध अशा अनेक गोष्टी ठेवाव्यात.
वाॅशिंग मशीन (Washing Machine)
वाॅशिंग मशीन हे कारण जास्त लाइट बिलचे मानले जाते. पण तुम्ही वाॅशिंग मशीनमध्ये खूप कपडे टाकत असाल तर थांबा. तुमच्या आवश्यकतेनुसारच कपडे वाॅशिंग मशीनमध्ये धुवायला टाका. तुम्ही जर वाॅशिंग मशीनच्या क्षमतेपेक्षा जास्त कपडे टाकाल, तर साहजिकच तुम्हाला लाइट बिलदेखील जास्त येणार. त्यामुळे त्या मशीनला झेपेल तेवढेच कपडे टाका.
लाइटचा अपव्यय टाळा (Avoid Wasting Light)
लाइटचा अतिवापर करून नये. जसे की, गरज नसताना दिवसा लाइट लावू नये. तसेच रूममध्ये कोणीही नसताना लाइट व फॅन बंद ठेवावे. म्हणजेच विनाकारण रूममध्ये कोणी नसताना फॅन सुरू ठेवु नये.
बल्बची निवड महत्वपूर्ण(Bulb Selection is Important)
घरात तुम्ही जो बल्ब लावता, त्यावर ही लाइट बिल अवलंबून असते. त्यामुळे शक्यतो सीएफएलचा बल्ब घरात लावावा. ज्यामुळे लाइट बिल कमी येण्यास मदत होईल. तसेच कंप्यूटर, टी.व्ही, एसीचे पावर बटण बंद करावे. तसेच मोबाईल चार्जिंग वेळेस शक्यतो मोबाईल चार्ज झाला की वायर काढून तसेच ठेवू नये. आठवणीने पावरचे बटण बंद करावे.
उपकरण जळण्याचा धोका कमी (Less Risk of Device Burns)
कंप्यूटर, टी.व्ही. प्लेअर हे रात्रीच्या वेळ सुरू ठेवू नये. जर हे सुरू ठेवल्यास लाइट बिल जास्त येण्याची शक्यता असते. घरातील उपकरणे ही पावर एक्सटेंशनला जोडावी. जेणेकरून लाइटचा लोढ जर जास्त वाढला तर उपकरण जळण्याचा धोका हा कमी असतो.
वाॅटर हिटर (Water Heater)
Tips to Reduce Light Bill: जर तुमच्याकडे वाॅटर हिटर आहे. तर त्याचे तापमान हे नेहमी 48 डिग्रीवर ठेवावे. त्यामुळे तुमचे लाइट बिल कमी येण्याची शक्यता जास्त असते.
एसी टाळा (Avoid AC)
ऊन्हाळयात एसी हा मोठया प्रमाणात वापरतात. पण तुम्हाला माहिती का एसीमुळे लाइट बिल खूप जास्त येते. पण एसी हा काही वेळेसाठी थंड राहण्यासाठी जरी चांगला असला तरी एसीची हवा ही आरोग्यासाठी बिलकुल चांगली नाही. तसेच एसीमुळे बाहेरील वातावरणदेखील खराब होते. त्यामुळे एसीचे हे दुष्परिणाम पाहता कुलर हा पर्याय निवडावा.
सोलर पॅनल (Solar Panel)
सोलर पॅनल हा पर्याय कधीही अधिक उत्तम आहे. यामुळे लाइटची गरज पडत नसल्यामुळे साहजिकच की सोलर पॅनलमुळे विजेचे बिल जास्त येणार नाही. पण सोलर पॅनल असेल तर तुम्हाला लाइट बिलाची चिंता करण्याची बिलकुल गरज नाही. या सोलर पॅनलमुळे ऊर्जेची व पैशांची दोन्ही बचत होते.
खिडक्या बंद ठेवाव्या (Keep the Windows Closed)
खिडकी सातत्याने उघडी ठेवल्यास, ऊन घरात येते. त्यामुळे घरातील तापमान अधिक वाढते व गरम होण्यास सुरूवात होते. त्यामुळे आपण फॅन, कुलर व एसी सुरू करतो. परिणामी त्याचा हा परिणाम लाइट बिलमध्ये दिसून येतो.
मशीनमध्ये कपडे वाळवू नये (Do not Dry Clothes in the Machine)
शक्यतो वाशिंग मशिनमध्ये कपडे वाळवु नये. ते ऊन्हात वाळवावे. जेणेकरून लाइट बिल कमी येण्यास मदत होईल.