• 31 Mar, 2023 08:28

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pre-Wedding Cost: प्री- वेडिंग शूटचा किती येतो खर्च? या मेट्रोमध्ये शूटसाठी परवानगी, किती असणार भाडे?

Pre-Wedding In Metro

तरूणाई उत्साहाने लग्नापूर्वी प्री-वेडिंग शुट करीत असते. यासाठी तरूणाई आर्थिक बजेटदेखील लक्षात घेते. त्यानुसार चित्रपटातील गाण्यांच्या शुटला लाजवेल इतके सुंदर शुट प्री-वेडिंगचे करते. अशा या प्री-वेडिंगची क्रेज पाहता, थेट नोएडाच्या रेल्वे विभागाने थेट मेट्रोमध्ये प्री-वेडिंगचे शुट करण्यास परवानगी दिली आहे. यासाठी किती खर्च येतो व परवानगी कशी मिळते याविषयी जाणून घेवुयात.

Pre-Wedding In Metro: लग्नापूर्वी प्री-वेडिंग करणे हा एक आता समाजाचा जणू काही नियमच बनला आहे. जसे की, सगळीकडे लग्नाची धाम-धूम आहे. त्यामुळे तरूणांईचीदेखील प्री-वेडिंगची लगबग जोमात सुरू असल्याचे पाहायला मिळते. तरूणांईची ही क्रेझ पाहता, थेट नोएडा मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी घोषणा केली की, मेट्रोच्या कोचमध्ये जन्मदिन, प्री-वेडिंग व अन्य कोणत्याही पार्टीचे नागरिक आयोजन करू शकता. त्यामुळे आता तरूणाई आपल्या प्री-वेडिंगचे शुट थेट मेट्रोमध्ये ही करू शकतात.

Pre-wedding shoot 1
http://www.photojaanic.com/

प्री वेडिंग शुट मेट्रोमध्ये करण्याची परवानगी

देशातील तरूणाईची प्री-वेडिंगची क्रेझ पाहता, नोएडा मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (NMRC-Noida Metro Rail Corporation) ने थेट मेट्रोमध्येच प्री-वेडिंगचे शुट करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे तरूणाईला प्री वेडिंगचे शुट करण्यासाठी आणखी एक सुंदर प्लॅटफाॅर्म मिळाले आहे. त्यामुळे तरूणाई आता मेट्रोच्या कोचमध्ये आपल्या महत्वपूर्ण आनंदाचे क्षण कॅमेरात कैद करू शकतात.  

किती येणार खर्च व बुकिंग कसे करायचे?

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मेट्रो कोच बुक केल्यानंतर साधारण एक तासाच्या आता ग्राहकाला 5 ते 10 हजार रुपये जमा करावे लागतील. याव्यतिरिक्त ग्राहकाला सिक्युरिटी मनी म्हणून 20,000 रुपये अॅडव्हाॅन्स जमा करावे लागणार आहे, जे नंतर त्यांना पुन्हा दिले जाईल. त्या त्या ग्राहकांना एनएमआरसीच्या काही अटींचे पालन करावे लागेल.

जसे की, हे प्री-वेडिंग शुट करण्याची मेट्रोच्या दैनंदिन वेळेत करायचे असेल किंवा रात्री 11 ते पहाटे 2 या वेळेत करायचा असेल, तर तुम्हाला या दोन्हींमधून निवड करावी लागेल. यासह, एका कोचमध्ये जास्तीत जास्त 50 लोक पार्टी करू शकतात.

Pre-wedding shoot 2
http://www.weddingbazaar.com/

प्री वेडिंगची फी किती असेल?

नोएडाच्या सेक्टर-51 मेट्रो स्टेशनपासून डेपो स्टेशन पर्यंतच्या प्रवासाची फी ही विना सजावटीची मेट्रो कोचसाठी प्रति तास 8,000 रुपये असेल. तर सजावटीसह ही फी  8000 ते 10000 रूपये होतील. नोएडा सेक्टर-51 आणि डेपो मेट्रो स्टेशनवर पार्क केलेल्या मेट्रो डब्यांसाठी प्रति तासाचे 5,000 रुपये फी आकारली जाईल. तर सजावटीसह ही फी 7000 रुपये असेल.

20 हजार ते तीन लाखांपर्यंत खर्च

एप्रिल, मे हा मुलांच्या सुट्टयांचा महिना असला की, या महिन्यात लग्नदेखील मोठया प्रमाणात होत असतात. पण तत्पूर्वी नवरा-नवरी लग्नाच्या सुंदर आठवणींचा ठेवा साठविण्यासाठी प्री-वेडिंग सारखे शुट करतात. हा बाॅलिवुड ट्रेड आजच्या तरूणांईमध्ये सुपरहीट आहे. प्री-वेडिंगसाठी एक फोटोग्राफर अरेंज केला जातो. यामध्ये लोकेशन, ड्रेस-कोड, लायटिंग, विविध सामग्री हाताळली जाते. एखादया चित्रपटाच्या गाण्याला लाजवेल, इतके सुंदर शुट हल्लीची तरूणाई शुट करते असते. पण यासाठी लागणार खर्चदेखील अफाट असतो. विशेष म्हणजे आता तर फोटोग्राफसने प्री-वेडिंगचे पॅकेजच तयार केले आहे. हे पॅकेजची किंमत साधारण 20 हजार ते तीन लाखांपर्यंत असते.

Pre-wedding shoot 3
http://www.happywedding.app/

लव्हस्टोरी थीमची वाढते डिमांड

एका चित्रपटाची लव्हस्टोरी ही प्री-वेडिंग समोर फिकी पडेल, हल्ली इतके सुंदर प्री-वेडिंगचे शुट केली जाते. शहरापासून दूर गावात, राज्यात, रिसोर्ट, सम्रुद किनारी या प्री-वेडिंगचे शुट केले जाते. त्यामुळे यासाठी लागणारा खर्चदेखील अधिक असतो. लव्ह स्टोरी थीमला तरूणांईची पसंद असल्याचे दिसून येते. यामध्ये मैत्री, मग मैत्रीचे रूपांतर प्रेमात, मग प्रप्रोज, प्रेम, एगेंजमेंट मग लग्न अशा चढत्या क्रमाने नवीन जोडीचे शुट केले जाते. म्हणजे संपूर्णपणे एका लव्हस्टोरीची कहानी दाखविली जाते. या थीमसाठी अधिक पैसा खर्च केला जातो.

कमी बजेटमध्ये ही फोटोशूट

तुमच्या बजेटनुसार, देखील तुम्ही प्री-वेडिंगसाठी खर्च करून शकतो. यामध्ये आपल्या शहरातील सुंदर ठिकाणे निवडू शकता किंवा घराजवळचा सुंदर रिसोर्टदेखील एक दिवसासाठी बुक करू शकता. जेणेकरून तुमचा व तुमच्यासोबत असलेल्या टीमच खाण्याचा व राहण्याचा खर्चाची बचत होईल. तसेच प्रवासासाठीचादेखील खर्च कमी होऊन वेळेचीदेखील मोठी बचत होईल. कमी बजेटमध्ये जर प्री-वेडिंग फोटोशुट करायचे असेल तर यामध्ये साधारण 30 ते 50 हजार रूपये इतका खर्च येईल. जर तुम्ही बाहेरील शहरात, राज्यात शुट करण्याचे ठरविले तर तुमचा हा खर्च लाखांच्या घरात पोहोचेल.