• 31 Mar, 2023 08:07

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bollywood Celebrities Earning from Instagram: बाॅलिवुड सेलिब्रिटी इंन्स्टाग्रामच्या एका पोस्टने किती कमाई करतात?

Bollywood Celebrity Instagram Earnings

शाहरूख खान, दिपिका पदुकोन, करिना कपूर यांसारखे बाॅलिवुडचे स्टार कलाकारांचे इंन्स्टाग्रामवर तुफान फाॅलोवर्स आहेत. त्यामुळे हे स्टार्स आपल्या इंन्स्टाग्रामवरून पोस्टच्या माध्यमातून कोणत्याही ब्रॅंडला प्रमोट करण्यासाठी करोडो रूपये फी आकारतात. पाहूया बाॅलिवूडचे कोणते सेलेब्रिटी इंन्स्टाग्रामवरून पोस्ट करण्याची किती फी आकारतात?

बाॅलिवुड स्टार्स हे फक्त चित्रपटच नव्हे तर अनेक माध्यमातून तगडी कमाई करतात. त्यातील एक इंन्स्टाग्राम या सोशल मिडियाच्या माध्यमातून एखाद्या ब्रॅंडला प्रमोट करण्यासाठी करोडो रूपये फी घेतात. पहा, बाॅलिवुडचे कोणते सेलेब्रिटी यासाठी किती फी घेतात?

शाहरूख खान (Shah Rukh Khan)

Shah Rukh Khan-1
http://www.ndtv.com/

बाॅलिवूड बादशाह शाहरूख खानच्या चाहत्यांची संख्या देशात व परदेशातदेखील मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे इंन्स्टाग्राम या सोशलमिडीया प्लॅटफाॅर्मवरदेखील त्यांच्या फाॅलोवर्सची संख्या अधिक आहे. आता तर पठाण चित्रपटानंतर या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

त्याच्या फाॅलोवर्सचा आकडा पाहता, किंग खान इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी साधारण 1.80 करोड रूपये फी घेतो. तसेच इंन्स्टाग्रामवर कोणत्या ब्रॅंडची जाहिरात करायची असेल, तर तो जवळपास 5 ते 6 करोड रूपये इतके चार्जेस घेतो. या सोशल मिडियाच्या पोस्टच्या माध्यमातून या बॉलिवूड स्टारची तगडी कमाई होते.

प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra)

Priyanka Chopra (1)
http://www.vogue.in/

बाॅलिवूडची ही स्टार परदेशात असली तरी तिच्या चाहत्यांच्या संख्येमध्ये काही कमी झाली नाही. याउलट तिच्या फाॅलोवर्सचा आकडा हा वाढतच चालला आहे. सध्या इंन्स्टाग्रामवर प्रियंका चोप्राच्या फॉलोवर्सचा आकडा 7.79 करोडपेक्षा ही अधिक आहे. त्यामुळे बाॅलिवुडची ही स्टार इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट करण्याची रक्कम 3.46 करोड रूपये इतकी घेते. संपूर्ण जगात इंन्स्टाग्रामवर पोस्टने सर्वाधिक कमाई करणाऱ्या लिस्टमध्ये प्रियंका चोप्रा ही सातव्या क्रमाकांवर आहे.

2019 मध्ये बाॅलिवूड सर्वाधिक फाॅलोवर्समध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्राचे नाव होते. विशेष म्हणजे या अभिनेत्रीचे बाॅलिवूड व हाॅलिवूड अशा दोन्ही क्षेत्रात तिच्या चाहत्यांची संख्या अधिक आहे. सध्या ती पती निक जोनस् सोबत यूएसएमध्ये राहते. नुकतेच तिने सोशलमिडीयावर आपल्या मुलीसोबतचे फोटो शेयर केले होते. त्याच्या या फोटोला लाखोमध्ये लाइक्स मिळाले होते.

दिपिका पदुकोन (Deepika Padukone)

Deepika Padukone-1
http://www.pinkvilla.com/

दिपिका पदुकोनचे नुकतेच पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे सुपरहीट झाले होते. तिच्या या गाण्याची चर्चा सोशलमिडीयावर अधिक झाली होती. तसेच ही अभिनेत्री सोशलमिडीयावर अधिक अॅक्टीव्ह असते. ती इंन्स्टाग्रामवर एका पोस्टने 1.80 करोड रूपये चार्ज घेते. कारण इंन्स्टाग्रामवर तिच्या फाॅलोवर्सची संख्या ही 80 लाखांपेक्षा अधिक आहे.

दिपिका पदुकोन व शाहरूख खानचा पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक हजार करोडोंची कमाई केली आहे. त्यांचा हा चित्रपट जागतिक स्तरावरदेखील सुपर-डूपर हीट झाला आहे. अशी बॉलिवूड स्टार चित्रपटांसोबतच सोशल मिडिया पोस्टनेदेखील तगडी कमाई करते.

आलिया भट्ट (Alia Bhatt)

Alia Bhatt
http://www.gqindia.com/

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आलिया भट्ट हिचे इंन्स्टाग्रामवर 71.1 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. रिपोर्टच्या माहितीनुसार ही आलिया भट्ट ही इंस्टाग्रामवर एक पोस्ट करायचे साधारण 1 करोड रूपये चार्जेस आकारते.

आलिया भट्ट व रणबीर कपूर यांची कन्या राहा ही तीनच महिन्यांची आहे. पण तरी ही आलियाने एका अॅर्वार्ड शो च्या कार्यक्रमात साडीवर नाटू-नाटू या गाण्यांवर डान्स करून सर्वांना अचंबित केले आहे. तिचा हा डान्स सोशल मिडीयावर सुपरहीट झाला आहे.

करिना कपूर (Kareena Kapoor)

Kareena Kapoor
http://www.indulgexpress.com/

सध्या करिना कपूर चित्रपट करत नसली, तरी ती तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करून तगडी कमाई करते. बाॅलिवूडची ही स्टार सोशलमिडियावर एक पोस्ट करण्याची रक्कम सुमारे 1 करोड रूपये घेते. तिच्या फालोवर्सची संख्या 9 मिलियनपेक्षा अधिक आहे.

करिना कपूरचा मागील वर्षी लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट रिलिज झाला होता. बाॅलिवुडचा स्टार आमिर खानसोबत ती या चित्रपटात झळकली होती. बाॅलिवूडचे हे दोन्ही स्टार या चित्रपटात असूनदेखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला.

अनुष्का शर्मा (Anushka Sharma)

Anushka Sharma-1
http://www.pinkvilla.com/

भारतीय क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी व बाॅलिवुडची स्टार अनुष्का शर्मा हिचे इंन्स्टाग्रामवर जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, अनुष्का शर्मा ही इंस्टाग्रामवर एक पोस्ट करण्याचे 95 लाख रूपये फी आकारते. तसेच ही अभिनेत्री पोस्ट करण्यापूर्वी येणाऱ्या ब्रॅंडचा विचार व अभ्यास करूनच त्यांना आपल्या पोस्टवरून प्रमोट करते.

अनुष्का शर्मा ही सध्या पती विराट कोहली सोबत इंदौरमध्ये आहे. एक मार्चपासून इंडिया व आस्ट्रेलियाच्या टेस्ट मॅच सुरू होणार असल्याच्या कारणाने आहे. त्यामुळे ही अभिनेत्री इंदौर शहराचा फेरफटका मारताना दिसते. नुकतेच तिने तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवरून इंदौरची सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोला अगदी कमी वेळेत चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.

रणवीर सिंह (Ranvir Singh)

Ranveer Singh-1
http://www.bollywoodhungama.com/

बाॅलिवुडचा सुपरस्टार रणवीर सिंहचा चाहतावर्ग सोशलमिडीयावरदेखील जबरदस्त आहे. या अभिनेत्याचे इंन्स्टाग्रामवर जवळजवळ 40.1  मिलियनपेक्षा अधिक फाॅलोवर्स आहेत. रणवीर सिंह हा इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट करण्याचे साधारण 81 लाख रूपयांपेक्षा अधिक फी घेतो.

बाॅलिवुडचा हा स्टार नुकताच पेप्सी या पेयाचा ब्रॅंड अॅम्बेसेडर बनला आहे. यापूर्वी सलमान खान होता. रणवीर सिंग हा नेहमीच त्याच्या फॅशन स्टाइलने चर्चेत असतो. तसेच त्याची एनर्जिक अॅक्टर म्हणूनदेखील बाॅलिवुड इंडस्ट्रीत ओळख आहे.