• 31 Mar, 2023 08:54

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Flipkart Holi Big Bachat Dhamaal Sale: एसी, फ्रिज आणि टीव्हीवर मिळतीये भरघोस सवलत

Flipkart Holi Big Bachat Sale

Flipkart Holi Big Bachat Dhamaal Sale: होळी निमित्ताने फ्लिपकार्डकडून 'होली बिग बचत धमाल सेल 2023' (Holi Big Bachat Dhamaal Sale 2023) सुरु करण्यात येणार आहे. ज्याच्या माध्यमातून ग्राहकांना भरघोस सवलतीसह खरेदी करता येईल.

ऑनलाईन ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट (Flipkart) होळी निमित्त आपल्या ग्राहकांसाठी  'होली बिग बचत धमाल सेल 2023' (Holi Big Bachat Dhamaal Sale 2023) सुरु करणार आहे. यानिमित्ताने फ्लिपकार्टवरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 80 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. हा सेल 3 ते 5 मार्च या कालावधीत चालणार असून यादरम्यान फ्लिपकार्ट अनेक उत्पादनांवर मोठी सूट देणार आहे.

या उत्पादनांमध्ये मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट, टीव्हीसह अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. फ्लिपकार्टने अद्याप सर्व डीलची माहिती दिलेली नाही, परंतु काही सवलती आणि ऑफर टीज केल्या आहेत. तुम्ही फ्लिपकार्टच्या अधिकृत साईटवरून या सवलतीची माहिती घेऊ शकता.जर तुम्हालाही घरघुती उपकरणांची किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनिक वस्तूची खरेदी करायची असेल, ही एक उत्तम संधी आहे.

‘या’ उपकरणांवर मिळू शकते इतकी सूट

फ्लिपकार्टवरून घरगुती उपकरणे आणि टीव्हीवरही मोठी सूट उपलब्ध करून देण्यात येत आहे. गृहोपयोगी वस्तूंवर ग्राहकांना 75 टक्के सूट मिळणार आहे. त्याच सोबत, फ्रीजवर देखील 60 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. उन्हाळ्याचे आगमन अपेक्षेपेक्षा लवकर झाले असल्याने ग्राहकांची नजर आता एअर कंडिशनरवरील ऑफर्सकडे जाऊ लागली आहे. या सेलमध्ये AC वर 55 टक्क्यापर्यंत सूट मिळेल.

इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंबद्दल बोलायचे झाले, तर लॅपटॉप, टॅबलेट आणि मोबाईल फोनवरही सूट मिळणार आहे. सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या लॅपटॉपवर 45 टक्के सूट ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय स्मार्टवॉच, स्पीकर आणि ट्रिमरसारख्या इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरही सवलत उपलब्ध आहे. स्मार्टफोनच्या बाबतीत, फ्लिपकार्टने आपल्या ऍपल, सॅमसंग आणि रियल-मी  उत्पादनांवर सूट दिली आहे.अलीकडे ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अशा ग्राहकांसाठी ही एक नवी संधी उपलब्ध झाली आहे.