• 31 Mar, 2023 08:35

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटांना मिळणार 1 कोटी रूपयांचे अनुदान, शिवरायांच्या जीवनावरील चित्रपट व त्यांची कमाई

Films on Chhatrapati Shivaji Maharaj will get a subsidy of Rs 1 crore

Image Source : http://www.twitter.com/

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांना 1 कोटी रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे व राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त करणाऱ्या चित्रपटांना दुप्पट अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी विधान परिषदेत केली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Movie List: आर्थिक बजेट 2023 सादर झाल्यानंतर मनोरंजन क्षेत्राला काहीच मिळाले नसल्याची खंत अनेक फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनी व्यक्त केली होती. त्यांच्या निराशाजनक प्रतिक्रियेनंतर महाराष्ट्र सरकारने मनोरंजन क्षेत्रातील मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी अनुदान देण्याची घोषणा नुकतीच विधानपरिषदेत जाहीर केली आहे.त्यामुळे मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी हा मोठा दिलासा आहे. यामुळे मराठी चित्रपटांना नक्कीच वाव मिळेल यात शंका नाही. 

किती मिळणार अनुदान? (How much Grant will be Received)

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर म्हणाले, मराठी इंडस्ट्रीमधील प्रेरणादायी चित्रपटांसाठी 1 कोटीपेक्षा अधिक अनुदान देणार आहे. तर राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त करणाऱ्या मराठी चित्रपटांना दुप्पट अनुदान देण्यात येणार असल्याचे त्यांनी विधानपरिषदेत सांगितले. तसेच फक्त 2 वर्षाच्या आतील मराठी चित्रपटच या अनुदानासाठी पात्र ठरविले जातील व 3 महिन्यांच्या आतील चित्रपटांना अनुदान देणे बंधनकारक करणार असल्याची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली.  

शिवरायांच्या जीवनासंबंधीत मराठी चित्रपट  

फर्जंद (Farzand)

farzad
http://www.hotstar.com/

1 जून 2028 रोजी प्रदर्शित झालेला फर्जंद या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट कोंडाजी फर्जंद या योध्याची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट आहे. या योध्याने मुठभर मावळयांना घेऊन पन्हाळा किल्ला काबीज करताना करणाऱ्या संघर्षाची ही कहानी आहे. या चित्रपटाने बाॅक्स आॅफीसवर तब्बल 10 करोड रूपयांची जबरदस्त कमाई केली होती. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित फर्जंद या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, निखिल राऊत, प्रसादओक, अस्ताद काळे, हरिश दुधाणे, अंकित मोहन आदि कलाकारांचा समावेश होता.  

फत्तेशिकस्त (Fateshikast)

fattezikasta-1
http://www.zee5.com/

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित फत्तेशिकस्त हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या उत्कृष्ट युध्दनीतीचे दर्शन घडविणारा चित्रपट आहे. या चित्रपटाला बाॅक्स आॅफीसवर तुफान प्रतिसाद मिळाला होता. महाराष्ट्र राज्य व्यतिरिक्त हा चित्रपट गोवा, गुजरात, कर्नाटक, निजाम, दिल्ली म्हैसूर या शहरातदेखील चालला होता. याठिकाणी ही प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळाली. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवडयात बाॅक्स आॅफीसवर एकूण 5.65 करोड रूपयांची घसघशीत कमाई केली होती. या चित्रपटातील चिन्मय मांडलेकर, मृण्यमी देशपांडे,अंकित मोहन, निखिल राऊत, समीर धर्माधिकारी, हरीश दुधाडे, आस्ताद काळे या आदि कलाकारांनीआपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले. 

हिरकणी (Hirkani)

hirkani
http://www.zeenews.india.com/

24 आॅक्टोबर 2019 रोजी प्रदर्शित झालेल्या हिरकणी या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटात हिरकणीच्या मुख्य भूमिकेत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पाहायला मिळाली होती. तर प्रसाद ओक या अभिनेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. ज्या गडावर ये-जा करण्यासाठी शत्रुंचा ही थरकाप उडतो, अशा किल्ल्यांवरून हिरकणी आपल्या तान्हया बाळासाठी रात्रीच्या वेळी उतरली होती. अशी या चित्रपटाची कहानी सुंदर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने या चित्रपटातून केला आहे. या चित्रपटाने बाॅक्स आॅफीसवर तब्बल 12 करोड रूपये कमविले आहे.  

पावनखिंड (Pawankhind)

pavankhind
http://www.glamsham.com/

छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा असणारा पावनखिंड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी द काश्मीर फाइल्स, बच्चन पांडे, गंगुबाई काठियावाडी हे बाॅलिवुडचे दमदार चित्रपट प्रदर्शित झाले होते,पण तरी ही प्रेक्षकांनी हा मराठी चित्रपट पाहणे पसंद केले. विशेष म्हणजे मराठी इंडस्ट्रीमधील हा चित्रपट पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल झाला होता. या चित्रपटाची त्यावेळी खूप चर्चा होती. हा चित्रपट दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केला. या चित्रपटाने बाॅक्स आॅफीसवर 10.44 करोड रूपयांची घसघशीत कमाई केली होती. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, प्राजक्ता माळी, अंकित मोहन, मृणाल कुलकर्णी आदि कलाकरांचा समावेश होता.