• 27 Mar, 2023 06:46

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dr. Babasaheb Ambedkar Yatra: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यात्रेसाठी IRCTC ने आणले स्वस्त टूर पॅकेज, जाणून घ्या किती खर्च?

Dr. Babasaheb Ambedkar Yatra

Image Source : http://www.1000logos.net.com/

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त IRCTC ने 'देखो अपना देश' या योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यात्राचे टूर पॅकेज सादर केले आहे. यामध्ये पर्यटकांना आंबेडकर यांच्या जीवनाशीसंबंधित स्थळांचे दर्शन करण्यास मिळणार आहे.

देशात पर्यटनाला वाव मिळावा यासाठी शासनाने देखो अपना देश ही संकल्पना नुकतीच बजेट 2023 च्या अंतर्गत जाहीर केली होती. आता याच योजनेअंतर्गत रेल्वेच्यावतीने डॉ. बाबा साहेब आंबेडकर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा अगदी स्वस्तात मस्त मिळणार आहे. यामध्ये आंबेडकर यांच्या आय़ुष्याशी संबंधित सर्व महत्वपूर्ण गोष्टींचे दर्शन होणार आहे. ही यात्रा कधी, कुठे व त्याचा काय खर्च असणार, हे पाहुयात.

कधी व किती दिवसांची आहे? (When and How Many Days)

भारतीय रेल्वेची इंडियन रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कार्पोरेशन लिमिटेड यांनी देखो अपना देश या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यात्रा टूर पॅकेज आणले आहे. ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित प्रमुख स्थळांचे दर्शन करता येणार आहे. या टूरची पहिली यात्रा 14 एप्रिल 2023 रोजी दिल्ली या राज्यातून सुरू होणार आहे. याच दिवशी आंबेडकर यांची जयंतीदेखील आहे. ही यात्रा साधारण 7 रात्र व 8 दिवसांची आहे.

स्थळं कोणती आहेत? (What are the Locations)

डॉ. बाबा साहेब आंबेडकर यात्रेची सुरूवात दिल्ली या शहरातून होणार आहे. या यात्रेतील पहिले स्थळ हे डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांचे जन्मठिकाण मध्यप्रदेश येथील महू असणार आहे. यानंतर ही ट्रेन नागपूर या ठिकाणी थांबणार आहे, ज्या ठिकाणी दीक्षाभूमी आहे. नागपूरनंतर या ट्रेनचा प्रवास सांचीसाठी सुरू होईल, जिथे सांचीचे स्तूप व अन्य बौध्द स्थळांचेदेखील दर्शन करण्यास मिळेल. 

सांचीनंतर वाराणसीसाठी प्रवास सुरू होईल, या ठिकाणी सारनाथ व काशी विश्वनाथ मंदिरांचादेखील समावेश करण्यात आला आहे. तसेच या यात्रेमध्ये पर्यटकांना शेवटचे ठिकाण प्रसिध्द असणारे महाबोधी मंदिर व अन्य मठांचे दर्शन होईल. तसेच यासोबत यामध्ये बौध्द स्थळ राजगीर व नालंदा या स्थळांनादेखील कवर केले जाणार आहे. ही यात्रा शेवटी दिल्ली याच शहरात संपणार आहे. पर्यटकांना दिल्ली, मथुरा व आग्रा या ठिकाणी चढता व उतरता येणार आहे.

या यात्रेचा हेतू (The Purpose of this Trip)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या यात्रेचा हेतू हा भारतीय संविधानाचे शिल्पकार, स्वतंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री, भारताचे मंजूरमंत्री अशा अनेक क्षेत्रात उच्च कामगिरी करणारे महान समाजसुधारक डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या आय़ुष्याशी संबंधित स्थळांना भेट देणे हा आहे.

या टूरचे तिकिट किती? (Ticket Cost)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या टूरच्या तिकिटाचा खर्च हा एका प्रवाशासाठी 29 हजार 440, दोन किंवा तीन प्रवासी असल्यास प्रत्येक प्रवासीसाठी 21650 तर पाच ते अकरा प्रवासी असल्यास 20380 रूपये असणार आहे. या खर्चामध्येच राहण्याचा, नाश्त्याचा व जेवणाचादेखील समावेश असणार आहे. 

आयआरसीटीसी पॅकेज (Packages of IRCTC)  

आयआरसीटीसीचे पॅकेज नियोजन करण्यासाठी केंद्र सरकारच्या भारतीय रेल्वेची इंडियन रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कार्पोरेशन लिमिटेड नावाची ही कंपनी आहे. ही कंपनीवर पर्यटकांच्या राहण्याची, जेवणाची व पर्यटनाची जबाबदारी असते. या कंपनीने देशातील पर्यटन व धार्मिक स्थळांच्या विविध टूरचे असे 21 पॅकेज तयार केले आहे. 

या पॅकेजमध्ये 3240 रूपयांपासून ते 80000 रूपयांपर्यंतचे पॅकेज देण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील मुंबईसह अनेक ठिकाणे ही पॅकेज उपलब्ध करून दिली आहेत. तसेच विमान, हाॅटेल खर्च, ट्रेन, खाण्याची सोय, विमा (इंश्युरन्स) सोबतच आदि सुविधा या पॅकेजमध्ये देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या पॅकेजमधील पर्यटकांची मोठी मागणी चार धाम, बुध्दिस्ट धार्मिक स्थळे व तिरूपती या स्थळांसाठी आहे.  

टूर पॅकेजबाबत माहिती (Tour Package Information)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या टूरची संपूर्ण माहिती पर्यटकांना आईआरसीटीसीची वेबसाइट irctctourism.com वर उपलब्ध आहे.