• 26 Mar, 2023 14:25

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Digital loan: डिजिटल लोनची वाढत आहे मागणी, जाणून घ्या त्याचे फायदे व तोटे

Digital loan

सध्या बऱ्याच कंपनीमधून मोठया प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली. त्यामुळे कित्येक लोकांच्या हाती पैसा नाही. अशा परिस्थितीत हे लोक डिजिटल लोनचा सहारा घेताना दिसत आहे. हे लोन घेताना कागदपत्रांची अधिक पूर्तता ही करावी लागत नाही. तसेच हे लोन फार कमी वेळेत खात्यात जमा होते. त्यामुळे अधिक लोक डिजिटल लोनकडे वळू लागले आहेत.

Digital Loan Advantages and Disadvantages: आता डिजिटल लोन हे घरबसल्या तुम्हाला सहजरीत्या कमी वेळेत प्राप्त होईल. या लोनसाठी कागदपत्रांची ही आवश्यकता नसते. त्यामुळे हे लोन प्राप्त करताना जास्त अडचणी येत नाही. म्हणून डिजिटल पध्दतीने लोन घेण्याचे प्रमाण वाढले आहे. पण या लोनचे जेवढे फायदे आहेत, तेवढे नुकसान ही आहे. या डिजिटल लोन विषयी  सविस्तर जाणून घेवुयात. 

डिजिटल लोन म्हणजे काय? ते कसे मिळवायचे?

डिजिटल लोन म्हणजे वेबसाईट्स किंवा मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज मिळवणं. असं कर्ज मिळवणं सोपं आणि सुटसुटीत आहे. तसंच त्यासाठी वेळही कमी लागतो. म्हणून ग्राहक डिजिटल लोनच्या मार्गाने जातात. इथं कर्ज देणारी वेबसाईट किंवा अ‍ॅप हे एखाद्या वित्तीय संस्थेशी जोडलेले असतात. आणि आपल्या माध्यमातून ते वित्तीय संस्थांकडून तुम्हाला कर्ज मिळवून देतात. म्हणजे कर्ज देणारी संस्था वेगळी आणि मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाईट चालवणारे लोक वेगळे असतात. पण, त्यामुळे या कर्जातला धोकाही वाढतो 

भारतात सध्या डिजिटल लोनचा पुरवठा या अनेक संस्था करत आहेत. तसेच प्ले स्टोअरवरदेखील याबाबत अधिक अ‍ॅप आहेत. यापैकी एखादे अ‍ॅप डाउनलोड करावे. यानंतर तुम्ही डाउनलोड केलेल्या अ‍ॅपच्या माध्यमातून कंपनीकडे  लोनसाठी अर्ज करू शकता. 

जर लोन देणाऱ्या कंपनीने आखलेल्या नियमांमध्ये तुम्ही बसत असाल, तर तुम्हाला कागदपत्रांची पूर्तता न करताही त्वरित लोन दिल जाईल. कारण या कंपन्याची  लोन देण्याची पध्दत जास्त अवघड नसते. विशेष म्हणजे तुम्हाला 10,000 पासून ते 5 लाखां पर्यंत सहज डिजिटल लोन प्राप्त होईल.  

डिजिटल लोनचे फायदे व नुकसान  

डिजिटल लोन घेणे हे जास्त धोकादायक असू शकते. कारण जेव्हा तुम्ही अ‍ॅप डाउनलोड करता, त्यावेळी ते अ‍ॅप मोबाईल अ‍ॅक्सेसच्या माध्यमातून तुम्हाला परवानगी मागते. यावेळी अ‍ॅपचा वापर करण्यासाठी तुम्हाला परवानगी तर द्यावीच लागते. ज्यावेळी तुम्ही या गोष्टीसाठी परवानगी देता, त्यावेळी तुमच्या मोबाईलचा सर्व डाटा त्या कंपनीच्या ताब्यात देता.

 त्यामुळे तुमच्या मोबाईलच्या डाटाचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते. तसेच डिजिटल पद्धतीने कर्ज देणाऱ्या संस्थांचे व्याजदर देखील जास्त असते. बॅंकांच्या तुलनेत या संस्थांना अधिक व्याजदर द्यावे लागते. तसेच हप्ता वेळेत न भरल्यास अशा वेळी तुमच्याकडून अधिक दंड वसूली केली जाते. त्यामुळे होम लोन त्वरित होत असले तरी त्याने नुकसान जास्त असल्याचे दिसते.  

डिजिटल लोनचे प्रमाण कोरोना काळात वाढले

कोरोना काळात अनेक व्यवसाय ठप्प झाले तसेच अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या ही गेल्या होत्या. अशा परिस्थितीत लोकांना पैशांची खूपच गरज होती. त्यामुळे लोकांनी लोनसाठी बॅंकांकडे अर्ज केले पण नोकरी व व्यवसाय नसल्याने बॅंकांनी ही अर्ज फेटाळले. अशा वेळी लोकांनी डिजिटल पध्दतीनं लोन घेण्यावर भर दिला. कारण यासाठी अधिक कागदपत्रांची आवश्यता ही नव्हती. त्यामुळे हे लोन त्यावेळी सहजरीत्या मिळत होते.