• 31 Mar, 2023 08:24

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Saving Account Types: बचत खात्यांचे वेगवेगळे प्रकार आणि त्याचे फायदे

Saving Account Types

तुम्ही जर नोकरी करीत असाल, तर तुम्हाला बचत करणे खूप महत्वाचे आहे. जर भविष्यात आर्थिक सुरक्षा पाहिजे असेल, तर आजच पगारातून बचत करण्याची सवय स्वत: ला लावून घ्या. पण ही बचत कशी करायची हा प्रश्न जर तुम्हाला पडला असाल, तर खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, बचत खात्यांचे विविध प्रकार व त्याचे फायदे.

समजा, तुमची अचानक नोकरी गेली, दुर्देवाने अपघात झाला, कोरोनासारखे आजार अचानक उदयास आले अशा काही नैसर्गिक आपत्तींमुळे संकटे ओढवली तर पैसे आणायचे कुठून?  तसेच अशा परिस्थितीत कोणापुढे हात पसरू लागू नये यासाठी स्वत:ची बचत केलेली रक्कम असणे खूप महत्वाचे आहे. तुम्हाला भविष्याच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी बचत करायची असेल, तर बचत खात्याचे प्रकार व त्याचे फायदे जाणून घ्या.

चालू खाते दैनंदिन जीवनातील पैशांच्या नियमित व्यवहारांसाठी उघडले जाते. हे खाते उघडण्यासाठी बॅंक कोणत्याही प्रकारचे चार्जेस फी घेत नाही. चालू खाते उघडल्यानंतर तुम्हाला सेव्हिंग अकाउंट मध्ये जी सुविधा मिळते त्यासोबतच मोबाईल बँकिंग, ओव्हरड्राफ्ट, डायरेक्ट डेबिट अशा अनेक सुविधांचा लाभ घेता येतो.

चालू खात्यात शक्यतो ग्राहकांचे पैसे जमा होतात व तेवढेच पैस काढले ही जातात. जसे की, पगार. यामुळे या खात्यावर बॅंकेकडून कोणत्याही प्रकारच्या व्याजाची रक्कम दिली जात नाही. शक्यतो, सर्वच कंपन्या, व्यावसायिक व संस्था चालू खात्यांचा वापर करतात.

चालू खात्यात ओव्हरड्राफ्ट सुविधा फायदेशीर ठरते. कारण समजा एखाद्या वेळी खात्यामध्ये पैशांची रक्कम कमी आहे पण व्यवहारासाठी जास्त पैसे ट्रान्सफर करायचे आहे. मग अशा परिस्थितीत बॅंक आपल्याजवळील रक्कम कर्जाऊ स्वरूपात देते. एकप्रकारे ही सुविधा क्रेडिट कार्डप्रमाणेच आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.

पण प्रत्येक बॅंकांच्या स्वत:च्या अशा वेगवेगळया पाॅलिसी आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या बॅंकेच्या पाॅलिसिनुसार हा फायदा मिळवू शकता.

बचत खाते या नावावरूनच लक्षात येते की, तुम्ही या खात्यात तुमचा पैसा सेव्हींग करू शकता. जेणेकरून तुम्हाला या पैशांवर बॅंकेकडून व्याजदर मिळत जाईल. या खात्यात तुमची जितकी जास्त रक्कम असेल, तितके जास्त तुम्हाला व्याजदर प्राप्त होईल.

हे खाते कोणतेही व्यक्ती म्हणजेच नोकरदार असो या सरकारी कामगार, पेन्शनधारक, विद्यार्थ्यी असो हे सर्व लोक बचत खाते उघडू शकतात. त्यामुळे भविष्याच्या आर्थिक सुरक्षितेसाठी ही बचत खाते फायदेशीर ठरते.

बचत खात्यामध्ये खातेधारक अधिक पैसा जमा करू शकतात. या जमा करण्यावर बॅंकेचे कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. पण पैसे काढण्याच्या संख्येवर त्या त्या बॅंकेचे काहीसे अटी व नियम आहेत. जसे की, त्या त्या बॅंकेनुसार एक रक्कम ठरविली असते, त्या रकमेपेक्षा तुम्ही कमी रक्कम काढू शकत नाही. तसेच 6 महिन्यात  30 पेक्षा ही अधिक वेळा तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकत नाही. आता बहुतेक बॅंकांची खात्यात एक ठराविक रक्कम ठेवण्याची अटदेखील आहे. 

टेबलमध्ये पहा, 2022 व 2023 नुसार बॅंका बचत खात्यांवर किती व्याजदर आकारतात?

How much interest do banks charge on savings accounts_

मुदत ठेव खात्याला एफडी खाते (FD) असे ही म्हणतात. भारतात एफडी खाते हे अधिक लोकप्रिय आहे. कारण भारतात सर्वाधिक ग्राहक एफडी खाते उघडण्यास प्राधान्य देतात. या खात्यात एक ठराविक रक्कम गुंतवून त्यावर एफडीच्या स्वरूपात व्याजदर रक्कम प्राप्त करतात.

हे खाते शक्यतो सेवानिवृत्त लोक  किंवा मध्यम वर्गीय कुटूंबातील लोक मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी व अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीसाठी उघडतात. जेणेकरून ज्यावेळी या पैशांची गरज पडेल, त्यावेळी हे लोक एफडी तोडतात आणि पैशांचा उपयोग करतात. थोडक्यात अडचणीच्या वेळी या बचत केलेल्या पैशांची मदत होते.

एफडी खात्यामध्ये कमीत कमी एका आठवडयापासून ते दहा वर्षांपर्यंत एखादी ठराविक रक्कम निश्चित करण्याची सुविधा आहे. या रकमेवर खातेदाराला बॅंकेकडून व्याजदेखील मिळते.

महत्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला ठराविक वर्षासाठी ठेवलेल्या एफडीची रक्कम काही कारणास्तव त्या ठरविलेल्या वर्षापूर्वीच काढायची असेल, तर बॅंक त्यावर काही दंड आकारते. पण त्यांच्या या दंडाची रक्कम कमीदेखील असते.

नियमितपणे ज्यांना बचत करण्याची सवय आहे, त्यांच्यासाठी आवर्ती ठेव खाते फायदेशीर आहे. या खात्या अंतर्गत खातेदाराला एक निश्चित कालावधीसाठी खाते उघडावे लागते आणि त्यामध्ये दर महिन्याला एक ठराविक रक्कम भरावी लागते. याचा निश्चित कालावधी पूर्ण झाला की, खातेदाराला व्याजासहित त्याला त्यांची संपूर्ण रक्कम मिळते. या खात्याचा निश्चित कालावधी 6 महिने ते 1 वर्षाचा असतो.

आवर्ती ठेव खात्या अंतर्गत खातेदाराला कालावधी पूर्ण झाल्याशिवाय पैसे काढता येत नाही. मात्र खातेदाराला पैशांची गरज पडल्यास तो मुदतपूर्वीच आपले हे खाते बंद करू शकतो. पण त्या दिवसांपर्यंत त्यांने गुंतवणूक केलेल्या रक्कमवर त्याला त्या दिवसांपर्यंतचे पैसे बॅंकेकडून दिले जाईल.

  • बचत खात्यामध्ये पगारदार व्यक्ती आपल्या पगारातील काही रक्कम भविष्यासाठी बचत करू शकतात
  • बचत खात्यातील रक्कमवर व्याज मिळवू शकते
  • बचत खात्यात अधिक काळ बचत करू शकता, मर्यादा नाही
  • बचत खाती इंटरनेट बँकिंग व मोबाईल बँकिंग सुविधां असल्यामुळे बॅंक बॅलन्स चेक करता येते
  • बचत खात्यातून क्रेडिट (Credit card), डेबिट कार्ड (ATM Card) वापरून ऑनलाइन खरेदी करू शकता
  • बिल पेमेंट, मोबाईल फोन रिचार्ज व DTH टॉप-अप करता येतो
  • बचत खात्याद्वारे कमी व्याजदरात आकर्षक कर्ज आणि वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येतो
  • बचत खात्याव्दारे EMI व क्रेडिट कार्ड बिल ही ऑनलाईन भरू शकतो