• 31 Mar, 2023 08:28

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bull Price is 50 Lakh: देशातील 'या' बैलाची किंमत आहे, तब्बल 50 लाख रूपये

Bull Price is 50 lakh rupees

Image Source : http://www.thehindu.com/

महागडया गाडया, बंगले, कपडे, शूज यांच्या किंमती ऐकल्या असतील. पण आता मात्र या बैलाची किंमत ऐकून तर होश उडून जाईल. कारण चक्क बाजारात 'या' बैलाची किंमत चक्क 50 लाख रूपये आहे.

50 लाख रूपयांचा बैल! ही किंमत ऐकून नक्कीच तुम्ही ही चक्रावून गेला असाल, यात शंकाच नाही. कारण मोठ-मोठया सेलेब्रिटी, उदयोपतींच्या लक्झरी कार्सची किंमत ही या बैलाची किंमत आहे. असा हा कोणता बैल आहे, याविषयी सविस्तर जाणून घेवूयात.  

काय नाव आहे बैलाचे?

50 लाख रूपये किंमतीच्या या बैलाचे नाव आहे ओंगोल (Ongole). शक्यतो, देशात विविध बैलांच्या जाती आहेत, यामध्ये काही बैलांच्या किंमती या कोटयावधी रूपयांच्या घरातदेखील असतात. त्यापैकी एक ओंगोल जातीचा बैल, या बैलाची किंमत साधारण 50 लाख रूपयांपर्यंत असते.          

ओंगोल हे नाव कसे पडले?

ओंगोल हे भारतातील प्राचीन जातीचे नाव आहे. कारण या जातीचे बैल हे आंध्र प्रदेशातील प्रकाशमय जिल्हयातील ओंगोल या गावातील असतात. म्हणून या महागडया बैलाला ओंगोल हे नाव पडले आहे. 

हा बैल इतका महाग कसा?

ओंगोल हा बैल सर्वसामान्य बैलांपेक्षा वेगळा आहे. कारण सामान्य गुरांना जे रोग होतात, ते रोग या बैलाला होत नाही. जसे की, ओंगोल बैलाला पाय व तोंडाचे आजार उद्भवत नाहीत. माड गाय, गुरांचा सर्वाधिक धोकादायक रोगदेखील ओंगोल बैलाचे नुकसान करू शकत नाही.ओंगोल हा बैल या तीन आजारांपासून पूर्णपणे मुक्त आहे. त्यामुळे हा बैल एकदम निरोगी व बलवान असल्याने याची किंमत एखादया लक्झरी कारच्या किंमतीप्रमाणे आहे.   

राष्ट्रीय खेळात ही ओंगोल अव्वल 

ओंगोल हा बैल इतका शक्तिशाली आहे की, या बैलाचा वापर आंध्र प्रदेश व तामिळनाडूमध्ये बैलांच्या लढाईमध्ये केला जातो. त्याची लढण्याची अफाट शक्ती पाहता, अनेक लोक हा महागडा बैल खरेदी करणे पसंद करतात. यासाठी ते लाखो रूपये खर्च करण्यासदेखील मागे-पुढे पाहत नाही. 2002 च्या भारतीय राष्ट्रीय खेळांमध्ये ओंगोल या जातीला शुभंकराचा दर्जा दिला गेला. यावरूनच त्याच्या शक्तीचा अंदाज आला असेल.  

कोणत्या देशात होते या बैलाची निर्यात?

ओंगोल या जातीमध्ये गाईंचादेखील समावेश आहे. मात्र ही जात बैलासाठी खूपच प्रसिध्द आहे. या जातीचे बैलांची मेक्सिको, अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, मलेशिया, नेदरलॅंड, कोलंबिया, इंडोनिशिया, प्राग, वेस्ट इंडिज, फिजी, आस्ट्रेलिया, माॅरिशिस व फिलिपिन्स या देशात मोठया प्रमाणात निर्यात केली जाते.  

ओंगोल बैलाची किंमत?

ओंगोल बैल खरेदीसाठी असा कोणताही दर निश्चित करण्यात आला नाही. मात्र सर्वाधिक आक्रमक व लढाऊ वृत्तीच्या बैलाची किंमत ही 50 लाख रूपयांपर्यत जाऊ शकते. बैलांच्या स्पर्धेसाठी व लढाईसाठी या बैलाची किती क्षमता आहे, यावर त्याची किंमत अवलंबून असते.