• 31 Mar, 2023 08:17

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank Account Fraud : तीन दिवसांत 40 च्या वर लोकांना ‘असं’ फसवलं

Bank Fraud

Bank Account Fraud : मुंबईत मागच्या तीन दिवसांत एका बनावट sms च्या आधारे 40 च्या वर लोकांना फसवण्यात आलंय. मुंबई पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. आणि फसवले गेलेल्यांमध्ये अभिनेत्री श्वेता तिवारीचाही समावेश आहे.

आपल्या वॉट्स अ‍ॅपवर एक मेसेज नियमितपणे येतो. तुमचं बँक अकाऊंटचं kyc करणं बाकी आहे आणि पॅन कार्ड अपडेट व्हायचं आहे. अनेकदा आपलं ज्या बँकेत खातं आहे, तिथूनच हा मेसेज येतो. आणि असा मेसेज अनेकदा बरोबरची निघतो.      

पण, मुंबईनगरीत अशा मेसेजमुळे किमान 40 जणांची फसगत झाली आहे. या सगळ्या घटना अलीकडच्या म्हणजे 2 ते 5 मार्चच्या आहेत. एसएमएस वरून नवीन वेबसाईटवर गेलेल्या लोकांच्या बँक अकाऊंटची माहिती सायबर चोरांना मिळाली. आणि त्यांनी लोकांच्या खात्यातले लाखो रुपये काढून घेतले आहेत.     

Shweta Menon
Source : www.quora.com

बेमालूनपणे फसवल्या गेलेल्या लोकांमध्ये श्वेता मेनन या अभिनेत्रीचाही समावेश आहे. तिने आपल्याबरोबर झालेल्या फसवणुकीबद्दल बोलताना म्हटलंय की, ‘पैशाविषयीचं एक कटू सत्य मला पैसे गमावल्यावर कळलं. एका मेसेजवर आलेल्या लिंकवर क्लिक करून मी एका वेबपेजवर गेले. तिथे माझा पॅन नंबर, दोन ओटीपी, बँक खातं क्रमांक, ऑनलाईन आयडी असं सगळं भरलं. हा फॉर्म भरल्यावर काही तासात माझ्या दोन खात्यात मिळून 58 हजारांच्या वर रक्कम चोरांनी काढून घेतली. मी खार पोलीस ठाण्यात चौकशी केली तेव्हा कळलं माझ्या सारखीच फसवणूक आणखी 50 जणांची झाली होती.’     

कशी झाली सायबर चोरी?     

मागच्या आठवड्यात अनेकांच्या फोनवर मेसेज यायला सुरुवात झाली. त्याचा मजकूर असा होता,      

‘Dear Customer, you Bank ACCOUNT Has Been Blocked Today Please Update Your PAN CARD,  https://rb.gy/x5tvws/ ’     

हा युआरएल इथं मुद्दाम दिला आहे. कारण, अशा मेसेजला महामनीच्या वाचकांनी फसू नये म्हणून. जे लोक या मेसजला फसले, त्यांचं आर्थिक नुकसान झालं.      

या लिंकवर क्लिक केल्यावर नवीन बनावट वेबसाईट उघडत होती. आणि या वेबसाईटवर एक फॉर्म भरायला सांगितला जात होता. या फॉर्ममध्ये तुमचा पॅन कार्ड नंबर, बँक खातं क्रमांक, ऑनलाईन व्यवहारांसाठी लागणारा ID क्रमांक अशी सगळी माहिती विचारली जात होती. शिवाय दोन वेळा तुमच्या नोंदणी केलेल्या नंबरवर ओटीपीही येत होता.     

फसगत झालेल्या लोकांनी असा ओटीपीही चोरांना देऊन टाकला.     

Spam Message
ओटीपी दिल्यानंतर अगदी काही मिनिटांत त्या लोकांच्या खात्यावरून बरीच रक्कम काढून घेण्यात आली. मुंबई उपनगरातल्या पोलीस स्थानकांमध्ये वारंवार अशा तक्रारी येऊ लागल्यावर सायबर क्राईम विभागाने ही सगळी प्रकरणं एकत्र केली. तर मागच्या तीन दिवसांत अशी 47 प्रकरणं निघाली. आणि प्रकरणं अजून बाहेर येतच आहेत.     

सायबर गुन्हे विभागाने घेतली दखल      

प्रकरणांची संख्या वाढत गेल्यावर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलचे उपायुक्त बलराम राजपूत यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. यात आताच्या सायबर घोटाळ्याची माहिती देण्याबरोबरच आपल्याबरोबर असं घडू नये यासाठी घ्यायची काळजीही लिहिलेली आहे.      

बलराम राजपूत यांनी अलीकडेच एक ट्विट करून ऑनलाईन सायबर घोटाळ्यांची माहिती दिली आहे.     

याशिवाय पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात लोकांनी अशा ईमेलना बळी पडू नये यासाठी काही सूचना करण्यात आल्या आहेत,      

 • तुमची खाजगी आर्थिक माहिती अनोळखी लोक, वेबसाईटना देऊ नका    
 • KYC साठी बँक शाखेला भेट द्या. किंवा बँकेच्या अधिकृत साईटवर जा    
 • मोबाईल फोनसाठी पासवर्ड ठेवा     
 • चुकून वेबसाईट उघडलीच तर तिचा url नीट तपासा. वरच्या प्रकरणामध्ये url योग्य नाही हे स्पष्ट दिसतंय.     
 • तुमचं ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेला ताबडतोब झालेल्या फसवणुकीविषयी कळवा    

नुकत्या झालेल्या प्रकरणात ठाण्याच्या एका व्यक्तीचे पैसे मुंबई सायबर सेलने परत मिळवून दिले. त्याबद्दल त्यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.     

सायबर सेलकडे तक्रार कशी करायची?     

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फसवणुकीची शंका जरी आली तरी तुम्ही सायबर सेलची मदत घेऊ शकता. पोलीसही आधी तेच करण्याचा सल्ला तुम्हाला देतात. तुम्ही जवळच्या पोलीस स्थानकांत तक्रार केलीत तरी पोलीस गुन्ह्याचं स्वरुप बघून तुमचं प्रकरणं सायबर सेलकडे वर्ग करू शकतात.      

How to register complaint with Cyber Cell

पण, त्या व्यतिरिक्त तुम्ही फोनवरून किंवा वेबसाईटवर जाऊनही सायबर सेलकडे तक्रार करू शकता.      

 • सायबर सेलचा ऑल इंडिया नंबर आहे 155260    
 • तर वेबसाईट आहे  https://cybercrime.gov.in/    
 • वेबसाईटवर गेल्यावर ‘file a complaint’ क्लिक करायचं     
 • आणि तुमची तक्रार अगदी सविस्तर लिहायची    
 • तुमचा मोबाईल क्रमांक, ईमेल, पत्ता द्यावा लागतो     
 • तुमच्या शहरात सायबर सेलचं कार्यालय नसेल तर नजिकच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा    

महत्त्वाचं म्हणजे तक्रार केल्यानंतर तुमच्याकडे सगळे कागदोपत्री पुरावे गोळा करून ठेवा. पोलीस चौकशीत आणि पुढे केस उभी राहिल्यावर त्यांची कधीही गरज पडू शकते. तुम्हाला आलेला ईमेल किंवा sms ही जपून ठेवा.