IRCTC Tour: भारतीय रेल्वेव्दारे पर्यंटकांसाठी एक खास टूर आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये पर्यटकांना अयोध्या ते श्रीलंका प्रवासात भगवान राम यांच्या मंदिरांचे दर्शन घेता येणार आहे. श्री. रामायण यात्रा या टूरसाठी किती खर्च येणार तसेच टूरसंबंधी सर्व गोष्टी जाणून घेवुयात.
श्री. रामायण यात्रा कधी होणार सुरू?
IRCTC व्दारे खास पर्यटकांसाठी श्री. रामायण यात्रा (Shri.Ramayana Yatra) ही 7 एप्रिल 2023 रोजी सुरू होणार आहे. या यात्रेमध्ये पर्यटकांना श्री. भगवान राम यांच्यासंबंधित सर्व ठिकाणांचे दर्शन घेता येणार आहे. यामध्ये अयोध्या ते श्रीलंका या दरम्यानच्या मंदिरांचा समावेश करण्यात आला आहे. या यात्रेची बुकींग ही IRCTC व्दारे करण्यात येणार आहे.
या टूरचा प्रवास मार्ग कसा असेल?
IRCTC नुसार, या श्री. रामायण यात्रा पॅकेजमध्ये फक्त 120 सीट्स उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये AC I कूपमध्ये 24 सीट उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये AC I केबिनमध्ये 48 सीटे व एसी II मध्ये 48 सीटे असणार आहे. ही यात्रा दिल्ली (Delhi) या शहरापासून सुरू होणार आहे. यानंतर ही ट्रेन सफदरजंग (Safdarjung), अयोध्या (Ayodhya), जनकपूर (Janakpur), सीतामंढी (Sita Mandhi), बक्सर (Buxar), वाराणसी (Varanasi), मानिकपूर जंक्शन (Manikpur Junction), नाशिक रोड होसपते (Nashik Road Hospate), रामेश्र्वरम (Rameswaram), भद्राचलम रोड (Bhadrachalam Road), नागपूर (Nagpur) सहित सर्व रेल्वे स्टेशन कवर करत जाणार आहे. या यात्रेचा प्रवासदेखील दिल्ली या ठिकाणीच संपणार आहे. तसेच डी-बोर्डिंग स्टेशनमध्ये वीरांगना लक्ष्मी बाई, ग्वालियर, आगरा, मथुरासारखे रेल्वे स्टेशन यांचादेखील समावेश असणार आहे.
किती असणार खर्च?
आयआरसीटीसीनुसार, AC I कूपसाठी डबल शेयरिंग करण्याची परवानगी मिळाली आहे. याची किंमत 1,68,950 रूपये आहे. जे की AC 1 केबिनसाठी सिंगल, डबल व ट्रिपल शेयरींगची किंमत ही वेगवेगळी असणार आहे. जी 1,61,645 ते 1,35,500 रूपयांच्या दरम्यान असणार आहे. तसेच AC 2 साठी किंमत ही 1,29,165 ते 1,03,020 च्या दरम्यान असेल. जर यात्रेमध्ये 5 वर्षांपेक्षा लहान मुलांचा समावेश असेल तर त्यांच्या तिकिटांची किंमत ही एसी 1 केबिनसाठी1,35,500 रूपये एसी 2 साठी तिकिटाची किंमत 1,03,020 रूपये असणार आहे. ही यात्रा 7 एप्रिल 2023 रोजी दिल्ली येथून सुरू होणार आहे व या यात्रेचे शेवटचे स्थानकदेखील दिल्लीच असणार आहे.