8 मार्च 2023 या दिवशी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जगातील सर्वात मोठी ओळख असणाऱ्या रामोजी फिल्म सिटीने खास महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच या फिल्म सिटीच्या तिकिटावरदेखील एक खास ऑफर महिलांसाठी ठेवली आहे.
Amazing offer on Ramoji Film City Tickets: हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी हे एक प्रसिध्द ठिकाण आहे. या फिल्म सिटी पाहण्यासाठी जगभरातून लोक या ठिकाणी भेट देतात. पण मार्च महिन्यात साजऱ्या होणाऱ्या महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी ही फिल्म सिटी पाहण्यासाठी एक जबरदस्त ऑफर ठेवली आहे. त्यामुळे तुम्ही जर या रामोजी फिल्म सिटीला भेट देणार असाल तर 31 मार्चपर्यंत तुम्हाला ही खास संधी आहे.
एक चॅनलेच्या मुलाखतीमध्ये फिल्म सिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, 1 ते 31 मार्च दरम्यान खास महिलांसाठी रामोजी फिल्म सिटीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच महिलांना एक विशेष ऑफरदेखील देण्यात आली आहे. पर्यटनासाठी येणाऱ्या एका महिलेच्या तिकिटावर दुसऱ्या महिलेला या ठिकाणी मोफत प्रवेश मिळणार आहे. म्हणजेच एका तिकिटाच्या पैशांवर दोन महिलांना रामोजी फिल्म सिटी पाहता येणार आहे. त्यामुळे महिलांसाठी ही जबरदस्त ऑफर आहे. तुम्ही जर हैदराबाद फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर मार्च महिन्यातच हा प्लॅन करा. जेणेकरून तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येईल.
काय पाहता येईल फिल्म सिटीमध्ये?
रामोजी फिल्मसिटीमध्ये महिला दिनानिमित्त खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महिलांना प्रोत्साहन देणारे अनेक विषय सादर करण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी महिलांना थीमवर आधारित अनेक आकर्षक जागा, भव्य-दिव्य चित्रपट सेटस्, भव्य थीम्सवर आधारित गार्डन, लक्षवेदक कारंज्याचा आनंद घेता येणार आहे. सोबतच स्टूडिओ टूर, बर्ड पार्क, बटरफ्लाय पार्क, बोन्साई गार्डनदेखील पाहता येणार आहे.
गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नाव
जागतिक स्तरावर रामोजी फिल्म सिटीचे मोठे नाव आहे. 2000 एकरमध्ये पसरलेले अवाढव्य अशी ही फिल्मसिटी आहे. प्रेक्षकांसोबतच निर्मात्यांसाठीदेखील ही जागा एक प्रकारे स्वर्गच आहे. या फिल्मसिटीमध्ये जवळपास 2500 पेक्षा जास्त भाषांमधील चित्रपटांची शुटींग झाली आहे. जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी म्हणून रामाजो फिल्म सिटीची गिनिज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.
कसे कराल बुक तिकिट?
तुम्ही जर रामोजी फिल्म सिटी फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर या महिला दिन ऑफरचा लाभ घेता येणार आहे. पण तुम्हाला ही ट्रीप 31 मार्चपूर्वी नियोजित करावी लागणार आहे. या ऑफरअंतर्गत फक्त महिलांना ऑनलाइन व अॅडव्हान्स बुकिंगव्दारे फिल्म सिटीचे तिकिट बुक करता येणार आहे. अधिक माहितीसाठी www.ramojifilmcity.com वर भेट द्या किंवा 1800 120 2999 या नंबरवर काॅल करा.
Unacademy layoffs: भारतातील E-Learning प्लॅटफॉर्म कंपनी 'Unacademy' ने 380 कर्मचाऱ्यांची नोकरकपात केली आहे. नोकरकपात केलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीने काही सुविधा दिल्या आहेत. ही कर्मचारी कपात करण्याचे कारण काय? आणि कोणत्या सुविधा कंपनीने कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत, हे आजच्या लेखातून जाणून घेऊयात.
Maruti Suzuki Sale: मारुती सुझुकी कंपनी सन 1986-87 पासून, परदेशी बाजारपेठेत मारुती कार निर्यात करण्यास सुरुवात केली. आता या कंपनीने 2.5 दशलक्ष कार विक्रीचा टप्पा पार केलेला आहे.
Tax Saving Options: चालू आर्थिक वर्ष संपणार असून 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत,जर तुम्हाला तुमचे कष्टाचे पैसे वाचवायचे असतील, तर तुमच्याकडे कर बचतीसाठी केवळ एक दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे, उशीर न करता, काही महत्त्वाची गुंतवणूक ताबडतोब करा, कारण कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे.