• 27 Mar, 2023 05:46

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Celebrities Who Pay The Highest Taxes: अक्षयकुमार ते अमिताभ बच्चन हे सेलेब्रिटी भरतात सर्वाधिक टॅक्स

Celebrities Who Pay The Highest Taxes

मार्च अखेर आले आहे, त्यामुळे सर्वाची टॅक्स भरण्याची गडबड सुरू झाली आहे. सामान्य माणसापासून ते बाॅलिवुड सेलेब्रिटी सर्वच मंडळी या कामात गुंतलेले आहे. पण तुम्हाला माहिती का बाॅलिवुडमधील सर्वाधिक टॅक्स कोणते सेलेब्रिटी भरतात?

बाॅलिवुड सेलेब्रिटी हे एखादया बिझनेस मॅनप्रमाणे सर्वाधिक कमाई करतात. त्यामुळे देशावर कधी ही कुठे ही काहीही संकट आले तरी, हे कलाकार मदत करण्यास अव्वल असतात. जसे की, कोरोनाकाळात सोनू सुद या अभिनेत्याने केलेली मदत ही जगजाहीर आहे. याप्रमाणेच ते आपली टॅक्स भरण्याची जबाबदारीदेखील चोखपणे पार पाडतात. 

अक्षय कुमार (Akshay Kumar) 

akshay kumar (1)
http://www.bhaskar.com/

बाॅलिवुड स्टार अक्षय कुमारचे सर्वाधिक चित्रपट दरवर्षी प्रदर्शित होतात. या चित्रपटांव्दारे होणारी त्याची कमाईदेखील अधिक आहे. तसेच मागील काही वर्षांपासून अक्षय कुमार हा सर्वाधिक टॅक्स भरण्यासाठी ओळखला जातो. तो दरवर्षी न चुकता, न बुडवता अगदी प्रामाणिकपणे टॅक्सची रक्कम अदा करतो. यासाठी या खिलाडी कुमारला आयकर विभागाव्दारे प्रमाण पत्र देऊनदेखील सन्मानित करण्यात आले आहे. 2017 मधीलफोर्ब्सच्या यादीमध्ये सर्वाधिक कमाई करण्यामध्ये तो 10 व्या क्रमाकांवर   होता. त्या वर्षी या अभिनेत्याने 29.5 करोड रूपयांचा टॅक्स भरला होता.  

रजनीकांत (Rajinikanth)

rajni kant'
http://navbharattimes.indiatimes.com/

2022 म्हणजे मागील वर्षी बाॅलिवुड व दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील सुपरस्टार रजनीकांतचे नाव देखील सर्वाधिक टॅंक्स भरण्याच्या यादीत समावेश झाले होते. याबाबत या प्रसिध्द अभिनेत्यालादेखील सन्मानित करण्यात आले होते. रजनीकांत यांची मुलगी एेश्र्वर्या हिने वडिलांच्या अनुपस्थितीत हा पुरस्काराचा स्वीकार केला होता. त्यांना हा पुरस्कार तेलंगानाचे राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांच्याव्दारे देण्यात आला होता. मात्र त्यांनी नक्की किती टॅक्स भरला आहे, हा आकडा आणखी समोर आला नाही. रजनीकांत हे नाव दाक्षिणात्य चित्रपटातील मोठे नाव आहे. या राज्यातील लोक त्यांना देवसमान मानतात. या सुपरस्टार रजनीकांतने नुकतेच आपल्या कारकीर्दीतील 170 वा चित्रपट हा लाइका प्राॅडक्शन अंतर्गत करणार असल्याचे जाहीर केले आहे. 

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)

amitabh bacchan
http://www.abplive.com/

बाॅलिवुडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचे नावदेखील सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या यादीमध्ये घेतले जाते. आज ही ते तरूणांना लाजवेल अशा उत्साही व कठोर मेहनतीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. त्यांच्या छोटया पडदयावर सुरू असणारा कौन बनेगा करोडपती हा रियालिटी शो खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे आज ही या महान व्यक्तीचे स्टारडम तितकेच दिसून येते. तसेच बाॅलिवुडमध्येदेखील सर्वाधिक कमाई करणाऱ्यापैकी बिग बी यांचे देखील नाव घेतले जाते. 2017 मध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी तब्बल 70 करोड रूपये इतका इनकम टॅक्स भरला होता.  

सलमान खान (Salman Khan)

salman khan (1)
http://www.hi.wikipedia.org.com/

बाॅलिवुडचा दबंग खान याचा सध्या किसी का भाई किसी की जान हा नवीन चित्रपट येऊ घातला आहे. त्यामुळे या चित्रपटाची सोशलमिडीयावर प्रचंड चर्चा आहे.काही वेळा या चित्रपटातील गाण्यामुळे भाईला ट्रोलदेखील करण्यात आले आहे. पण या खानच्या स्टारडमवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तसचे सलमान खानचा नवीन चित्रपट म्हणजे 100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचतो हे समीकरणच बनले आहे. तसेच तो दरवर्षी बिग बाॅस या रियालिटी शो मधूनदेखील तुफान कमाई करतो. जवळपास तो एका एपिसोडचे कोटी रूपये घेत असल्याचे सांगितले जाते. त्याच्या या तगडया कमाईप्रमाणेच सलमान खान शासनाला इनकम टॅक्सदेखील तगडा भरतोच. 2017 मध्ये सलमान खानने 44 करोड रूपये इतका इनकम टॅंक्स दिला होता.

शाहरूख खान (Shah Rukh Khan)

bollywood actor (1)
http://www.aajtak.in.com/


पठाण चित्रपटामुळे शाहरूख खानने बाॅलिवुड बाॅक्स आॅफिस कलेक्शनचे सर्व रेकाॅर्डस तोडले आहे. एवढेच नाही, तर या चित्रपटाने नुकतेच बाहुबली 2 चित्रपटाचा कमाईबाबतच रेकाॅर्डदेखील तोडला आहे. किंग खानच्या पठाण या चित्रपटाने जागतिक स्तरावर जवळपास 1000 करोड रूपयांपेक्षा ही अधिक कमाई केली आहे. हा अभिनेता बाॅलिवुडमध्ये चित्रपटांसाठी सर्वाधिक रक्कम घेतो. स्टार शाहरूख खानचे नावदेखील सर्वाधिक टॅक्स भरण्याच्या यादीत आहे. बाॅलिवुडच्या या किंग खानने 2020-21 यावर्षी सुमारे 22 करोड रूपये इतका इनकम टॅक्स भरला होता.  

ऋतिक रोशन (Hrithik Roshan)

rutik roshan
http://www.amarujala.com/

बाॅलिवुडचा हा सुपरस्टार सध्या सबा आझाद हिच्याशी असलेल्या रिलेशनशीपमुळे प्रचंड चर्चेत आहे. आता हे दोघे ही लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.सबा ही त्याच्यापेक्षा तब्बल बारा वर्षांनी लहान आहे. मात्र आज ही ऋतिक रोशनचे नाव सुपरस्टारमध्ये घेतले जाते. तसेच बाॅलिवुडमध्ये सर्वाधिक टॅक्स भरण्याच्या यादीत ऋतिक रोशन याचे नावदेखील आहे.  बाॅलिवुडच्या या अभिनेत्याने 2018-19 मध्ये जवळपास 25.5 करोड रूपये इतका इनकम टॅक्स भरला होता.