जर तुम्ही 30 मार्च 2023 नंतर सोने खरेदी करणार असाल तर तुम्हाला सोने व दागिन्यांच्या खरेदी-विक्रीबाबतचा केंद्र शासनाचा नवीन नियम माहित असला पाहिजे. जेणेकरून तुमची सोने खरेदी करण्याबाबत फसवणुक होणार नाही. हा नियम काय आहे, याबाबत थोडक्यात समजावून घेवुयात.
सोने व दागिन्यांच्या खरेदी-विक्रीचा नवीन नियम
जर तुम्ही 30 मार्च 2023 नंतर सोने खरेदी करणार असाल तर तुम्हाला केंद्र शासनाने खरेदी-विक्रीच्या नवीन नियमाबाबत माहित असणे आवश्यक आहे. तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वपूर्ण बातमी आहे. 31 मार्च 2023 नंतर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन व्यतिरिक्त सोन्याचे दागिने व सोन्याच्या कलाकृतीची विक्री थांबविण्यात येणार आहे. म्हणजेच हॉलमार्क (Hallmark) सहा अंकी कोड शिवाय सोन्याचे दागिने व सोन्याच्या कलाकृतींच्या विक्रीवर ही 1 एप्रिलपासून बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्यावतीने देण्यात आली आहे.
हॉलमार्क म्हणजे काय?
तुम्ही खरेदी केलेले सोन्याचे दागिने निरखून पहा. या दागिन्यांच्या मागील बाजूला अतिशय लहान अंकात काही आकडे व अक्षरं दिसतात. जर तुमच्या नजरेस हे आकडे पडले, तर समजा तुम्ही खरेदी केलेले सोने हे हॉलमार्क असणारे आहे. म्हणजेच हे सोन्याचे दागिने शुध्द आहे. यामध्ये प्रथम ब्युरो आॅफ इंडियन स्टॅंडर्डस् चा लोगोदेखील पाहायला मिळेल. तसेच सोन्याचे प्रमाण व त्याची शुध्दता किती आहे हा सांगणार एक ठराविक आकडा दिसेल. यानंतर त्या सोनाराचा स्वत:चा असा लोगो दिसून येईल. या चार ही गोष्टी तुम्ही खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर असेल तर समजा तुम्ही खरेदी केलेले सोन्याचे दागिने हे खरे म्हणजेच हालमार्क चिन्हाचे आहेत. त्यामुळे तुमची सोने खरेदीबाबत होणारी फसवणूकदेखील टाळता येईल.
आणखी एक महत्वपूर्ण निर्णय
शुक्रवारी भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) कार्यवाही बैठकीत मायक्रो स्केल युनिट्समध्ये गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे यासाठी BIS विविध उत्पादन प्रमाणीकरण योजनेत प्रमाणीकरण व किमान मार्किंग शुल्कावर 80 टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केले.
हॉलमार्क किती जिल्हयात अनिवार्य केले?
हॉलमार्क हे सोन्याची शुध्दता सांगणारे प्रमाणपत्र आहे. 16 जून 2021 पर्यंत हे खरेदीदारावर अवलंबून होते. पण त्यानंतर हळहळू शासनाने सोन्याचे हॉलमार्किंग हे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा हॉलमार्क हे 256 जिल्हयांमध्ये अनिवार्य करण्यात आले होते. यानंतर दुसऱ्यांदा यामध्ये वाढ करण्यात आली. यात आणखी 32 जिल्हयात हे अनिवार्य करण्यात आले. आता एकूण 288 जिल्हयांमध्ये सोन्यावर हॉलमार्क हे अनिवार्य करण्यात आले आहे. यामध्ये आणखी ही 51 जिल्हयांची वाढ करणार असल्याचे सांगितले जाते.
हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन कसे करणार?
सोने खरेदीबाबत फसवणूक होऊ नये म्हणून हॉलमार्क असते. हे हॉलमार्क आहे हे ओळखण्यासाठी सोन्यावर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर देण्यात आला आहे. यामध्ये सहा अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे व अक्षरांचादेखील समावेश आहे. हॉलमार्किंच्यावेळी सर्व दागिन्यांच्या प्रत्येक वस्तूंवर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन देण्यात येणार आहे. अॅसेइंग हॉलमार्क सेंटर या ठिकाणी दागिन्यांवर शिक्का मारण्यात येतो.
शुध्द सोन कसे ओळखायचे?
24 कॅरेट सोने हा सराफ बाजारात सर्वात शुध्द मानले जाते. पण सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात येतो. यामध्ये 91.66 टक्के सोन्याचा समावेश करण्यात येतो. या सोन्याच्या दागिन्यांच्या शुध्दतेसाठी हॉलमार्क संबंधित 5 चिन्हे असतात. 24 कॅरेट सोन्यावर 999, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875, 18 कॅरेट सोन्यावर 750 व 14 कॅरेट सोन्यावर 585 यास्वरूपात लिहिलेले असते. जितके कॅरेट सोने असेल त्यावर कॅरेटनुसार या नंबरचा समावेश असेल तर ते सोन्याचे दागिने शुध्द आहे समजावे.