• 31 Mar, 2023 08:09

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Type Of Cheque: चेक हा एकच नसून, त्याचे विविध प्रकार किती व त्याविषयी माहिती

Type Of Cheque

एखाद्या मोठया रक्कमची देवाण-घेवाण करण्यासाठी चेक हा प्रकार वापरतात. दैनंदिन जीवनातील बॅंकेसंबंधित हा चेक सर्वांना माहिती आहे. पण या चेकचे विविध प्रकार ही आहेत. हे चेकचे प्रकार व त्यांची माहिती जाणून घेवुयात.

मराठीमध्ये चेकला धनादेश असेदेखील म्हटले जाते. बॅंकेतील पैशांचा मोठा व्यवहार करताना शक्यतो चेकच वापरले जाते. म्हणूनच चेक म्हटले की, आपल्या डोळयासमोर एक प्रकारचा चेक येतो,जो की पैशांची अदान-प्रदान करता येतो. पण तुम्हाला माहिती का या चेकमध्येदेखील विविध प्रकार आहेत. नेमकी चेकचे हेच प्रकार व त्यांची माहिती थोडक्यात पाहूयात. 

ओपन चेक (Open Cheque)

open check
http://www.elearnmarkets.com/

दैनंदिन जीवनात ओपन चेक हा मोठया प्रमाणात वापरला जातो. हा चेक बॅंकेत थांबून काउंटरसमोरच सादर करून आपण रोख रक्कम प्राप्त करू शकता. यासाठी तुम्हाला अधिक वेळ द्यावा लागत नाही. ज्या व्यक्तीजवळ ओपन चेक आहे, ती व्यक्ती काऊंटरवर चेक सादर करून पैसे घेवु शकते किंवा आपल्या बॅंक खात्यावर ट्रान्सफर करू शकते.  

ओपन चेक हा Uncrossed या नावानेदेखील ओळखला जातो. हा एक असा चेक आहे, ज्या चेकने तुम्ही बॅंकेच्या काउंटरवरून त्वरित कॅश प्राप्त करू शकता. या चेकच्या डाव्या बाजूला कोणतेही क्राॅस नसते, या चेकवर फक्त नाव, रक्कम व सही केली जाते. 

बिअरर चेक (Bearer Cheque)

Bearer Cheque
http://www.youtube.com/

बिअरर हा देखील एक चेकचा प्रकार आहे. या चेकने खातेदाराच्या कोणत्याही नजीकच्या व्यक्तीला बॅंकेत जाऊन कॅश काढता येते किंवा इतर कोणत्याही बॅंकेच्या खात्यात ट्रान्सफर करता येते. यामध्ये या नजीकच्या व्यक्तीला चेक देताना किंवा ट्रान्सफर करताना सहीची आवश्यकता नसते. फक्त चेक देऊन ही पैसे काढता येते. या चेकचा धोका म्हणजे हा चेक हरविला की, कोणीही आपल्या खात्यातून पैसे काढू शकतात.                                                      

क्रॉस चेक (Cross Cheque)

Cross Cheque)
http://www.quora.com/

क्रॉस चेकने तुम्ही बिअरर चेकप्रमाणेसहज व सोप्या पध्दतीने पैसे काढू शकत नाही. या चेकच्या उजव्या बाजूला वरती कोपऱ्यात दोन समांतर रेषांनी क्रॉस केलेले असते. या रेषांमध्ये Account Payee असे लिहिले असते. ही एक प्राप्तकर्त्यासाठी दिशादर्शक अशी ओळख असते. या चेकच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची रोख रक्कम दिली जात नाही. मात्र या चेकने तुम्ही रोख रक्कम एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करू शकता. 

क्रॉस चेक हा सर्वात सुरक्षित मानला जातो. कारण या चेकने कोणत्याही प्रकारचे कॅश काढता येत नाही. ज्या व्यक्तीच्या नावाने हा चेक तयार केला जातो, त्या व्यक्तीच्या खात्यातच पैसे जमा केले जाते.बॅंकेच्या व्यवहारामध्ये देवाण-घेवाणसाठी हा चेक खूप सुरक्षित असे माध्यम मानले जाते.  

अँटी- डेटेड चेक (Ante-Dated Cheque)

Ante-Dated Cheque
http://www.bankexamstoday.com/

मुदत संपलेला म्हणजेच तारीख निघून गेलेला चेक म्हणजे अँटी- डेटेड चेक होय. ज्या चेकचा कालावधी संपलेला आहे, असा चेक बॅंकेत तीन महिन्यांच्या आत जमा करणे अनिवार्य आहे.    

स्टॉल चेक (Stale Cheque)

(Stale Cheque)
http://www.csslord.blogspot.com/

स्टॉल चेक हा जर एखादया व्यक्तीलादेण्यात आला, मात्र त्या व्यक्तीने तो चेक तीन महिन्यांच्या आत वापरला नाही तर या चेकलाबाद म्हणून जाहीर केले जाते. देण्यात आलेला हा चेक तीन महिन्यांच्या आत वापरणेअनिवार्य आहे. 

Post Dated Cheque
http://paisabin.com/

पोस्ट-डेटेड चेकचा उपयोग हा भविष्यात होतो. या चेकची कालमर्यादा ही तीन महिन्यांची असते. तुम्ही तीन महिन्यात कोणत्याही तारखेला या चेकचा वापर करू शकता. समजा चेकवर येणारी म्हणजे भविष्यातील तारीख लिहली असेल, तर ती तारीख जोपर्यंत होऊन जात नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर होत नाही. 

जसे की, माझ्या खात्यात आता पैसे शिल्लक नाही, पण हे पैसे पुढील आठवडयात जमा होईल. या गोष्टीचा विचार करून समोरील माणसाला त्या तारखेचे चेक देणे म्हणजे पोस्ट- डेटेड चेक होय. 

आदेश चेक (OrderCheque)

आदेश चेक हा देखील एक चेकचा प्रकार आहे. या चेक मध्ये बियरर चेक हा खोडला जाऊन त्यावर आदेश लिहिला जातो. या चेकवर मालकाची सही असणे बंधनकारक आहे. नाही तर, ओपन चेकप्रमाणे या चेकच्या माध्यमातूनदेखील कोणतीही व्यक्ती आपल्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करू शकते. या चेकच्याव्दारे जी व्यक्ती पैसे घेते, त्या व्यक्तीला चेकच्या मागील बाजूला सही करावी लागते.  

सेल्फ चेक (Self-Cheque)

सेल्फ चेक हा कोणालाही न देता मालकाला स्वत:ला जाऊन बॅंकेतून पैसे काढावे लागते. म्हणजेच फक्त खातेदारक हा बॅंकेतून पैसे काढू शकतो. त्याखातेदारा व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला त्या चेकवरची रक्कम दिली जात नाही.

चेकचे लोकेशनुसारदेखील वर्गीकरण 

स्थानीय चेक (Local Cheque)

जर मालक चेक हा कोणत्याही व्यक्तीला देतो, तेव्हा तो व्यक्ती त्याच शहरामध्ये चेक क्लियर करतो म्हणजेच त्याच शहरातील बॅंकेत जाऊन पैसे काढतो त्यावेळीत्या प्रोसेसला स्थानीय चेक असे म्हणतात. विशेष म्हणजे स्थानीय चेक असेल तर व्यक्ती कोणत्याही बॅंकेतून पैसे काढू शकतो. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावेलागत नाही.  

आउट स्टेशन चेक (Outstation Cheque) 

जर मालकाने कोणत्याही व्यक्तीस चेक दिला, तर तो व्यक्ती त्याच शहरात न राहता, तो दुसऱ्या शहरात जातो व तेथिल बॅंकेतून पैसे काढतो म्हणजे तो व्यक्ती हा चेक क्लियर करतो. या प्रोसेसला आउट स्टेशन चेक असे म्हणतात.  

एट पर चेक (At Per Cheque) 

एट पर चेकने तुम्ही कोणत्याही शहरातील बॅंकेतून पैसे काढू शकतापण ती बॅक ही सेम ब्रॅंचची असावी लागते. त्यावेळीच तो चेक क्लियर करता येईल. या प्रोसेसला एट पर चेक असे म्हटले जाते.  

 चेकचे फायदे       

  •  कोणत्याही चेकद्वारे पेमेंट करणे सोपे, लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही पडत. ·      
  •  चेकमुळे कॅश रक्कम जवळ बाळगावी लागत नाही. ·       
  • चेकमुळे पेमेंट करणे हे सुरक्षित पडते.·       
  • चेकव्दारे लाखो व करोडोंचा व्यवहार करणे अधिक सोईस्कर·       
  • नोटा मोजाव्या लागत नाही, त्यामुळे नोटांचा आकडा कमी-जास्त होण्याची भिती नाही·       
  • चेन पैसे देण्याबाबत कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. ·       
  • आपल्याला चेकद्वारे कोणावरही टिप्पणी करता येते.  

चेकवरील MICR म्हणजे काय?

MICRम्हणजे मॅग्नेटिकइंक कॅरेक्टर रिकग्निशन होय. नावाच्या नऊ अंकी कोडसह MICR नंबर छापला जातो. यामध्ये पहिले तीन अंक हे शहराचा कोड नंबर असतो. त्यापुढील तीन अंक हे बॅंक कोड असतात व त्यानंतरचे म्हणजेच शेवटचे तीन अंक हे बॅंक शाखेचा कोड असतो. जेणेकरून या एमआयसीआर कोडने चेक ओळखणे सोपे व सोईस्कर जाते.