• 27 Mar, 2023 07:29

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Top 5 Scheme for Women: देशातील महिलांसाठी शासनाच्या महत्वपूर्ण 5 कर्ज योजना

Scheme for Women

 देशातील महिलांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करावा यासाठी क्रेंद शासनाने खास महिलांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत व प्रशिक्षणदेखील दिले जाते. चला तर मग फक्त महिलांसाठी कोणत्या शासकीय योजना आहेत, ते जाणून घेवुयात. 

Scheme for Women: देशातील काही महिलांना नोकरी न करता स्वत:चा बिझनेस सुरू करण्याचे स्वप्न असते. पण त्यांचे हे स्वप्न आर्थिक कारणांमुळे पूर्ण होत नाही. त्यामुळे त्या महिलांजवळ कला-कौशल्ये असतानादेखील ते स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकत नाही.अशा महिलांना पुढे आणण्यासाठी व त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक मदत मिळावी या हेतूने शासनाने महिलांसाठी काही योजना सुरू केल्या आहेत.  

अन्नपूर्णा योजना (Annapurna Scheme)

Annapurna Scheme
http://www.thehansindia.com/

ज्या महिलांना स्वत:चा व्यवसाय म्हणून केटरिंगमध्ये उतरण्याची इच्छा आहे,अशा महिलांना अन्नपूर्णा योजनेचा मोठा फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना शासनाकडून या नवीन बिझनेससाठी 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.त्यातून या महिला गॅस कनेक्शन, भांडी, टिफिक बाॅक्स, फ्रीज, मिक्सर व आवश्यक अशी आदि सामग्री खऱेदी करू शकतात.

या योजनेअंतर्गत महिलांना कर्जाची रक्कम 3 वर्षात परत करावी लागणार आहे. या योजनेच्या माध्यमातून देणाऱ्या येणाऱ्या कर्जावरील व्याजदर हा मार्केट रेटनुसार ठरविण्यात येतो. तुम्हाला जर या योजनेची लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही थेट स्टेट बॅंक ऑफ  इंडिया (SBI) बॅंकेशी संपर्क साधू शकता.

स्त्री शक्ती पॅकेज (Stree Shakti Package)

Sree Shakti Package
http://www.govinfo.me.com/

स्त्री शक्ती पॅकेज योजनेअंतर्गत महिलांना 50 हजार ते 2 लाख रुपयांचे कर्ज देण्यात येते. या योजनेचा फायदा त्या महिलांना होणार आहे, ज्यांनी व्यवसायात 50%पेक्षा जास्त भागीदारी केली आहे. तसेच राज्याच्या उपक्रम विकास कार्यक्रमात रजिस्ट्रेशन करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर, एमएसएमईमध्ये रजिस्ट्रेशन करण्यात आलेल्या कंपन्यांना 25 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. 

5 लाखांपर्यंत मिळणाऱ्या कर्जासाठी कोणतीही प्रकारची सिक्युरीटी नाही. या व्यतिरिक्त कर्जाच्या व्याजदरातही सवलत देण्यात येते. स्त्री शक्ती पॅकेज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये अर्ज करू शकता.  

पीएम  मुद्रा योजना (PM Mudra Yojana)

PM Mudra Yojana
http://www.business-standard.com/

पीएम मुद्रा योजनेचा फायदा हा भाजीवाले, सलूनवाले, चहाची टपरी चालविणारे, दुकानदार अशा छोटया छोटया व्यवसायिकांना होणार आहे. ही योजना बिगर कॉर्पोरेट, बिगरशेती लघुउद्योगांसाठी सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत त्या त्या व्यावसायिक महिलांना 50,000 ते 10 लाख रुपयांचे कर्ज शासनाकडून मिळते.

या कर्जाचे व्याजदरदेखील अगदी कमी असते. या मुद्रा योजना तीन प्रकारच्या आहेत.यामध्ये शिशू योजना, किशोर योजना व तरूण योजना यांचा समावेश आहे.या प्रत्येक प्रकारच्या योजनेच्या कर्जाची रक्कम व व्याजदर प्रत्येकी वेगवेगळे आहेत.   

महिला उद्यम निधी योजना (Mahila Udyam Nidhi Scheme)

Women's Enterprise
पंजाब नॅशनल बँक(PNB) आणि स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) यांनी महिलांना आर्थिक मदत व्हावी या हेतूने महिला उद्यम निधी योजना सुरू केली आहे.या योजनेअतंर्गत महिलांना 10 लाख रूपयांपर्यतचे कर्ज मिळते.तसेच या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी हा 10 वर्षांचा आहे. या कर्जावरील व्याजदर हे मार्केटच्या रेटनुसार ठरविले जाते.

यामध्ये बाजारभावानुसार व्याजदर ठरवले जातात. या योजनेच्या माध्यमातून SIDBI कडून ब्युटी पार्लर, ऑटो रिक्षा, डे केअर सेंटर, मशीन काम, बाइक आणि कार खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येईल. तसेच यासाठी तुम्हाला प्रशिक्षणदेखील मिळेल. 

महिला समृद्धी निधी योजना (Mahila Smruti Nidhi Scheme)

Women Prosperity Scheme
पंजाब नॅशनल बॅंक (PNB) ही देशातील सर्वात मोठी सरकारी अशी दुसरी बॅंक आहे.या बॅंकेने खास महिलांसाठी महिला निधी समृद्धी योजना सुरू केली आहे.या योजनेअंतर्गत महिलांचे बिझनेस वुमन बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.कारण ही बॅंक महिलांना स्वत:चा बिझनेस सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करते.ज्यामुळे तुम्ही तुमच्या नवीन बिझनेसची उभारणी करू शकता. 

ही बॅंक बचतगट किंवा नॉन प्रॉफिट संस्थांमार्फत बिगर कृषी उपक्रमांशी संबंधित व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांना कर्जाचा पुरवठा करते. महिलांना ही बॅंक व्यवसायासाठी साधारण 60,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देते.या कर्जाच्या परतफेडचा कालावधी हा 3 वर्षे 6 महिने असा आहे. या कर्जावर तुम्हाला वार्षिक 4% दराने व्याज द्यावे लागणार आहे. बीपीएल धारक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.यासाठी कोणत्याही गॅरंटरची आवश्यकता पडत नाही.