Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

फसवणूक

Fact Check Alert: सोशल मिडियामधून फिरणाऱ्या गोष्टींचे फॅक्ट चेक करा आणि फसवणुकीपासून सावध राहा!

Fact Check Alert: सध्या सोशल मिडियावरून वाऱ्यासारख्या पसरणाऱ्या गुंतवणुकीच्या, पैसे डबल करून देणाऱ्या, बिटकॉईन कमी पैशांत विकणाऱ्या किंवा लाखो रुपयांची स्कॉलरशिप मिळवून देणाऱ्या मॅसेजवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याचे फॅक्ट चेक करा.

Read More

SIM Swap Fraud: ना मेसेज, ना कॉल, ना ओटीपी, तरीही लंपास झाले 50 लाख रुपये! सिम कार्ड घोटाळ्यापासून सावधान…

सिम स्वॅप स्कॅममध्ये नागरिकांना मिस्ड कॉल येत नाही, ओटीपी देखील जात नाही मात्र बँक खात्यातून पैसे मात्र लंपास केले जातात. या प्रकारच्या फसवणुकीचा छडा लावल्यानंतर पोलिसांना एक आश्चर्यजनक बाब समजून आली आहे. हे प्रकरण आहे सिम स्वॅपचे! चला तर जाणून घेऊयात काय आहे हे प्रकरण!

Read More

SBI Scam Proof Asanas: सायबर भामट्यांकडून आर्थिक फसवणुकीचे जाळे; एसबीआयकडून डिजिटल साक्षरतेबाबत अनोखी मोहीम!

SBI Scam Proof Asanas: एसबीआय बँकेकडून गेले काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॅमपासून स्वत:ची सुटका करण्यासाठी #ScamProofAsanas या नावाने एक अनोखे कॅम्पेन राबवले जात आहे. यामध्ये लोकांची डिजिटली आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून लोकांना जागृत केले जात आहे.

Read More

KYC Update Fraud: केवायसी अपडेटच्या नावावर सायबर चोरांची लुटमार! अनोळखी नंबरवरून आलेली लिंक ओपन करूच नका!

नवनव्या तंत्रज्ञानाची समज नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना गंडा घालण्याची प्रकरणे समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एका वृद्ध व्यक्तीची AnyDesk द्वारे फसवणूक झाली होती. असाच प्रकार आता दिल्लीतील एका ज्येष्ठ महिलेसोबत घडला आहे. AnyDesk च्या सहाय्याने सायबर चोरांनी या महिलेच्या कॉम्प्युटरचा स्क्रीन अॅक्सेस आणि OTP घेतला आणि तिच्या खात्यातून 1 लाख रुपयांची रक्कम लंपास केली.

Read More

Education Loan Scam: बंगळुरात शैक्षणिक कर्जातून 2000 विद्यार्थ्यांची फसवणूक, गिकलर्नच्या सीईओला अटक

Education Loan Scam: डेटा सायन्स कोर्ससाठी शैक्षणिक कर्ज मिळवून देतो असे आश्वासन देऊन गिकलर्नचा सीईओ श्रीनिवास याने 2000 विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे.श्रीनिवास याने प्रत्येक विद्यार्थ्याची किमान 2 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे बोलले जाते. या शैक्षणिक कर्जाच्या फसवणुकीतून 18 कोटींचा घोटाळा झाला आहे.

Read More

Free Laptop Scam: केंद्र सरकार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देतंय का? जाणून घ्या

स्कॅमर लोक इंटरनेटवर एक नवीन घोटाळा करतायेत. हे स्कॅमर लोकांना व्हाट्सॲपवर भारत सरकार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत आहे अशा आशयाचा मेसेज पाठवत आहेत. तसेच तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून या ऑफरचा लाभ घेऊ शकतात असे देखील सांगितले जात आहे, जाणून घ्या नेमके काय आहे हे प्रकरण...

Read More

LinkedIn Job Scam: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसोबत होतेय फसवणूक, लिंक्डइनवरून नोकरी शोधत असाल तर सावधान…

रोजगाराच्या शोधात अनेक लोक LinkedIn वर येऊन नाव नोंदणी करतात आणि जॉबसाठी अप्लाय करतात हे सायबर चोरांच्या लक्षात आले आहे. हेच लक्षात घेऊन सायबर चोर लिंक्डइनवर एखाद्या कंपनीच्या नावे बनावट प्रोफाइल तयार करतात. हे प्रोफाइल मूळ कंपनीच्या प्रोफाइलशी साधर्म्य दाखवेल असे बनवले जाते. त्याद्वारे युवकांची आर्थिक फसवणूक केली जाते.

Read More

Telegram Fraud: टेलिग्रामवर आर्थिक व्यवहार करत असाल तर खबरदार! मुंबईतल्या युवकाने गमावले 1 लाख रुपये!

झटपट पैसे कमावण्याच्या नादात सायबर चोरांच्या आमिषाला बळी पडून काही नागरिकांचे बँक खाते रिकामे होत आहे. अलीकडेच मुंबईत अशी एक घटना घडली आहे. 27 वर्षीय तरुणाला तब्बल 1 लाख रुपयाला गंडवण्यात आले असल्याचे समोर आले आहे.

Read More

SBI Scam Alert: एसबीआय खातेदारांची होतेय फसवणूक, कुठलीही लिंक ओपन करू नका...

State Bank of India: गेल्या काही दिवसांपासून भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) खातेधारकांना एक एसएमएस पाठवला गेला आहे. ज्यात खातेधारकांचे बँक खाते बंद करण्यात आले असून ते पुन्हा सुरु करण्यासाठी लिंकवर क्लिक करून माहिती भरा असे सांगितले जात आहे...

Read More

Tourist Online Scam: बनावट टूर कंपनीकडून पर्यटकांची फसवणूक, ऑनलाईन व्यवहार करताना अशी घ्या काळजी

स्वस्तात विमान प्रवासाने पर्यटन स्थळांना भेटी देण्याची जाहिरात फेसबुकवर बघून महिलांनी जमा केले तब्बल 1 लाख 20 हजार रुपये! परंतु ठरलेल्या दिवशी मुंबई विमानतळावर पोहोचताच टूर ऑपरेटरचा फोन स्विच ऑफ येऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. जाणून घ्या सविस्तर प्रकरण...

Read More

Scam on Twitter: ट्विटरवर Paytm चा मेसेज आलाय? सावधान! होऊ शकते तुमची फसवणूक

गेल्या काही दिवसांत, अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी बनावट ग्राहक सेवा एजंटच्या खात्याद्वारे संदेश प्राप्त झाल्याची तक्रार केली आहे. यापैकी बहुतेक वापरकर्त्यांनी तक्रार केली की त्यांनी ट्विटरवर पेटीएमला टॅग करून UPI-संबंधित समस्यांसाठी मदत मागितली होती, परंतु कंपनीच्या नावाच्या बनावट ग्राहक सेवा हँडलवरून त्यांना संदेश प्राप्त झाले आहेत.

Read More

WhatsApp spam calls: फेक कॉलप्रकरणी केंद्र सरकार व्हॉट्सअॅपला नोटीस पाठवणार

सायबर गुन्ह्याचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअपवरुन बनावट कॉल्स येण्याचे प्रमाण वाढले आहे. कॉल उचलण्यााधीच कट होत आहे. मात्र, हे कॉल फसवणूक करण्याच्या उद्देशाने येत असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दखल घेतली आहे.

Read More