Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कमोडिटी

Sugar Price Hike: सणासुदीच्या दिवसांत साखर महागली, सामान्यांच्या खिशाला लागणार कात्री

Sugar Price Hike: कमी उत्पादन आणि वाढती मागणी यामुळे जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमतीने 6 वर्षांचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 2 आठवड्यात साखरेच्या किंमतीत 6% पेक्षा जास्त भाववाढ झाली आहे, येणाऱ्या काळात ही भाववाढ अधिक होऊ शकते असे जाणकारांचे मत आहे.

Read More

Wheat crop loss: खराब हवामानामुळे 20 लाख टन गव्हाचे नुकसान; एकूण उत्पादनाची आकडेवारी दिलासादायक

पंजाब, हरियाणा आणि मध्यप्रदेश हे भारतातील गव्हाचे सर्वाधिक उत्पादन घेणारी राज्ये आहेत. मात्र चालू रब्बी हंगामात गारपीट, अवकाळी पाऊस, वादळ यामुळे 20 लाख टन गव्हाचे नुकसान होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, निसर्गाने साथ दिली नसली तर गव्हाचे दिलासादायक उत्पादन होईल. नवा गहू बाजारात आल्यानंतर किरकोळ बाजारातील गव्हाच्या किंमतीही खाली येऊ शकतात.

Read More

Increase in price of fruits : उन्हाचा सपाटा वाढला आणि फळांची आवक कमी असल्याने फळांच्या किंमतीत वाढ...

Increase in price of fruits : उन्हाळ्यामुळे फळांची मागणी वाढली आणि आवक कमी असल्याने किमतीतही मागील वर्षीपेक्षा 20 ते 25% वाढ झाली आहे.

Read More

Wheat procurement: अवकाळी पावसामुळे गव्हाचे नुकसान! शेतकऱ्यांकडून खरेदी करताना सरकार नियमावली शिथिल करणार?

मागील वर्षी रब्बी हंगामात उष्णतेच्या लाटेमुळे गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे संपूर्ण देशभरात गव्हाचे दर कडाडले होते. किरकोळ बाजारात तर गव्हाचे दर 3 हजार रुपये क्विंटलच्या पुढे गेले होते. दरम्यान, यावर्षीही अवकाळी पाऊस आणि गारपीटीने गहू पिकाचे नुकसान झाले आहे. पूर्णत: गहू पिक वाया गेले नसले तरी गव्हाची गुणवत्ता खालावली आहे. उत्तरेकडील राज्यांना खराब हवामानाचा फटका बसला.

Read More

Amul Milk Price Hike: दुधाच्या किमतीत पुन्हा वाढ! 'अमूल' दूध 2 रुपयांनी महागले

Amul Milk Price Hike: आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून पहाटेच अमूलने दुधाचे दर वाढवून धक्का दिला आहे. अमूलने दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. अमूलकडून गायीचे व म्हशीचे दूध प्रती लिटर 2 रुपयांनी महाग झाले आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.

Read More

Milk Prices Hike: वर्षभरापासून दुधाच्या किमतीत सातत्याने वाढ, महागाईने सामान्यांच्या खिशाला झळ

Milk Prices Hike: वर्षभरापासून दूध व दुग्धजन्य पदार्थ महाग होत आहे. या महागाईचा दर 6.5 टक्के इतका आहे तसेच, गेल्या पाच महिन्यात दूध महागाईने उसळी घेतली आहे. महागाईचा दर 8.5 टक्के इतका वाढला आहे. देशात अनेक ठिकाणी दिवसाची सुरुवात ही दुग्धजन्य पदार्थांनी होते यामुळे ही वाढती महागाई लक्षात घेता जनसमान्यांच्या खिशाला झळ पोहोचली आहे.

Read More

Nashik village for sale: शेतमालाला भाव नाही म्हणून, गावकरी करणार चक्क गाव विक्री..

Malvadi village for sale: कांद्याला रास्त भाव मिळत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील माळवाडी गावात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. संतापून चक्क गाव विकायला काढलंय. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने आमचे गाव विकत घ्यावे असा ठराव मांडला आहे.

Read More

Increase in mustard production: सरकारच्या अंदाजानुसार मोहरीच्या उत्पादनात वाढ..

Increase in mustard production: केंद्र सरकारच्या अंदाजानुसार मोहरीचे उत्पादन गेल्या वर्षी 11 दशलक्ष टन इतके होते. फेब्रुवारीमध्ये मोहरी पिकाची एकत्रित आवक 5,03,830 टन होती, जी मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 45% अधिक आहे.

Read More

Wheat Prices in India: गव्हाचे भाव कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न; शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

Wheat Prices in India: सरकारने गव्हाचे भाव कमी करण्याऐवजी खुल्या बाजारातून (Open Market) गव्हाची खरेदी करावी जेणेकरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळेल. MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत, पण सरकारला जास्तीत जास्त किमतीत गव्हाची विक्री करायची आहे आणि तरीही ही किंमत MSP च्या खाली ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ करणारा ठरला आहे.

Read More

Gold Hallmarking : 1 एप्रिलपासून सोने खरेदीच्या नियमात मोठा बदल

केंद्र सरकारने सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या नियमात मोठा बदल केला आहे. 31 मार्चनंतर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय कोणतेही दागिने विकू शकणार नाहीत (change in gold purchase rules), अशी माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिली आहे.

Read More

Mustard Price fall : मोहरीची किंमत घसरली! किमतीने वर्षभरातील नीचांक गाठल्यामुळे शेतकरी चिंतेत

Mustard Price fall: गेल्या काही दिवसात मोहरीच्या किमतीत मोठी घसरण बघायला मिळाली आहे. मोहरीचा भाव मिनीमम सेलिंग प्राइस (MSP) किमतीच्या खाली आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) सारख्या सरकारी संस्थांनी मोहरीची खरेदी करण्यास आणि एमएसपीचे रक्षण करण्यास सांगितले आहे.

Read More

Increase in Petrol and Diesel Sales : फेब्रुवारीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मोठी वाढ, इंधनाची मागणी का वाढली?

रोजच्या जगण्यासाठी आवश्यक पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel), एलपीजी (LPG) सारख्या इंधन-गॅसच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. या वाढीमागे कोणती कारणे आहेत? ते पाहूया.

Read More