Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कमोडिटी

Commercial Gas Cylinder Price Hike: व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या

1 जून 2023 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल 83.50 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली होती. देशात घाऊक आणि किरकोळ महागाई दरात कपात होत असताना हा निर्णय घेण्यात आला होता. तसेच जागतिक स्तरावर देखील गॅसच्या किमती कमी झाल्याचे चित्र होते. परंतु पुढच्याच महिन्यात पुन्हा एकदा सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सामान्य नागरिकांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

Read More

Food Inflation: महागाईने सर्वसामान्य चिंतेत, ठोक वस्तू ऐवजी किरकोळ मालखरेदी भर

शेतीमालाच्या वाढत्या किमती आणि पावसामुळे निर्माण झालेल्या वाहतुकीच्या समस्या यांमुळे रेडीमेड उपलब्ध असलेले खाद्यपदार्थ देखील महागले आहेत. म्हणजेच ठोक माल खरेदी करण्यापेक्षा सुटा माल, पाऊचमध्ये मिळणारा माल सामान्य नागरिक खरेदी करत आहेत.

Read More

Toor Dal Price: तुरीची दरवाढ थांबणार! आफ्रिका आणि म्यानमारमधून करणार आयात

भारतात गेल्या वर्षीच्या तुलनेत तूर डाळीच्या किमतीत सरासरी 25% वाढ झाली आहे. सध्या घाऊक बाजारपेठेत तुड डाळ 128-130 रुपये किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुरीच्या वाढत्या किमतीमुळे सामान्य नागरिक हैराण असून भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली जात होती. यावर केंद्र सरकारच्या आखत्यारीत येणाऱ्या ग्राहक व्यवहार विभागाने तूर डाळीच्या आयातीचा निर्णय घेतला आहे.

Read More

LPG Cylinder Price: जुलै महिन्यात एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला की महाग? जाणून घ्या

LPG Cylinder Price : महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजेच आज 1 जुलै रोजी एलपीजी (LPG) सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. या नव्या दरानुसार एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत घरघुती आणि व्यावसायिक सिलेंडरचा दर काय असेल, जाणून घेऊयात.

Read More

Green Chilli Price Hike: टोमॅटो, कोथिंबीरीनंतर हिरवी मिरची महागली, तिखट महागाईचा सर्वसामन्यांना फटका!

30 ते 40 रुपये किलो दराने घाऊक बाजारात मिळणारी हिरवी मिरची आता 60-80 रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध आहे. मुंबई, ठाणे परिसरात हे भाव 100-120 रुपये किलो पर्यंत पोहोचलेले पाहायला मिळत आहेत. हिरवी मिरची ही भारतीय स्वयंपाक घरातील नित्याची जिन्नस आहे. वाढत्या मिरचीच्या दरामुळे सामान्य नागरिकांचे स्वयंपाकाचे बजेट बिघडलेले पाहायला मिळते आहे.

Read More

Toor Dal Price Hike: जिरे, टोमॅटो, कोथिंबीर नंतर आता तूर डाळ महागली

ऑनलाइन किराणा दुकानातील तूर डाळीच्या किमती पाहिल्यास, 28 जून रोजी बिग बास्केटवर एक किलो ब्रँडेड तूर डाळची किंमत 247 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. बिग बास्केटवर अर्धा किलोचे डाळीचे पॅकेट 100 रुपयांपेक्षा अधिक किमतीने विक्रीसाठी उपलब्ध आहे. डीलशेयर, ग्रोफर्स आणि झेप्टोवर देखील कमी जास्त प्रमाणात हेच भाव दाखवले जात आहेत.

Read More

Jeera Price Hike: फोडणीचं गणित बिघडलं! देशभरात जिरे महागले…

देशाच्या अनेक भागांमध्ये आता जिऱ्याची किंमत 700 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. घाऊक बाजारात जिरे 57,500 रुपये प्रतिक्विंटल रुपयांनी विकले जात आहेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी भाववाढ आहे. नॅशनल कमोडिटी एक्स्चेंज (NCDEx) वर जिऱ्याच्या किंमती फेब्रुवारी महिन्यात 46,250 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचल्या आहेत. त्यांनतर आता थेट 57,500 रुपये प्रतिक्विंटल रुपये दराने जिरे विकले जात आहेत.

Read More

Jeera Price Hiked: जिऱ्याने दिला महागाईचा तडका, आतापर्यतच्या सगळ्यात चढ्या दरात विक्री सुरु

Cumin Price: गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला प्रॉफिट बुकींगमुळे जिऱ्याचे भाव घसरले होते, मात्र आता पुन्हा एकदा जिऱ्याचे भाव वेगाने वाढताना दिसत आहेत.नॅशनल कमोडिटी एक्स्चेंज (NCDEx) वर जिऱ्याच्या किंमती 46,250 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचल्या आहेत. जाणून घ्या या भाववाढीची कारणे...

Read More

Dal Price Increase: डाळींचे दर कडाडले; हरभरा, उडीद आणि मूग डाळीच्या किमतीत वाढ

Dal Price Increase: सर्वसामान्यांच्या दैनंदिन आहारात असणाऱ्या डाळींचे दर सध्या प्रचंड प्रमाणावर वाढले आहे. या वाढत्या दराचा परिणाम लोकांच्या घरगुती बजेटवर होताना पाहायला मिळत आहे. बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने या किमती वाढल्याचे सांगितले जात आहे.

Read More

Edible Oil Imports: जागतिक स्तरावरील किमतीत घट झाल्यामुळे खाद्य तेलाच्या आयातीत वाढ

Edible Oil Imports: पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या जागतिक किमतीत घसरण झाल्यामुळे चालू वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत (नोव्हेंबर-डिसेंबरसह) खाद्यतेलाच्या आयातीत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेने खाद्यतेलाच्या आयातीत 23.7 टक्के वाढ झाली आहे.

Read More

Tur Dal Price Hike: तुरीच्या उत्पादनात घट, किमतीत 22% झाली वाढ!

Tur Dal Price Hike: गेल्यावर्षीच्या तुलनेत तूर डाळीच्या भावात 32% वाढ नोंदवली गेली असून गेल्या तीन महिन्यांत 22% भाववाढ पाहायला मिळाली आहे. याचा मोठा फटका सामान्य जनतेला बसतो आहे. तूर डाळ ही सर्वसामान्य घरांमध्ये रोजच खाल्ली जाते. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे डाळीच्या किंमती वाढल्या असून सर्वसामान्य जनता मात्र हैराण आहे.

Read More

Nandini vs Amul: कर्नाटकात 'अमूल'ला का केला जातोय विरोध? जाणून घ्या सविस्तर

एक व्यवसाय म्हणून आम्ही बाजारात उतरत आहोत. कुणा प्रतिस्पर्धी कंपनीला नामोहरम करण्यासाठी आम्ही व्यवसाय करत नाही, अशी भूमिका अमूलने मांडली आहे. असं नेमकं काय घडलं की अमूलला असं स्पष्टीकरण द्यावं लागलं? जाणून घ्या सविस्तर माहिती या लेखात.

Read More