Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बजेट 2023

Sensex Closing Bell: अर्थसंकल्पीय घोषणांमुळे सेन्सेक्समध्ये वाढ, निफ्टी घसरला

Union Budget 2023 च्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात काय घडते यावर देखील गुंतवणूकदारांच्या नजरा होत्या. आज दिवसभरात शेअर मार्केटमध्ये मोठे चढ -उतार बघायला मिळाले.

Read More

Union Budget 2023 : डिजिटल लायब्ररी म्हणजे काय? ती कशी काम करेल?

यावेळी सरकारने 2023-24 च्या अर्थसंकल्पात डिजिटल इंडियावर भर दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या घोषणेमध्ये शिक्षक प्रशिक्षण, मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी तयार करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे डिजिटल लायब्ररी म्हणजे काय? आणि ती कशी काम करेल? ते पाहूया.

Read More

Budget 2023 Update: बजेट 2023 मधील शेतकऱ्यांसाठी असलेल्या 'या' 5 महत्वाच्या घोषणा

Budget 2023 Update: अर्थमंत्र्यांनी 2023 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची विशेष काळजी घेतली असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. किसान समृद्धी योजनेनंतर या वर्षी सरकारने इतर अनेक योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Read More

Budget 2023: हस्त उद्योगांना मिळणार चालना, एक जिल्हा, एक उत्पादन योजनेची घोषणा

Union Budget Today: संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023-24 सादर केला आहे. या अर्थसंकल्पात हस्त उदयोगांना चालना मिळण्यासाठी 'एक जिल्हा, एक उत्पादन' योजनेची घोषणा करण्यात आली आहे.

Read More

2023-2024 बजेटचे विश्लेषण | गुंतवणूक तज्ज्ञ योगेंद्र जोशी आणि शेअर बाजार विश्लेषक निखिलेश सोमण यांच्या समवेत Live चर्चा

Union Budget 2023 Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट 2023 सादर केलं. पण, त्याचा तुमच्या आमच्यावर काय परिणाम होणार आहे? बदललेली कर रचना फायद्याची की तोट्याची? रोजगार निर्मिती नेमकी कुठे होईल? अशा तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया गुंतवणूक तज्ज्ञ योगेंद्र जोशी आणि शेअर बाजार विश्लेषक निखिलेश सोमण यांच्याकडून...

Read More

Budget 2023: आयात शुल्क कपातीमुळे निर्मिती क्षेत्राला फायदा, मोबाईलच्या किंमती होणार कमी

इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या सुट्या पार्ट्सवरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा निर्मला सितारामन यांनी केली. पुढील आर्थिक वर्षात मोबाईल फोन, कॅमेरे आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Read More

Budget 2023 Update: आयटी रिटर्न फाईल करण्यासाठी साधीसोपी प्रणाली आणणार- अर्थमंत्री निर्मला सितारामन

Budget 2023 Update: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी करदात्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Read More

Budget 2023 Update: ऊर्जा संक्रमण आणि निव्वळ शून्य उद्दिष्टपूर्तीसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद

Budget 2023 Update: पर्यावरणस्नेही जीवनशैलीच्या दृष्टीने हरित वाढीवर लक्ष केंद्रीत करत, पर्यावरणाविषयी जागरूक जीवनशैली चळवळीला चालना देण्यासाठी, भारत पंचामृत योजना आणली आहे. 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनासाठी आणि ऊर्जा संक्रमण दृढपणे वाटचाल करण्याचे ध्येय आहे. यासाठीच शासनाने 35 हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.

Read More

Union Budget 2023: जीएसटी, ऑनलाइन व्यापारावर दिलासा नाही

Budget 2023: व्यापारी संघटनेकडून सांगण्यात आले आहे की, जीएसटी आणि ऑनलाइन व्यापारावर कोणताही दिलासा न मिळाल्याने देशातील करोडो व्यापारी निराश झाले आहेत. ते म्हणाले की, सरकारने याबाबतीत काही करण्याची आवश्यकता होती.

Read More

अर्थसंकल्प 2023: गरीब कैद्यांना जामीन मिळवून देणार सरकार, अर्थसंकल्पात सरकारने केली घोषणा

जामीन किंवा दंडाची रक्कम भरण्याच्या स्थितीत नसलेल्या कैद्यांना अर्थसंकल्पात आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. देशभरात अनेक जेलमध्ये कच्चे कैदी असून, जामिनाअभावी ते कारागृहातच आहेत. अशा कैद्यांना ऐच्छिक आर्थिक मदत दिली जाईल अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

Read More

Budget 2023 Updates: मत्स्य व्यवसायकांसाठी मोठी बातमी, शासन देणार तब्बल 6 हजार कोटी

Budget 2023: अर्थसंकल्प 2023-24 नुकताच संसदेत सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मत्स्त्यपालकांना मोठा दिलासा दिला आहे. या व्यवसायासाठी त्यांनी तब्बल 6 हजार कोटींची घोषणा केली आहे.

Read More

Union Budget 2023 Tax Slabs: कर रचना झाली सुटसुटीत, नवीन कर प्रणालीत 7 लाखांपर्यंत उत्पन्नावर टॅक्स नाही

Union Budget 2023 Tax Slabs: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2023-24 केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना नवीन कर प्रणालीमध्ये कर-सवलत मर्यादा 7 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. नवीन कर प्रणालीमध्ये वार्षिक उत्पन्न 7 लाखापर्यंत असणाऱ्या व्यक्तीला कोणताही कर भरावा लागणार नाही.

Read More